व्याजाने घेतलेल्या रकमेला ‘मुद्दल‘ असे म्हणतात. रक्कम वापरलेल्या काळास ‘मुदत‘ असे म्हणतात. 100 रुपयांस 1 वर्षाचे जे व्याज द्यावयाचे त्याला ‘व्याजाचा दर’ असे म्हणतात. व्याजाचा दर, मुद्दल, मुदत आणि व्याज या चार गोष्टींपैकी कोणत्याही तीन गोष्टी दिलेल्या असल्यास चौथी गोष्ट काढता येते. मुद्दल आणि व्याज मिळून जी रक्कम होते तिला ‘रास‘ असे म्हणतात. मुद्दलाइतकेच व्याज येणे यास मुद्दलाची दामदुप्पट झाली असे म्हणतात. साध्या व्याज आकारण्याच्या पद्धतीस ‘सरळव्याज‘ असे म्हणतात. परंतु, व्याजावर व्याज आकारण्याच्या पद्धतीस ‘चक्रवाढ व्याज’ असे म्हणतात. सरळव्याजापेक्षा चक्रवाढ व्याजाची रक्कम जास्त होते.
Exam problems
Hii
Hi