क्रियाविशेषण अव्यये : मराठी व्याकरण

क्रियाविशेषण अव्यये : – नामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला ‘नाम विशेषण’ किंवा ‘विशेषण’ असे म्हणतात, हे आपण पाहिले. त्याचप्रमाणे क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात.

क्रियापदाने जी क्रिया दर्शविली जाते ती केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळा किंवा किती प्रमाणात घडली अशा प्रकारची अधिक माहिती देणारे शब्द वाक्यात येतात. त्यांना आपण क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतो.

क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय यातील फरक

क्रियाविशेषण हे क्रियापदाचे विशेषण असते. पण ते विकारी असते म्हणजे लिंग, वचन इत्यादींचा
त्याच्या रूपावर परिणाम होतो. त्यानुसार ते बदलते.

उदा. ‘ती मुलगी चांगली गाते.’ या वाक्यात ‘चांगली’

है ‘गाते’ या क्रियापदाचे विशेषण आहे. जर या वाक्यातील कर्ता पुल्लिंगी ठेवला, तर हे वाक्य ‘तो मुलगा चांगला गातो.’ असे होईल. मूळ वाक्यातील कर्ता अनेकवचनी ठेवला, तर त्या मुली चांगल्या गातात.’ असे ते वाक्य होईल म्हणजे ही क्रियाविशेषणे विकारी आहेत.

आता पुढीत वाक्ये पाहा.

१) मुलगी जलद चालते.

(२) मुलगा जलद चालतो.
(३) मुली जलद चालतात.
(४) मुले जलद चालतात

वरील वाक्यांतील ‘जलद’ हे क्रियाविशेषण चालणे’ या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते. तसेच,

लिंग, वचन यांमध्ये बदल केला, तरी ‘जलद या क्रियाविशेषणावर काही परिणाम होत नाही. त्यात बदल होत नाही. ते तसेच राहते. म्हणून त्याला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

कोणत्याही शब्दाचा प्रकार हा त्याच्या रूपावरून न ठरता वाक्यातील त्याच्या कार्यावरून ठरतो, हे आपण पाहिले आहे. तीच गोष्ट क्रियाविशेषणाच्या बाबतीतही खरी आहे.
उदा. ‘मोठा’ हा शब्द विशेषणम्हणून वापरला जातो.
तो मुळात विकारी किंवा सव्यय आहे; कारण लिंगवचनांतील बदलाप्रमाणे त्याची रूपे मोठा-मोठी-मोठे’ अशी होतात. पण त्याला तृतीयेचा ने हा प्रत्यय लागून मोठ्याने असे रूप तयार होते. तो लिंगवचनाप्रमाणे बदलत नाही, म्हणून तो शब्द अविकारी किंवा अव्यय, तर मोठा’ हा शब्द विकारी किंवा सव्यय आहे. तसेच म्हण (क्रि सव्यय, तर म्हणून’ अव्यय, ‘जोर’ (नाम) सव्यय, तर ‘जोरात’ अव्यय. शब्दाला विभक्तीचा प्रत्यास लागून ते अव्यय झाले की मग त्याला पुन्हा विभक्तीचे प्रत्यय लागत नाहीत.

क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार


क्रियाविशेषण अव्यायांचे वर्गीकरण दोन प्रकारे करतात-
(१) त्यांच्या अर्थावरून (अर्थमूलक प्रकार)
(२) त्यांच्या स्वरूपावरून (स्वरूपमुलक प्रकार)

अर्थमूलक प्रकार

क्रियाविशेषण अव्ययाचे ‘अर्थमूलक प्रकार’ पुढीलप्रमाणे आहेत.


(१) कालवाचक क्रियाविशेषण अव्यये
पुढील वाक्ये पाहा.
(१) काल शाळेला सुट्टी होती. (२) मी दररोज व्यायाम करतो.
(३) पूर्वी शिक्षक पागोटे घालत. (४) तो वारंवार आजारी पडतो.


वरील वाक्यातील काल, दररोज, पूर्वी, वारंवार’ हे शब्द त्या-त्या वाक्यांतील क्रिया केव्हा, किती वेळ किंवा किती वेळा घडली हे दाखवितात. ही अव्यये क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दाखवितात;म्हणून
त्यांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात.

कालवाचक क्रियाविशेषण अव्ययांचे पुढील तीन प्रकार पडतात.
(अ) कालदर्शक : आता, आधी, सध्या, तूर्त, हल्ली, सांप्रत, उद्या, परवा, लगेच, केला
जेव्हा, पूर्वी, मागे, दिवसाचा, रात्रीस इत्यादी.
(आ) सातत्यदर्शक : नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी, अद्यापि, दिवसभर, आजकाल इत्यादी
(इ) आवृत्तिदर्शक : वारंवार, फिरून, पुनःपुन्हा, दररोज, सालोसाल, क्षणोक्षणी इत्यादी.


(२) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये
पुढील वाक्ये पाहा.
(१) परमेश्वर सर्वत्र असतो. (२) साप माझ्या समोरून गेला.
(३) तिथे कर माझे जुळती. (४) येथून नदी जवळ आहे.

वरील वाक्यांतील ‘सर्वत्र, समोरून, तिथे, येथून’ हे शब्द वाक्यांतील क्रिया घडण्याचे स्थळ किंवा
ठिकाण दाखवितात; म्हणून त्यांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात.
याचे दोन प्रकार आहेत. ते पुढीलप्रमाणे

(अ) स्थितिदर्शक : इथे, तिथे, जिथे, खाली, वर, कोठे, मध्ये, अलीकडे, पलीकडे, मागे, पुढे
जिकडे, तिकडे, सभोवार इत्यादी.

(आ) गतिदर्शक : इकडून तिकडून, दूर, लांब, तिथून, मागून, मन, इत्यादी.


(३) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये
पुढील वाक्ये पाहा.


(१) रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे.
(२) तो मुलगा उभ्याने पाणी गटागटा पितो.
● वरील वाक्यांतील सावकाश, जपून, उभ्याने, गटागटा’ हे शब्द क्रिया पक्षण्याची रीत किंवा किया
कशी धडते ते दाखवितात. म्हणून त्यांना रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात.
त्यांचे पुढील तीन प्रकार आहेत.


(अ) प्रकारवर्शक :असे, तसे, जसे, कसे, उगीच, व्यर्थ, फुकट, आपोआप, मुद्दाम, जेवी,
तेवी. हळू. सावकाश, जलद इत्यादी.
(आ) अनुकरणदर्शक :झटकन, पटकन, पटपट, टपटप, चमचम, बदाबद इत्यादी.
(इ) निश्चयार्थक : खचित, खरोखर इत्यादी.


(४) संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यये
पुढील वाक्ये पाहा.
(१) मी मुलीला अनेकदा बजावले आहे.
(२) ते गृहस्थ वाचताना नेहमी अडखळतात.
(३) सहलीस गेल्यावर आम्ही भरपूर पाणी प्यालो.


वरील वाक्यातील अनेकदा, नेहमी, भरपूर’ हे शब्द क्रिया किती वेळा घडली हे किंवा क्रियेचे परिमाण
दाखवितात. अशा शब्दांना संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात. अशा प्रकारचे आणखी काही शब्द पुढीलप्रमाणे – किंचित, जरा, काहीसा, थोडा, कचित, अत्यंत, अगदी, बिलकूल, मुळीच, भरपूर, बहुत, अतिशय,मोजके, पूर्ण.


(५) प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यये
पुढील वाक्ये पाहा.
(१) तुम्ही आमच्याकडे याल का?
(२) आपण मला आपल्या घरी न्याल ना?


वरील वाक्यातील ‘का, ना’ हे शब्द त्या-त्या वाक्यांतील विधानांना प्रश्नांचे स्वरूप देतात. अशा शब्दांना
प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात.


(६) निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यये
पुढील वाक्ये पाहा.
(१) तो चुकता येतो.
(२) तो तोंड उघडेल तर ना.
वरील वाक्यातील ‘न, ना’ हे शब्द त्या-त्या वाक्यांतील क्रियेचा नकार किंवा निषेध दर्शवितात. अशा शब्दांना निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यये असे म्हणतात.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा