Gramsevak Bharti : लवकरच महाराष्ट्रात ग्रामसेवक भरती 2023, 10000+ अधिक पदासाठी मेगा भरती होणार आहे त्यासाठी ग्राम सेवक भरती 2023 अभ्यासक्रम मराठी मध्ये – ( Maharashtra Gram Sevak Syllabus 2023 in Marathi ) आपण बघणार आहोत, तो PDF मध्ये सुद्धा Download करू शकतो.
ग्राम सेवक भरती हि सरळ सेवा पद्धतीने होत असते, त्यासाठी आपण ग्राम सेवक म्हणजे ग्राम पंचायत सचिव पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम व महत्वाचे बुक्स, नोट्स बघणार आहोत.
ग्रामसेवक कोण व त्याचे कार्य काय असता ते येथे बघा – ग्रामसेवक संपूर्ण माहिती
Gram Sevak Recruitment 2023 Information : ग्राम सेवक भरती माहिती
विभागाचे नाव | जिल्हा परिषद |
पदाचे नाव | ग्राम सेवक / ग्रामपंचायत सचिव / Village Development Officer / कंत्राटी ग्रामसेवक |
वेतन श्रेणी | 8023 – 23150 Grade Pay 2% |
ग्राम सेवक शैक्षणिक पात्रता | १२ वी / कृषी / पदविका / पदवी + MSCIT |
वयोमर्यादा – Age Limit | 18 ते 38 |
Gram Sevak Bharti Syllabus – ग्रामसेवक भरती तसेच अभ्यासक्रम
महाराष्ट्र ग्रामसेवक भरती मध्ये ५ वेग वेगळे विभाग वरती प्रश्न विचारले जातात. सहजा सह खाली ग्रामसेवक भरती चा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे असतो. परीक्षा मध्ये मराठी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी , कृषी व तांत्रिक ज्ञान असे वेग वेगळे विषय असतात. ग्रामसेवक भरती परीक्षा पेपर हा 200 गुणांचा असतो व सोडवण्यासाठी 90 मिनटांचा कालावधी दिला जातो .
ग्रामसेवक परीक्षा चा पूर्ण अभ्यासक्रम पुढे दिला आहे. पुढे दिलेला अभ्यासक्रम – मागील ग्रामसेवक भरतीच्या प्रश्न पत्रिका बघून तयार करण्यात आला आहे. या बाहेरील सुधा प्रश्न विचारले जाऊ शकतात.
अ. क्र. | विषय | प्रश्न संख्या | गुण |
1. | मराठी | 15 | 30 |
2. | इंग्रजी | 15 | 30 |
3. | अंकगणित व बुद्धिमत्ता | 15 | 30 |
4. | सामान्यज्ञान | 15 | 30 |
कृषी व तांत्रिक ज्ञान | 40 | 80 | |
एकुण | 100 | 200 |
Gram sevak Bharti 2023 Syllabus with Notes :
English : (बारावी )
- General Vocabulary
- Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag),
- Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions),
- Fill in the blanks in the sentence (Sentence Structure)
- Simple Sentence structure (Error, Types of Sentence) etc…
- Comprehension
मराठी व्याकरण : (बारावी)
- वाक्यरचना
- प्रयोग
- समास
- समानार्थी शब्द
- विरुद्धार्थी शब्द
- म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग,
- शब्दसंग्रह
- समास
- वचन
- संधी
- अलंकार
- व काळ , नाम ,सर्वनाम, विशेषण इत्यादि …..
- उताऱ्यावरील प्रश्न
सामान्य ज्ञान :
- चालू घडामोडी
- आधुनिक भारताचा इतिहास
- भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल
- भारतीय अर्थव्यवस्था
- ग्रामप्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन – रचना, संघटन, कार्य
- महाराष्ट्रातील समाज सुधारक
- भारतातील शेजारील राष्ट्रांशी संबंध
- कृषी व ग्रामीण विकास
- संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान, इत्यादी स्थानिक बाबी / वैशिष्ट्ये
बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित :
बुद्धिमत्ता
- कमालिका
- अक्षर मलिका
- वेगळा शब्द व अंक ओळखणे,
- समसंबंध – अंक, अक्षर, आकृती,
- वाक्यावरून निष्कर्ष
- वेन आकृती.
- नातेसंबंध
- दिशा
- कालमापन
- विसंगत घटक
अंकगणित
- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार,
- वर्ग व वर्गमूळ
- घन व घनमूळ
- लसावि व मसावि
- काळ-काम-वेग
- सरासरी,
- नफा – तोटा,
- सरळव्याज व चक्रवाढ व्याज
- चलन, मापनाची परिणामी
- व इतर ….
कृषी व तांत्रिक ज्ञान :
- समाजशास्त्र विषयक ज्ञान:
- समाज मानसशास्त्र समुदाय संस्था
- समाज सुधारकांचे योगदान
- सामाजिक समस्या
- सामाजिक योजना आणि सामाजिक कायदे
- पंचायतराज व्यवस्था
- ७३ वी घटनादुरुस्ती
- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामीण)
- कृषी विषयक ज्ञान
- कृषी मुलतत्वे
- पीक उत्पादन तंत्रज्ञान
- फलोत्पादन
- पीक संरक्षण
- कृषी औजारे, यंत्र व आधुनिक सिंचन पध्दती
- कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान
- सहकार पतपुरवठा
- पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व रेशीम उद्योग
- सेंद्रिय शेती
- कृषी आधारित उद्योग
- मृद संधारण जल संधारण व जल व्यवस्थापन
- पर्यावरणीय बदल
- इतर
- आपती व्यवस्थापन
- महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था
- केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या विविध योजना
- मुलभूत संगणक ज्ञानमाहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
- जैव विविधता
- सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन
वरील अभ्यासक्रम ग्राम विकास विभाग पारिपत्रक ०९ मे २०२३ शासन निर्णय कंत्राटी ग्रामसेवक यावर आधिरीत आहे.
तुम्ही वाचला आहेत ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 2023 बाकीच्या च्या नोट्स लवकरच ऍड करण्यात येतील .
वरील ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 2023 PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाइल मध्ये Share ऑपशन मध्ये Print बटनावर क्लिक करा .
jilha nusar pade kadhi prashadhi hotil
Can we apply for gram sevak exam without MSCIT….is MSCIT is compulsory
No.. You can apply without MSCIT