स्वराज्याची चळवळः१९१९ ते १९२७ : The Struggle for Swaraj,1919-27

स्वराज्याची चळवळः १९१९-२७ (The Struggle for
Swaraj, 1919-27)

स्वराज्याची चळवळः १९१९-२७ (The Struggle for Swaraj, 1919-27)

प्रास्ताविकः

• राष्ट्रीय चळवळीचा तिसरा व शेवटचा टप्पा १९१९ पासून सुरू झाला. १९१९ पासून लोकांच्या जन-चळवळींना (popular mass movements) सुरूवात झाली. भारतीयांनी जगातील कदाचित जगातील सर्वात प्रभावी जनचळवळ लढली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जनचळवळींच्या उदयाची पार्श्वभूमी व कारणे:

• १९१४-१८ दरम्यान पहिल्या महायुद्धाच्या काळात नवीन राजकीय स्थिती उत्क्रांत पावत गेली. राष्ट्रवादी शक्ती संघटित झाल्या होत्या. राष्ट्रवादी नेत्यांना युद्धानंतर मोठ्या राजकीय सुधारणांची अपेक्षा होती, आणि अपेक्षा पूर्ण न झाल्यास ते संघर्षाच्या पूर्ण तयारीतही होते. अशा परिस्थितीत जनचळवळीचा उदय होण्याची पुढील कारणे कारणीभूत ठरली:

१)पहिल्या महायुद्धामुळे निर्माण झालेली आर्थिक स्थितीः

• युद्धानंतर आर्थिक स्थिती बिघडली होती. प्रथम किंमतींमध्ये युरोपीय वाढ व नंतर आर्थिक मंदी निर्माण झाली होती. त्यामुळे भारतीय समाजातील सर्व आर्थक हालअपेष्टांनी पिडीत होते. त्यात दुष्काळ व साथीच्या रोगांची भर पडली.

i) युद्धादरम्यान भारतीय उद्योगांची भरभराट झाली होती, कारण परकीय वस्तूंची आयात थांबलेली होती. मात्र युद्धानंतर त्यांना नुकसान होऊ लागले. तसेच भारतात मोठ्या प्रमाणावर परकीय भांडवल गुंतविण्यात येऊ लागले. भारतीय उद्योगांनी प्रशुल्के(import duties) वाढविण्याची व सरकारी मदतीची मागणी करण्यास सुरूवात केली. स्वतंत्र भारत सरकारच आपल्याला मदत करून शकेल याची त्यांना खात्री झाली.

ii) कामगार व कारागीर बेरोजगारी व उच्च किंमतींमुळे राष्ट्रीय चळवळीकडे आकर्षित होत गेले.

iii) आशिया, आफ्रिका व युरोपातील विजयी होऊन परतलेल्या भारतीय सैनिकांनी आपला आत्मविश्वास व अनुभव ग्रामीण भागात पोहोचविला.

iv) दारिद्र्य व उच्च करांमुळे पिडीत शेतकरी वर्गही आता नेतृत्वाच्या शोधात होताच.

आंतरराष्ट्रीय परिस्थीचा प्रभाव :

• राष्ट्रवादाच्या पुनरुत्थानासाठी आंतरराष्ट्रीय परिस्थिती सुद्धा अनुकूल होती. पहिल्या महायुद्धामुळे संपूर्ण आशिया-आफ्रिकेत राष्ट्रवादास प्रचंड उधाण आले होते. युद्धप्रयत्नांना लोकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी दोस्त राष्ट्रांनी (ब्रिटन, यु.एस.ए., फ्रान्स, इटली, जपान) त्यांच्या वसाहतींमधील जनतेला लोकशाही व राष्ट्रीय स्वयं-निर्णयाचा अधिकार देण्याचे वचन दिले होते.

• मात्र युद्धानंतर सर्व शांतता करारांमध्ये त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, तसेच जर्मनी व तुर्कस्थान या पराभूत देशांच्या वसाहती आपल्यांत वाटून घेतल्या. या नासराजीतून आशिया-आफ्रिकेत सर्व ठिकाणी लढाऊ राष्ट्रवादाचा उदय झाला.

• भारतात ब्रिटिशांनी घटनात्मक सुधारणा देण्याचा अर्धवट प्रयत्न केला, पण भारतीयांच्या हाती राजकीय सत्ता देण्यास पूर्ण नकार दिला.

३)गोऱ्यांच्या प्रतिष्ठेची हानी (Erosion of White Man’s prestige)

• रशियन राज्यक्रांतीमुळे वसाहतींमधील राष्ट्रीय चळवळींना उत्तेजना मिळाली. ७ नोव्हेंबर, १९१७ रोजी व्लादिमीर लेनीन याच्या नेतृत्वाखालील बोल्शेविक (कम्युनिस्ट) पार्टीने रशियातील झारची सत्ता उलथून जगाच्या इतिहासातील पहिले साम्यवादी राज्य (सोव्हिएत युनियन) ची स्थापन केली. नवीन सोव्हिएत शासनाने स्वतःहून चीन व इतर आशियाई प्रदेशांवरील आपल्या वसाहतवादी हक्कांचा त्याग केला, तसेच रशियाच्या वसाहतींना स्वयं-निर्णयाचा हक्क दिला.

• रशियन राज्यक्रांतीने वसाहतींमधील जनतेने दाखवून दिले की,सामान्य जनतेमध्ये प्रचंड शक्ती व ऊर्जा असते. जर तेथील शस्त्रविरहित शेतकरी व कामगार देशी जुलमी सत्तेविरूद्ध क्रांती घडवून आणे शकतात, तर वसाहतींतील लोक स्वतःच्या स्वराज्यासाठी संघटित होऊन लढू शकतात, असा विश्वास निर्माण झाला.

५)इतर देशातील राष्ट्रीय चळवळीः

• युद्धानतर इतर आफ्रिका-आशियाई देशातील राष्ट्रीय चळवळींचाही भारताच्या राष्ट्रीय चळवळीवर प्रभाव पडला. राष्ट्रवाद केवळ भारतातच नव्हे, तर आयर्लंड, तुर्कस्थान, इजिप्त,उत्तर आफ्रिका व पश्चिम आशियातील इतर अरब देश, इराण,अफगाणिस्तान, बर्मा, मलया, इंडोनेशिया, इंडो-चायना, फिलिपाईन्स, चीन आणि कोरिया या देशांमध्येही राष्ट्रवाद वेगाने विकसित होत होता.

ब्रिटिश सरकारचा प्रतिसाद (Reaction of the Government)

• ब्रिटिश सरकारला भारतीयांमधील उभरत्या राष्ट्रवादी व सरकारविरोधी भावनांची जाणीव होती. त्यांनी पुन्हा एकदा ‘गाजर व छडी धोरण’ (‘Carrot and Stick’ policy) अनुसरले, म्हणजेच घटनात्मक सुधारणा व दडपशाही. राष्ट्रवादी नेत्यांसमोर माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणांचे गाजर टाकण्यात आले, तर त्याविरूद्ध संभाव्या असंतोष दडपून टाकण्यासाठी रॉलेट कायदा संमत केली.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा