HOME मराठी व्याकरण
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विभक्ती व विभक्तीचे प्रकार – Vibhakti in Marathi

By April 20, 2024
6
vibhakti in marathi

Vibhakti in Marathi Grammar : विभक्ती व विभक्तीचे प्रकार : – या पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत मराठी व्याकरणातील महत्वाचा टॉपिक म्हणजे विभक्ती व त्याचे प्रकार . स्पर्धा परीक्षे मध्ये अनेकदा यावर प्रश्न विचारले जातात.

नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात.

विभक्ती उदाहरणार्थ – Vibhakti Examples in Marathi

वाक्यात जे शब्द येतात, ते त्यांच्या मूळ स्वरूपात जसेच्या तसे सामान्यतः येत नाहीत. वाक्यात वापरताना त्यांच्या स्वरूपात बदल करावा लागतो.

उदा. – शेजारी, मधू, रस्ता, कुत्रा, काठी, मार’ असे शब्द एकापुढे एक ठेवल्याने काहीच बोध होत नाही, या शब्दसमूहाला वाक्य म्हणता येत नाही.

मोफत पोलीस भरती व इतर टेस्ट ➔

ते वाक्य होण्यासाठी ‘शेजारच्या मधूने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले.‘ अशा स्वरूपात शब्दरचना करायला हवी.

वाक्यातील शब्दांचा संबंध दाखविण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल किंवा विकार होतो, त्याला व्याकरणात विभक्ती / Vibhakti असे म्हणतात.

विभक्ती प्रत्यय आणि सामान्यरूप –

  • नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडतात त्यांस असे म्हणतात. “शेजारच्या मधूने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले.’ या वाक्यात ‘च्या, ने, त, ला‘ हे विभक्तीचे प्रत्यय होत.
  • हे विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या स्वरूपात जो बदल होतो, त्याला सामान्यरूप असे म्हणतात. ‘रस्त्या’ व कुत्र्या’ ही रस्ता व कुत्रा या नामांची सामान्यरूपे होत व रस्त्यात‘, ‘कुत्र्याला‘ ही विभक्तीची रूपे होत.

पुढील मूळ शब्दात कसा बदल होतो, तसेच सामान्यरूप व विभक्तीचे प्रत्यय दिसून येतील.

विभक्तीची रूपेमूळ शब्द
भावालाभाऊ
रामालाराम
सामान्यरूपविभक्तीची रूपे
भावाला
रामाला
Vibhakti in Marathi

टीप : नामाला सामान्यरूप जोडल्यानंतर शब्दयोगी किंवा प्रत्यय लगेचच जोडावा लागतो. उदाहरणे देताना शब्दयोगी न जोडल्यास इथे शब्दयोगी आहे हे सांगण्यासाठी _आडवी रेघ मारतात. तसेच विभक्ती प्रत्ययां पूर्वीही _आडवी रेघ मारतात, या आडव्या रेघा शब्द अपूर्ण असल्याचे दर्शवितात.

विभक्तीचे प्रकार – Type

  • प्रत्येक वाक्य म्हणजे एक विधान असते. यात क्रियापद हा प्रमुख शब्द होय. ही क्रिया करणारा वाक्यात कोणीतरी असतो. त्याला कर्ता असे म्हणतात, ही क्रिया कोणावर घडली? कोणी केली? कशाने केली? कोणासाठी केली? कोठून घडली? कोठे किंवा केव्हा घडली? हे सांगणारे शब्द वाक्यात असतात. नामांचा क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध अशा आठ प्रकारचा असतो; म्हणून विभक्तीचे एकंदर आठ प्रकार मानले जातात.

  1. प्रथमा,
  2. द्वितीया,
  3. तृतीया,
  4. चतुर्थी,
  5. पंचमी,
  6. षष्ठी,
  7. सप्तमी,
  8. संबोधन.

यांतील पहिल्या सातांना संस्कृतातील नावे दिली आहेत. आठव्या संबंधाच्या वेळी हाक मारली जाते म्हणून त्याला ‘अष्टमी‘ असे न म्हणता ‘संबोधन‘ असे नाव दिले आहे. (संबोधन – हाक मारणे, बोलावणे.)

या विभक्तींचे प्रत्यय कोणते व त्यामुळे नामाच्या स्वरूपात कोणते बदल होतात, हे पुढील प्रमाणे आहे.

विभक्तीचे प्रत्यय व ‘फूल’ या नामाची होणारी रूपे

एकवचन विभक्ती प्रत्यय उदाहरण

विभक्ती प्रकार प्रत्ययशब्दांची रूपे       
प्रथमाफूल     
द्वितीयास,ला,तेफुलास, फुलाला 
तृतीयाने,ए, शीफुलाने, फुलाशी  
चतुर्थीस,ला,तेफुलास, फुलाला  
पंचमीऊन,हूनफुलाहून
षष्ठीचा,ची,चेफुलांचे-ची-चे
सप्तमी त,ई, आफुलात
संबोधनफुला
एकवचनी विभक्ती प्रकार व उदाहरण

अनेकवचनी विभक्ती प्रत्यय उदाहरण

विभक्ती प्रकार प्रत्ययशब्दांची रूपे       
प्रथमाफुले
द्वितीयास,ला,ना,तेफुलांस, फुलांना 
तृतीयानी, शी, ई, हीफुलांनी फुलांशी
चतुर्थीस,ला,ना,ते फुलांस, फुलांना 
पंचमीऊन,हूनफुलांहून
षष्ठीचे,च्या,चीफुलांचे-च्या-ची
सप्तमीत, ई, आफुलांत
संबोधननोफुलांनो
अनेक वचनी विभक्ती प्रकार व उदाहरण

या लेखात आपण मराठी विभक्ती व त्यांचे प्रकार बघितले आहेत, इतर मराठी व्याकरण नोट्स बघण्यासाठी – > संपूर्ण मराठी व्याकरण लेखा ला भेट द्या

6 responses to “विभक्ती व विभक्तीचे प्रकार – Vibhakti in Marathi”

  1. Yogini patil says:

    Tnx

  2. शिवम संजय सरदेशपांडे says:

    खुप छान होत आहे या पुस्तकामधला आभ्यास
    सर सुगम मराठी व्याकरण व लेखन
    लेखक : —मो • रा • वाळंबे

  3. Vikas Bhosale says:

    खूप छान माहिती धन्यवाद

  4. more sonal says:

    Thanks

  5. Tejashri says:

    Khup chan mahiti thanks sir 🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *