Talathi Bharti Exam Time Table 2023 : भूमी अभिलेख विभागाने तलाठी (गट-क) भरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत आयोजित केली जाणार आहे.
भूमी अभिलेख विभागाने तलाठी भरती परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. राज्यभरातून 4466 पदांसाठी 11 लाख 10 हजार 53 उमेदवार बसणार आहेत. या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे.
ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. त्यामध्ये सकाळी 9 ते 11, दुपारी 12.30 ते 2.30 आणि सायंकाळी 4.30 ते 6.30 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे.
उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र, मात्र तीन दिवस अगोदर हॉल तिकीट दिसणार आहेत.
पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान ५-६ दिवस आधी कळविण्यात येणार आहे. उमेदवारांनी आपले प्रवेशपत्रे काळजीपूर्वक तपासून घ्यावीत.
तलाठी भरती परीक्षा ही 200 गुणांची होणार असून त्या मध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी व अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी यावर 100 प्रश्न विचारले जातील.
परीक्षा टप्पे
पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट
दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर
२३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.
परीक्षा ठिकाण विद्यार्थांना त्यांच्या मेल आयडी व मेसेज द्वारे कळवण्यात येतील, त्यानंतर हॉल तिकीट महाभुमी च्या अधिकृत संकेस्थळावर उपलब्ध होतील.
तलाठी वेळापत्रक अधिकृत नोटिफिकेशन : येथे क्लीक करा