राष्ट्रपती विषयी माहिती : Rashtrapati Vishayi Mahiti

राष्ट्रपती विषयी थोडक्यात माहिती :

• राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक असून घटनेने त्याला ‘अग्रतेचा मान दिला आहे.

• भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

• राष्ट्रपतींचे पद अतिशय सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे असून ते भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतात.

• संविधानाने देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना दिली आहे.

• देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो,असे असले तरी प्रत्यक्ष व्यवहारात प्रधानमंत्री न्यायमडळ आणि मंत्रिमंडळ राज्यकारभार करते.

• राष्ट्रपती हे नामधारी संविधानात्मक प्रमुख आहेत,तर प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख आहेत.

• भारताचे राष्ट्रपती हे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे आणि केंद्रीय कायदेमंडळाचे घटक असतात.

• कलम ५२ : नुसार घटनेने राष्ट्रपतिपदाची निर्मिती केलेली आहे म्हणून राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख असतात.

• कलम ५३ (१) : नुसार राष्ट्राची सर्व कार्यकारी सत्ता राष्ट्र्पतींना प्राप्त झालेली आहे.

राष्ट्रपती विषयी सविस्तर माहिती :

राष्ट्रपतींची निवड :

• राष्ट्रपतींची निवड भारतीय जनतेकडून अप्रत्यक्षरीत्या होते.

• संसद सदस्य आणि विधानसभा सदस्यांच्या या गटाला निर्वाचन मंडळ असे म्हणतात.

• भारतातील सर्वसामान्य मतदार राष्ट्रपतींना थेटपणे निवडून देत नाहीत, तर त्यांनी निवडलेल्या संसद सदस्यांकडून आणि विधानसभा सदस्यांकडून राष्ट्रपती निवडले जातात.

• कलम (५४) : राष्ट्रपतीची निवड अप्रत्यक्ष पद्धतीने पुढील निर्वाचक गणाच्या सदस्यांमधून होते.

• कलम ५४(A ) : नुसार संसदेच्या दोन्ही सभागृहाचे (लोकसभाराज्यसभा ) निवडून आलेले सदस्य.

• कलम ५४(B ) : घटकराज्याच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य.

राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणते सदस्य सहभागी होत नाही?

• लोकसभा व राज्यसभा यांचे नामनिर्दशित सदस्य.

• घटक राज्याच्या विधान सभांचे नामनिर्दशित सदस्य.

• घटकराज्यमधील विधानपरिषदाचे निवडून आलेले नामनिर्दशित सदस्य.

• घटकराज्यातील मुख्यमंत्री हे विधान परिषद या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य असतील ,तर त्यांना राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेता येत नाही.

राष्ट्रपतींचा कार्यकाल

• कलम 83 नुसार राष्ट्रपतींचा कार्यकाल हा पाच वर्षांचा असतो.

• त्या कार्यकालापूर्वी राष्ट्रपती आपला राजीनामा देऊ शकतात.

• राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपती यांच्याकडे देतात.

• राष्ट्रपतीपदासाठी  किमान २ वेळा एक व्यक्ती निवडणूक लढऊ शकते.

पात्रता

• राष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणारी व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे.

• तिचे वय ३५ वर्षे पूर्ण असले पाहिजे.

• राष्ट्रपतीपदावर निवड झालेल्या व्यक्तीला आपले पद स्वीकारताना शपथ घ्यावी लागते. त्यानुसार संविधानाचे रक्षण करण्याची आणि नुसार राज्यकारभार होत आहे की नाही हे हमारली जबाबदारी राष्ट्रपतींवर असते.

• कलम ५९ : नुसार राष्ट्रपतीपदाचा उमेदवार संसद व घटकराज्याच्या विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सभासद नसावा.

राष्ट्रपतींची कार्ये व अधिकार

• संविधानाने राष्ट्रपतींना अनेक कार्ये दिली आहेत. त्यांपैकी काही कार्ये पुढीलप्रमाणे आहे.

(१) संसदेचे अधिवेशन बोलावणे, स्थगित करणे, संसदेला संदेश पाठवणे, लोकसभा मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी बरखास्त करणे हे सर्व अधिकार राष्ट्रपतींना असतात.

(२) लोकसभा व राज्यसभायांनी समत केलेल्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी आवश्यक असते. त्यांच्या स्वाक्षरीशिवाय विधेयकाचे कायदयात
रूपांतर होत नाही.

(३) प्रधानमंत्र्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात व त्यांनी सुचवलेल्या व्यक्तींची मंत्रिपदावर नेमणूक राष्ट्रपती करतात.

(४) सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. त्याचप्रमाणे सर्व राज्यांचे राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपती करतात.

(५) राष्ट्रपती संरक्षण दलांचे सर्वोच्च प्रमुख असतात. युद्ध व शांतता यांबाबतचे निर्णय राष्ट्रपती घेतात.

(६) राष्ट्रपतींना काही न्यायालयीन अधिकारह आहेत. उदा. एखाद्या व्यक्तीच्या शिक्षा कमी करणे, शिक्षेची तीव्रता कमी करणे किंवा अपवादात्मक परिस्थितीत मानवतावादी भूमिकेतून शिक्षा कमी किंवा करण्याचा अथवा रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो.

(७) देशात संकटकालीन परिस्थिती उद्भवल्यास राष्ट्रपतींना आणीबाणी जाहीर करण्याचे अधिकार असतात. संविधानात तीन प्रकारच्या आणीबाणी दिलेल्या आहेत. (१) राष्ट्रीय आणीबाणी,(२) घटक राज्यांतील आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट (३) आर्थिक आणीबाणी.

राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्यांची कामे उपराष्ट्रपती पार पाडतात. उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांकडून होते.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा