मराठी सर्वनाम : Pronoun Sarvanam in Marathi या नोट्स मध्ये आपण बघणार आहोत मराठी व्याकरणातील सर्वनाम व सर्वनामाचे सर्व प्रकार व प्रत्येक सर्वनामाचे उदाहरण मराठी मध्ये . सर्व प्रथम आपण बघणार आहोत सर्वनाम म्हणजे काय व त्याची व्याख्या काय आहे.
सर्वनाम म्हणजे काय ? ( व्याख्या ) – Sarvnam Mhanje Kay
वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणार्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
सर्वनाम व्याख्या
सर्वनाम वाक्यामध्ये नामाचा वारंवार होणारा वापर टाळण्यासाठी सर्वनाम वापरले जाते. पूढे सर्वनामाचे मराठी व्याकरण मधील प्रकार व त्यांचे उदाहरण Sarvanam Udaharan दिले आहेत.
सर्वनामाचे मुख्य प्रकार. – Sarvanamache Mukhya Prakar
सर्वनामाचे एकूण मुख्य सहा प्रकार आहेत, आणि ते पुढील प्रमाणे
- पुरुषवाचक सर्वनाम
- दर्शक सर्वनाम
- संबंधी सर्वनाम
- प्रश्नार्थक सर्वनाम
- सामान्य / अनिश्चित सर्वनाम
- आत्मवाचक सर्वनाम
1. पुरुषवाचक सर्वनाम – Purushvachak Sarvanam
वाक्यामध्ये पुरूषवाचक नामाऐवजी जो शब्द वापरला जातो, त्याला पुरूषवाचक सर्वनाम असे म्हणतात.
पुरुषवाचक सर्वनाम व्याख्या
पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण तीन उपप्रकार पडतात व ते पुढीलप्रमाणे.
प्रथम पुरुषवाचक सर्वनाम : Pratham Purushvachak Sarvanam
बोलणारा स्वत:विषयी. बोलतांना किंवा लिहितांना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्यास प्रथम पुरुषी सर्वनाम असे म्हणतात.
प्रथम पुरुषवाचक सर्वनाम व्याख्या
प्रथम पुरुषवाचक सर्वनाम उदाहरण– मी, आम्ही, आपण, स्वत: इ
- मी गावाला जाणार
- आपण खेळायला जावू.
व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम : Dutiye Purushvachak
जेव्हा बोलणारा ज्यांच्याशी बोलावयाचे आहे. त्याचा उल्लेख करतांना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्या सर्वनामास व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात.
व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम व्याख्या
व्दितीय पुरुषवाचक सर्वनाम उदाहरण– तो, तुम्ही, आपण, स्वतः इ
- आपण कोठून आलात?
- तुम्ही घरी कधी येणार?
तृतीय पुरुषवाचक सर्वनाम : Tritiya Purushvachak
जेव्हा बोलणारा दुसर्या व्यक्तीशी बोलतांना व तिसर्या व्यक्तींचा उल्लेख करतांना ज्या, ज्या सर्वनामाचा वाक्यात उपयोग करतो त्या सर्वनामांस तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात.
तृतीय पुरुषवाचक सर्वनाम उदाहरण– तो, ती, ते, त्या, आपण, स्वतः इ.
- त्याने मला कामाला लावले पण स्वतःमात्र आला नाही.
- त्या सर्वजण इथेच येत होत्या.
2. दर्शक सर्वनाम : Darshak Sarvanam
जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरीता जे सर्वनाम वापरले जाते. त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात.
दर्शक सर्वनाम व्याख्या
दर्शक सर्वनाम उदाहरण– हा, ही, हे, तो, ती, ते.
- ही माझी वही आहे
- हा माझा भाऊ आहे.
- ते माझे घर आहे.
- तो आमचा बंगला आहे.
3. संबंधी सर्वनाम – Sabandhi Sarvanam
वाक्यात पुढे येणार्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणार्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात.
संबंधी सर्वनाम व्याख्या
संबंधी सर्वनाम उदाहरण – जो, जी, जे, ज्या
ही सर्वनामे मिश्र वाक्यातच येतात.
– ही सर्वनामे गौणवाक्याच्या सुरवातीलाच येतात.
– असे गौण वाक्य हे गौण वाक्याचे विशेषण हे प्रकार असते.
- जे चकाकते ते सारेच सोने नसते.
- जो तळे राखील तो पाणी चाखील.
4. प्रश्नार्थक सर्वनाम : Prashnarthak Sarvanam in Marathi
ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्या सर्वनामास प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात.
प्रश्नार्थक सर्वनाम
प्रश्नार्थक सर्वनाम उदाहरण– कोण, कुणास, काय, कोणी, कोणाला
- तुमच्यापैकी कोण धडा वाचणार?
- तुझ्याकडे किती रुपये आहेत?
- तू कोठे जातोस?
5. सामान्य / अनिश्चित सर्वनाम : Samanya Anichit
कोण, काय, कोणी, कोणास, कोणाला, ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहे ते निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनाम म्हणतात.
सामान्य / अनिश्चित सर्वनाम
सामान्य / अनिश्चित सर्वनाम उदाहरण
- त्या पेटीत काय आहे ते सांग.
- कोणी कोणास हसू नये.
- कोण ही गर्दी !
6. आत्मवाचक सर्वनाम : Aatmvachak Sarvanam
एकाच वाक्यात आधी आलेल्या नामाचा किंवा सर्वनामाचा पुन्हा उल्लेख करतांना ज्या सर्वनामाचा उपयोग होतो. त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात.
आत्मवाचक सर्वनाम व्याख्या
आत्मवाचक सर्वनाम उदाहरण
- मी स्वतःत्याला पहीले.
- तू स्वतः मोटर चालवशील का?
- तो आपण होवून माझ्याकडे आला.
- तुम्ही स्वतःला काय समजतात.
मराठीत मूळ 9 सर्वनाम: Mul Marathi Sarvanam
मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतःया मूळ सर्वनामापैकी –
लिंगानुसार बदलणारी तीन सर्वनाम आहेत – तो, हा, जो.
- तो– तो, ती, ते
- हा– हा, ही, हे
- जो-जो, जी, जे
मूल सर्वनामापैकी वचनानुसार बदलणारी पाच सर्वनामे आहेत. – मी, तू, तो, हा, जो इ
- मी– आम्ही
- तू– तुम्ही
- तो– तो, ती, ते (एकवचनी) ते, त्या, ती (अनेकवचनी)
- हा– हा, ही, हे (एकवचनी) हे, ह्या, ही (अनेकवचनी)
- जो– जो, जी, जे (एकवचनी) जे, ज्या, जी (अनेकवचनी)
Marathi Sampurn Vyakaran: Click Here
Telegram Group: Click Here
Thank u…🙏
👍👍
Thank u…🙏🏻
Thank u so much
Nice it very helpful 👍 👌
Hii