MahaTribal Recruitment 2024 : आदिवासी विकास विभाग मध्ये 614 पदांची भरती

MahaTribal Recruitment: महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागामध्ये विविध पदांसाठी सरळसेवा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 614 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 12 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू होणार आहे.

MahaTribal Recruitment 2024 – महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती

आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध विभागातील एकूण 614 पदे भरण्यासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, रिक्त पदे खालीलप्रमाणे..

नोकरी ठिकाण : महाराष्ट्रात कुठेही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकूण पदे : 614

राज्य उत्पादन शुल्क विभाग सरळसेवा भरती अर्ज सुरु आहे

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक अर्हता / Qualification
उच्च श्रेणी लघुलेखकअ) शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम

ब)1. उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी)- शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण
2. उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी) – शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परिक्षा उत्तीर्णवरील ब मधील 1 व 2 करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन 120 शब्द प्रति मिनीट असल्यास प्राधान्य)

क) टंकलेखन (इंग्रजी) 40 शब्द प्रतिमिनीट

ड) टंकलेखन (मराठी) 30 शब्द प्रतिमिनीट

इ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची MSCIT संगणक अर्हता परीक्षा वा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

ई) सदर पदासाठी व्यावयासिक चाचणी परीक्षा नियमानुसार घेण्यात येईल.
निम्न श्रेणी लघुलेखकअ) शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम

ब) 1. निम्न श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) – शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 100 शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण
2. निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी) – शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 100 शब्द प्रति मिनिट मराठी लघुलेखन परिक्षा उत्तीर्णवरील ब मधील 1 व 2 करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन 100 शब्द प्रति मिनीट असल्यास प्राधान्य)

क) टंकलेखन (इंग्रजी) 40 शब्द प्रतिमिनीट

ड) टंकलेखन (मराठी) 30 शब्द प्रतिमिनीट

इ) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची MSCIT संगणक अर्हता परीक्षा वा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

ई) सदर पदासाठी व्यावयासिक चाचणी परीक्षा नियमानुसार घेण्यात येईल.
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षकमान्यताप्राप्त विद्यापिठाची किमान द्वितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी. (BA/BSC/BCOM/LAW/B.Ed/B.PED)

संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहिल
संशोधन सहाय्यकमान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत (Any Graduate), परंतु गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
उपलेखापाल/ मुख्य लिपिकमान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत (Any Graduate) , परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शाखातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील
वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यकमान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत (Any Graduate), परंतु गणित / अर्थशास्त्र / वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
लघुटंकलेखकज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षा उत्तीर्ण केली असावी किंवा शासनमान्य समकक्ष परिक्षा उत्तीर्ण केली असावी. आणि जी व्यक्ती शासकीय लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल. (महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र).
गृहपाल (पुरुष)मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार
गृहपाल (स्त्री)मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार
अधीक्षक (पुरुष)मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार
अधीक्षक (स्त्री)मान्यताप्राप्त विद्यापिठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार
ग्रंथपालज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे. परंतू ग्रंथालयशास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान दोन वर्षांपेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंतीक्रम राहील
प्रयोगशाळा सहाय्यकज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे. (SSC)
आदिवासी विकास निरीक्षकमान्यताप्राप्त विद्यापिठाची जे पदवी धारण करीत आहेत Any Graduate, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील
सहाय्यक ग्रंथपालज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे SSC आणि ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केले आहे.

वयोमर्यादा – अर्जदारांचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. परंतु, राखीव श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाते.

अर्ज कसा करावा – How To Apply

आदिवासी विकास विभाग मध्ये 614 पदांची भरती 20240साठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागतील. अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  1. सर्वप्रथम, आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. लिंक खाली दिली आहे
  2. वेबसाइटच्या होमपेजवर, “भरती” टॅबवर क्लिक करा.
  3. “MahaTribal Recruitment 2024” लिंकवर क्लिक करा.
  4. नवीन पृष्ठावर, “ऑनलाइन अर्ज करा” बटणावर क्लिक करा.
  5. आपला ईमेल आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
  6. जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल तर, “नवीन वापरकर्ता नोंदणी” बटणावर क्लिक करा आणि आवश्यक माहिती भरा.
  7. एकदा तुम्ही लॉग इन केल्यानंतर, “अर्ज करा” बटणावर क्लिक करा.
  8. अर्ज फॉर्म भरून पूर्ण करा.
  9. आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेले प्रती अपलोड करा.
  10. “सबमिट” बटणावर क्लिक करा.

अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुमचा अर्ज सबमिट होईल आणि तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल. तुम्ही तुमचा अर्ज क्रमांक वापरून तुमचा अर्जाची स्थिती तपासू शकता.

अर्ज करण्याची कालावधी तारीख 12 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर 2024 आहे.

आवश्यक कागदपत्रे:

  • शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे (Education Certificate – SSC/HSC/Degree/MSCIT/Typing etc)
  • जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate if Required)
  • निवास प्रमाणपत्र (Nationality/Domicile Certificate)
  • ओळखपत्र (Aadhar Card/PAN Card/Election Card/Etc)
  • फोटो
  • स्वाक्षरी

अधिक माहितीसाठी, कृपया आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

निवड प्रक्रिया –

अर्जदारांची निवड ऑनलाईन लिखित परीक्षा व कागदपत्रे तपासणी या आधारावर केली जाईल.

आदिवासी विकास विभाग जाहिरात / Mahatribal notificationडाउनलोड करा
ऑनलाईन अर्ज लिंक / Apply Linkयेथे क्लिक करा (Starts 12 Oct)
आदिवासी भरती 2023 Refund Linkयेथे क्लिक करा
अधिकृत लिंक / Tribal Official Websiteयेथे क्लिक करा

1 thought on “MahaTribal Recruitment 2024 : आदिवासी विकास विभाग मध्ये 614 पदांची भरती”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा