राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षा अभ्यासक्रम 2023 : राज्यात होणाऱ्या नगर परिषद भरती अंतर्गत ५१५ पदे जवान (दारू बंदी पोलीस) लेखक, चपराशी असे पदे भरण्यात येणार आहे, त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क (Excise Department) विभागामार्फत सर्व परीक्षा 2023 भरतीसाठी अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग परीक्षा नवीन अभ्यासक्रम – State Excise Department Syllabus in Marathi PDF
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती परीक्षा लेखी व काही पदासाठी शारीरिक चाचणी घेतली जाते सर्व पेपर्स हे २०० गुणांचे असतात. पदानुसार खाली परीक्षेचे स्वरूप व अभ्याक्रम दिला आहे.
कोणती पदे भरली जाणार : नवीन जाहीर झालेला अभ्यासक्रम
- लघुलेखक (निम्नश्रेणी)
- लघुटंकलेखक
- जवान (दारू बंदी पोलीस)
- जवान-नि-चालक
- चपराशी
अधिकृत जाहिरात व ओनलाईन अर्ज येथे करा
परीक्षेचं स्वरुप टप्पे / पॅटर्न
पदनाम | परीक्षेचा टप्पा | एकूण गुण | इतर माहिती |
जवान आणि जवान-नि-चालक | १. लेखी परीक्षा (120 गुण) २. शारीरक चाचणी / मैदानी चाचणी (80 गुण) ३. हलके व जड वाहन चालवणे (फक्त जवान-नि-चालक पदासाठी) | 200 गुण | शारीरक चाचणी / मैदानी चाचणी साठी लेखी परीक्षेतील उत्तीर्ण 1:10 प्रमाणात उमेदवारांना बोलावण्यात येईल हलके व जड वाहन चालवणे ही फक्त अहर्ताकारी परीक्षा आहे. |
लाघुलेखक (निम्नश्रेणी) आणि लाघुतांकलेखक | १. लेखी परीक्षा (120 गुण) २. लघुलेखन कौशल्य चाचणी (80 गुण) | 200 गुण | लघुलेखन कौशल्य चाचणी साठी लेखी परीक्षेतील उत्तीर्ण 1:10 प्रमाणात उमेदवारांना बोलावण्यात येईल |
चपराशी | लेखी परीक्षा (200 गुण) | 200 गुण | – |
शारिरीक पात्रता पडताळणी व मैदानी चाचणी :
जवान व जवान-नि-वाहनचालक या पदांच्या शारिरीक पात्रता निकष पूर्ण केलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी संबंधित जिल्हयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी, जिल्हा निवड समितीमार्फत, खालीलप्रमाणे घेण्यात येईल.
लेखी परीक्षेकरीता नकारात्मक गुणदान :-
- प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/कमी करण्यात येतील.
- वरीलप्रमाणे कार्यपध्दतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल.
- एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत असेल तर, अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पध्दत लागू असणार नाही.
राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती अभ्यासक्रम २०२३
मराठी :
- सर्वसामान्य शब्दसंग्रह
- वाक्यरचना
- व्याकरण
- म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
- तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे
इंग्रजी :
- Common Vocabulary
- Sentence Structure
- Grammar
- letter and e-mail writing
- Use of Idioms and phrases & their meaning
- comprehension of passage.
सामान्य ज्ञान :
- महाराष्ट्राचा भूगोल
- भारताचा भूगोल
- आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह
- नागरीकशास्त्र
- विज्ञान व चालू घडामोडी
बुद्धिमापन चाचणी व अंकगणित
- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी इ .
इतर परीक्षेचा अभ्यासक्रम PDF