उभयान्वयी अव्यये – Ambiguous preposition | Meaning in marathi | English Grammar in marathi
◆ ALTHOUGH
1.ALTHOUGH
१) He didn’t wait for me although I had told him to.
मी त्याला सांगितलं होतं तरी त्याने माझी वाट पाहिली नाही.
२) He can speak 5 languages fluently although he never went to school/ Although he never went to school, he can speak 5 languages fluently. तो शाळेत कधी गेला नाही तरी तो पाच भाषा अस्खलित बोलू शकतो.
◆ AND
2.AND
१) Men rule the world and women rule men.
पुरुष जगावर राज्य करतात आणि स्त्रिया पुरुषांवर.
२) ‘Divide and rule’ was their policy.
फोडा आणि राज्य करा’ असं त्यांचं धोरण होतं.
2) Two and two make four.
दोन आणि दोन चार होतात.
◆ As
3.As. १) I did as he told me. त्याने मला जसं सांगितलं तसं मी केलं.
२) As it was getting dark, he stopped his work and went home..
अंधार होत असल्याकारणाने/असल्यामुळे त्याने काम थांबवलं आणि घरी गेला.
३) AS you wish.
जशी तुझी इच्छा.
४) He works as my assistant. .
तो माझा सहायक म्हणून काम करतो.
५) Everything was as it should be.
प्रत्येक गोष्ट जशी असायला पाहिजे तशी होती.
६) As a teacher, I understand the problems of students.
शिक्षक या नात्याने / शिक्षक असल्यामुळे मला विद्यार्थ्यांच्या अडचणी समजतात.
७) As a child, I have seen great poverty.
लहान असताना (=बालपणी) मी खूप दारिद्र्य पाहिलं आहे.
◆ विशेषणासोबत as
विशेषणासोबत as
● ‘as + विशेषण + as + नाम’ या रचनेमधे as चा उपयोग सारखा/इतका या अर्थाने तुलना करण्यासाठी केला जातो. जसे,
१) as blackas coal.
कोळशासारखा काळा.
२) as brave as a lion.
सिंहासारखा शूर.
३) as red as blood.
रक्तासारखा लाल.
४) as clear as sunlight.
सूर्यप्रकाशाइतका स्पष्ट/उघड.
५) as cunning as a fox.
कोल्ह्यासारखा धूर्त.
६) as cold as ice.
बर्फासारखा थंड.
७) She is as tall as her mother.
ती तिच्या आईइतकी उंच आहे.
८) We ran as fast as we could.
शक्य तेवढ्या वेगाने आम्ही धावलो.
◆ as युक्त काही वाक्प्रचार
as युक्त काही वाक्प्रचार
as if/as though (दोघांचा अर्थ सारखाच)
१) She orders me as if I were / was her servant.
मी तिचा नोकर असल्याप्रमाणे ती मला आदेश देते (पण मी तिचा नोकर नाही). ती मला आदेश देते जसं काही मी तिचा नोकर आहे.
२) you look as though you haven’t had a bath for a year,
तू असा दिसतोस जसं काही तू वर्षभरापासून स्नान केलेलं नाही.
◆ as to
● as to
१) He didn’t say anything as to when the construction will start.
बांधकाम केव्हा सुरू होईल त्याबद्दल त्याने काही सांगितलं नाही.
◆ as soon as / no sooner than
● as soon as / no sooner than
१) As soon as a teacher comes, boys stand up.
शिक्षक आल्याबरोबर मुले उभी राहतात.
२) As soon as a teacher came, boys stood up.
शिक्षक आल्याबरोबर मुले उभी राहिली.
● As soon as चा अर्थ No sooner…. than वापरून व्यक्त करताना सुरुवातीला No sponer म्हटल्यानंतर लगेच साहाय्यकारी क्रियापद वापरले जाते आणि वाक्यातील शेवटचा भाग जोडण्यापूर्वी than चा उपयोग होतो. पहा : १) No sooner does a teacher come than boys stand up.
शिक्षक आल्याबरोबर मुलं उभी राहतात.
2) No sooner did a teacher come than boys stood up.
शिक्षक आल्याबरोबर मुले उभी राहिली.
३) No sooner did he see me than he ran away.
मला पाहिल्याबरोबर तो पळून गेला.
◆ as well as
● as well as १) You are deaf as well as blind.
तू बहिरा आहेस आणि त्याचप्रमाणे आंधळाही आहेस.
• As well as ने दोन कर्ते जोडलेले असल्यास आणि दुसरा कर्ता एकवचनी असल्यास त्यासोबत एकवचनी क्रियापद वापरतात. पहा:
२) He as well as his friend is innocent
पण He and his friend are innocent.
as yet, as far as, as well, such as, as long as
१) We have come across no problem as yet.
आम्हाला आत्तापर्यंत काही अडचण आलेली नाही.
२) Does this bus go as far as Jalna?
ही बस जालन्यापर्यंत जाते का?
३) He knows English and Marathi as well.
त्याला इंग्रजी येते आणि मराठी सुद्धा येते.
४) People such as them cannot be trusted.
त्यांच्यासारख्या लोकांवर विश्वास केला जाऊ शकत नाही.
५) You need not worry as long as you are doing your job properly
तू तुझं काम बरोबर करत आहेस तोपर्यंत तुला काळजी करण्याची गरज नाही./
तू तुझं काम बरोबर करत असशील तर तुला काळजी करण्याची गरज नाही.
◆ BECAUSE
4.BECAUSE
१) I told him because he asked.
मी त्याला सांगितलं कारण त्याने विचारलं.
२) He was angry because I hadn’t taken his permission.
तो रागावलेला होता कारण मी त्याची परवानगी घेतली नव्हती.
3) “Why didn’t you come yesterday?
‘तू काल का आला नाहीस? “Because I was ill” कारण मी आजारी होतो.
◆ BEFORE/AFTER
5.BEFORE/AFTER
१) Think before you speak.
बोलण्यापूर्वी विचार करा.
२)We got home before it was dark.
अंधार होण्यापूर्वी आम्ही घरी पोहोचलो.
३) They left immediately after they took their meal.
जेवण केल्यानंतर ते लगेच निघाले.
◆ BUT
6.BUT
१) It may seem strange to you but it is true.
तुला हे विचित्र वाटू शकतं पण हे खरं आहे. २) She went but he didn’t. ती गेली पण तो गेला नाही. ३) Not one but two boys beat him.
एकच नाही तर दोन मुलांनी त्याला मारलं.
४) He is but a child.
तो केवळ एक मुलगा आहे.
◆ not only – but also
• not only – but also
१) He can speak not only English but also French.
तो फक्त इंग्रजीच नाही तर फ्रेंच भाषाही बोलू शकतो.
२) Not only students but also teachers had come.
फक्त विद्यार्थीच नाही तर शिक्षकही आले होते.
३) He is not only lazy but also dirty. .
तो फक्त आळशीच नाही तर घाणेरडा सुद्धा आहे.
हे वाक्य इंग्रजीत रचना बदलून असेही म्हणता येईल:Not only is he lazy but also dirty.
◆ EITHER-OR/NEITHER – NOR
7 EITHER-OR/NEITHER – NOR
१) You can take either tea or coffee.
तुम्ही चहा किंवा कॉफी यापैकी एक घेऊ शकता. (= दोन्हीही नाही)
२) Either Ram or Sham has broken this mirror. .
राम किंवा शाम या दोघांपैकी एकाने हा आरसा फोडला आहे.
३) He neither ate nor drank.
त्याने खाल्लंही नाही, पिलंही नाही.
४) He eats neither fish, nor meat, nor eggs.
तो मासे, मास किंवा अंडी यापैकी काहीही खात नाही.
५) Neither my friend nor I know anything about it.
याबद्दल माझ्या मित्रालाही काही माहीत नाही, मलाही काही माहीत नाही.
● either-or/neither-nor ने जोडलेल्या कर्त्यासोबत येणारे क्रियापद नंतरच्या (म्हणजे or/nor नंतरच्या) कर्त्यानुसार असते.
उदा. Either you or I am wrong.
एकतर तुझं नाहीतर माझं चूक आहे.
Either you or he is wrong.
एकतर तुझं किंवा त्याचं चूक आहे.
Either Ram or his friends are wrong.
एकतर रामचं किंवा त्याच्या मित्रांचं – या दोघांपैकी कोणाचं तरी चूक आहे.
◆ HOWEVER
8.HOWEVER
१) He hadn’t studied at all, however he passed.
त्याने अभ्यासच केला नव्हता, तरीही तो पास झाला.
२) He treated me badly however I forgave him.
त्याने मला वाईटरित्या वागवलं तरीही मी त्याला माफ केलं.
◆ IF
9.IF
१) I am really sorry if I have offended you.
मी तुझं मन दुखवलं असेल तर मी खरंच दीलगीर आहे.
२) What if you don’t get this job?
तुला ही नोकरी मिळाली नाही तर कसं/तर काय?
३) If possible, we will go there.
शक्य असल्यास आपण तिथे जाऊ.
४) If necessary, we will meet him.
आवश्यक असल्यास, आपण त्याला भेटू.
● If I were….. = Werel…. मी असतो तर….
उदा. If I were a king, there would be no injustice.
मी राजा असतो तर, अन्याय राहिला नसता.
If चा उपयोग खालीलप्रमाणे का किंवा की नाही या अर्थानेही होतो:
१) I will see if he is inside.
तो आत आहे का मी बघतो. २) Ask him if he is ready.
तो तयार आहे का त्याला विचार.
◆ LEST-SHOULD
10.LEST – SHOULD
lest चा उपयोग should शिवाय सुद्धा होतो. जसे,
I make everything clear before him lest he misunderstands me.
माझ्याबद्दल त्याचा गैरसमज होऊ नये म्हणून मी त्याच्यासमोर प्रत्येक गोष्ट स्पष्ट करतो.
◆ WHEREAS
11.WHEREAS
When he got married, he was 45 whereas his wife was only 16.
जेव्हा त्याचं लग्न झालं तो ४५ वर्षांचा होता, तर त्याची पत्नी केवळ १६ वर्षांची होती.
◆ NOR
12.NOR
I will not go there – nor will I let you go there.
मी तिथे जाणार नाही – आणि तुला सुद्धा जाऊ देणार नाही.
◆ WHY
13.WHY
१) There is no reason why we should take his permission.
आपण त्याची परवानगी घेण्याचं काही कारण नाही.
२) There is no reason why I should love him.
मी त्याच्यावर प्रेम करण्याचं काही कारण नाही.
◆ NOW (THAT)
14.NOW (THAT)
१) Now (that) he has got a job, he gets very little free time.
आता (जेव्हा) त्याला नोकरी मिळाली आहे, त्याला खूप कमी रिकामा वेळ मिळतो.
२) Now (that) I have got my own bike, I don’t need to wait for
the bus.
आता माझ्याकडे स्वत:ची सायकल आहे, तर मला बसची वाट पहावी लागत नाही.
◆ OR
15.OR
१) Is it Thursday or Friday today?
आज गुरुवार आहे की शुक्रवार?
२) Are you joking or what? ?
तू गंमत करत आहेस की काय? ३) He cannot read or write.
तो वाचू शकत नाही आणि लिहू पण शकत नाही.
४) The match is starting in a minute or two.
सामना एक दोन मिनिटात सुरू होत आहे.
५) We should leave now or we will be late.
आपण आता निघायला पाहिजे नाहीतर आपल्याला उशीर होईल.
● or चा हा अर्थ जोर देऊन व्यक्त करण्यासाठी or च्या ठिकाणी or else चा उपयोग केला जाऊ शकतो. उदा:- We should leave now or else we will be late.
◆ OTHERWISE
16.OTHERWISE
१) we should leave now otherwise we will be late.
आपण आता निघायला पाहिजे नाहीतर आपल्याला उशीर होईल.
२) He never starts the class on time, but otherwise he is a good teacher.
तो क्लास वेळेवर कधी सुरू करत नाही. पण तेवढं सोडून/इतर बाबतीत तो चांगला शिक्षक आहे.
३) Don’t worry, I will inform him about this as soon as possible, by
phone or otherwise.
काळजी करू नकोस, मी त्याला याबद्दल लवकरात लवकर माहिती देईन, फोनवर किंवा दुसऱ्या प्रकारे.
◆ PROVIDED (THAT) / PROVIDING (THAT)
17.PROVIDED (THAT) / PROVIDING (THAT)
I will come with you provided / providing (that) my father
permits me. वडिलांनी परवानगी दिली तर मी तुझ्यासोबत येईन.
◆ SO
18.SO
१) He asked so I told.
त्याने विचारलं म्हणून मी सांगितलं.
२) I am not feeling well so I won’t go out tonight.
मला बरं वाटत नाही आहे म्हणून मी आज रात्री बाहेर जाणार नाही.
३) So that’s why you are always late!
तर यामुळे होतो तुला नेहमी उशीर !
४) So this is what you do when I am not here. (बरं) तर मी इथे नसताना तू हे करतोस.
(नुकत्याच कळलेल्या गोष्टीबद्दल बोलताना अशा प्रकारे so वापरतात)
५) So let us stop here.
तर आपण इथे थांबू या.
६) write down his address so (that) you won’t forget it.
त्याचा पत्ता लिहून घे – म्हणजे तू विसरणार नाहीस.
◆ SO THAT
19.SO THAT
१) He studied hard so that he might pass.
पास व्हावं म्हणून त्याने खूप अभ्यास केला.
२) He shut me in a room so that I couldn’t go out.
मला बाहेर जाता येऊ नये म्हणून त्याने मला खोलीत बंद करून टाकलं.
◆ THAT
20.THAT
१) It is true (that) he had come here.
हे खरं आहे की तो इथे आला होता. (की या अर्थाने that हा शब्द बोलण्यात बऱ्याचदा गाळला जातो.)
२) I am sure (that) he will come.
मला खात्री आहे की तो येईल.
३) I am so tired (that) I can’t even stand.
मी इतका थकलेला आहे की मी उभाही राहू शकत नाही.
४)I take regular exercise that I may stay healthy.
निरोगी राहण्याच्या उद्देशाने मी नियमित व्यायाम करतो.
५) I bought this book that I might learn English.
इंग्रजी शिकण्याच्या उद्देशाने मी हे पुस्तक विकत घेतलं.
६) We withdrew that the quarrel might stop.
भांडण थांबावं म्हणून आम्ही माघार घेतली.
(या अर्थाने that च्या ठिकाणी in order that सुद्धा वापरता येईल.)
◆ THOUGH
21.THOUGH
१) Though he was inexperienced, he got that job.
(जरी) तो अननुभवी होता तरी त्याला ती नोकरी मिळाली.
२) Strange though it seems, it is true. हे विचित्र वाटत असलं तरी खर आहे.
Though it seems strange, it is true.
◆ WHETHER
22.WHETHER
१) Whether you come or not, I am going.
तू ये किंवा येऊ नको, मी जात आहे.
२) Whether she likes it or not – this will be done.
तिला आवडो किंवा न आवडो-हे केलं जाईल.
३) I don’t know whether to go or not.
जावं की नाही मला कळत नाही.
४) No one can say whether this plan will be successful (or not).
ही योजना यशस्वी होईल की नाही कोणी सांगू शकत नाही.
५) I am not sure whether he will come here.
तो इथे येईल की नाही याची मला खात्री नाही.
उभयान्वयी अव्यये – Ambiguous preposition | Meaning in marathi | English Grammar in marathi