सरळव्याज व चक्रवाढ व्याज- Simple – Compound Interest
व्याजाने घेतलेल्या रकमेला ‘मुद्दल‘ असे म्हणतात. रक्कम वापरलेल्या काळास ‘मुदत‘ असे म्हणतात. 100 रुपयांस 1 वर्षाचे जे व्याज द्यावयाचे त्याला ‘व्याजाचा दर’ असे म्हणतात. व्याजाचा दर, मुद्दल, मुदत आणि व्याज या चार गोष्टींपैकी कोणत्याही तीन गोष्टी दिलेल्या असल्यास चौथी गोष्ट काढता येते. मुद्दल आणि व्याज मिळून जी रक्कम होते तिला ‘रास‘ असे म्हणतात. मुद्दलाइतकेच व्याज येणे यास मुद्दलाची दामदुप्पट झाली असे म्हणतात. साध्या व्याज आकारण्याच्या पद्धतीस ‘सरळव्याज‘ असे म्हणतात. परंतु, व्याजावर व्याज आकारण्याच्या पद्धतीस ‘चक्रवाढ व्याज’ असे म्हणतात. सरळव्याजापेक्षा चक्रवाढ व्याजाची रक्कम जास्त होते.
या भरतीची 100% तयारी करा महासराव सोबत!
TCS / IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडी, पोलीस भरती, तलाठी आणि MPSC साठी मोफत टेस्ट सिरीज व विषयानुसार सराव प्रश्न आताच सोडवा.
सर्व भरतीचे अपडेट्स मोबाईलवर हवे आहेत?
आमच्या अधिकृत WhatsApp व Telegram ग्रुपमध्ये आजच सामील व्हा!
महासराव संपादकीय मंडळ - महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, MPSC व सर्व सरकारी नोकरी भरतीचे अधिकृत व जलद अपडेट्स देणारी तज्ज्ञ टीम.
लेखकाचे सर्व लेख वाचा
5 प्रतिक्रिया (Comments)
वाचकांची मते