नवीन महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी व MPSC २०२६ मोफत सराव चाचण्या उपलब्ध!
Panchayat Raj नवीन अपडेट

राज्यपालांची संपूर्ण माहिती : Rajyapal Sampurn Mahiti

अपडेट: March 23, 2021

राज्यपालांची संपूर्ण माहिती : Rajyapal Sampurn Mahiti

राज्यपालांची संपूर्ण माहिती : राज्यपाल हा जनतेचे प्रतिनिधित्त्व करत नाही, तर तो राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून कार्य करतो.

कलम १५३ नुसार प्रत्येक राज्यास एक राज्यपाल असेल,अशी तरतूद आहे.

कलम १५५ नुसार राज्यपालाची नियुक्ती करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना आहे.

WhatsApp ग्रुप (सर्व भरती अपडेट्स)
जॉईन व्हा ➔
Telegram चॅनेल (मोफत PDF व सराव प्रश्न)
जॉईन व्हा ➔

राष्ट्रपती राज्यपालांची नेमणूक करतात.त्यामुळे राज्यपाल हे केंद्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून कामी करत असतात.

एकच व्यक्ती दोन किंवा अधिक राज्यांकरिता राज्यपाल म्हणून नियुक्त केली जाईल. (७ वी घटना दुरूस्ती, १९५६)

राज्यपालांची संपूर्ण माहिती : Rajyapal Sampurn Mahiti

कार्यकाल

राज्यपालांचा कार्यकाल ५ वर्षे असतो. ज्या दिवसापासून राज्यपालांनी पदग्रहण केले, त्या दिवशीपासून त्यांचा कार्यकाल सुरु होतो.

राजीनामा :त्या आधी राज्यपालांना आपला राजीनामा द्यायचा असल्यास ते राष्ट्रपतीकडे पाठवू शकतात.

पदावधी : कलम १५६ (१) नुसार राष्ट्रपतींची इच्छा असेपर्यंतच राज्यपाल अधिकारपदावर राहू शकतो.

पदच्यूती : राष्ट्रपती केव्हाही राज्यपालास पदमुक्त करू शकतात किंवा मुदतवाढ देऊ शकतात.

पात्रता

(कलम १५७) नुसार राज्यपालाच्या पदासाठी खालील दोन पात्रता असतात:

  • तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा.
  • त्याचे वय ३५ वर्ष पूर्ण असावे.

राज्यपाल पदाच्या शर्ती

(कलम १५८) :नुसार राज्यपाल संसद अथवा राज्यविधीमंडळाचा सदस्य असणार नाही.असल्यास राज्यपाल म्हणून निवडून येताच त्याचे सदस्यत्त्व संपुष्टात येईल.

शासनामधील इतर कोणतेही फायद्याचे पद त्याला स्वीकारता येणार नाही.

दोनहून अधिक राज्यांसाठी एकच राज्यपाल असल्यास, राष्ट्रपतींच्या आदेशाने त्यांचे वेतन ज्या-त्या राज्यातून विभागून देण्यात येईल.

राज्यपालांचे वेतन

राज्यपालांचे वेतन व भत्ते : रु. ३,५०,००० /- दरमहा अधिक भत्ते. (१ फेब्रुवारी २०१८ रोजी घोषणा)

राज्यपालांचे अधिकार

१) कार्यकारी अधिकार : राज्य शासनाचा सपूर्ण शासकीय कारभार राज्यपालाच्या नावे चालविला जातो.

२) कायदेविषयक अधिकार : राज्य शासनाचे काम सोईस्कररित्या पार पडावे यासाठी त्या कामाची मंत्र्यांमध्ये विभागणी करण्यासाठी राज्यपाल नियम तयार करतात.

३) अर्थविषयक अधिकार : राज्याचे वार्षिक अंदाजपत्रक विधानसभेत सादर करताना राज्यपालाची परवानगी आवश्यक असते.

४) न्यायिक अधिकार : उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक करताना राष्ट्रपती राज्यपालांचा सल्ला घेतात.उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राज्यपाल शपथ देतात.

🎯 मोफत ऑनलाईन सराव परीक्षा (Free Mock Tests)

या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!

TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.

सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?

आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!

Mahasarav Team
Mahasarav Team तज्ज्ञ लेखक

महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.

लेखकाचे सर्व लेख वाचा

संबंधित भरती व जाहिराती (Related Jobs)

सर्व पहा →

तुमची प्रतिक्रिया नोंदवा

तुमचा ईमेल आयडी सुरक्षित राहील, तो सार्वजनिक केला जात नाही. आवश्यक फील्ड * चिन्हांकित आहेत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा