Maha Forest Recruitment 2023: वन विभाग भरतीला सुरुवात 2138+279 जागा, जाहिरात प्रसिद्ध

Maha Forest Recruitment 2023 : महाराष्ट्र वन विभाग मार्फत राज्यात एकूण 2318 रिक्त वनरक्षक व अजून इतर 279 पदे भरण्यासाठी मोठी मेगा भरती करण्यासाठी जाहिरात प्रदर्शित केली आहे. येत्या १० जून ते ३० जून पर्यंत पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वन भरतीचे इतर तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यदा, वेतन व अभ्यासक्रम खालीलप्रमाणे,

महाराष्ट्र वन विभाग भरती माहिती – Maha Forest Recruitment 2023

अनेक वर्षांपासून, स्थगित असलेल्या वन भरती ला अखेर सुरुवात, शेवटी राज्यात २३१८ पदासाठी मोठी भरती होणार, त्यासाठी नुकताच सरकारने जाहिरात प्रदर्शित केली असून १० जून ते ३० जून २०२३ दरमान्य ऑनलाईन अर्ज करण्यात येणार आहे. लवकरच ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार असून एकूण जागा व शैक्षणिक माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कोणती पदे भरणार :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Maharashtra Van Vibhag Vacancy 2023
पदाचे नाव रिक्त जागा
लघुलेखक (उच्चश्रेणी) / Stenographer 13
लघुलेखक (निम्नश्रेणी) / Stenographer 23
(कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Jr. Engineer (Civil)08
वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक / Sr. Statistics Assistant05
कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक / Jr. Statistics Assistant15
सर्वेक्षक / Surveyor86
लेखापाल / Accountant129
वनरक्षक / Forest Guard2138
एकूण 2417

वन विभाग भरती शैक्षणिक पात्रता : Education Qualification

PostEducation Qualification
लघुलेखक (उच्चश्रेणी)माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट

इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.

मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
लघुलेखक (निम्नश्रेणी))माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिटइंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा

मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियंत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अर्हता धारण करणे आवश्यक आहे.

मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यकउमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा

मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी धारण करणे आवश्यक आहे.

मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यकउमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयात पदवी धारण करणे आवश्यक आहे

मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
सर्वेक्षकउमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) उत्तीर्ण केलेली असावी.मान्यता प्राप्त संस्थेचे सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र धारण केलेले असावे

मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
वनरक्षकउमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.

अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.

माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा- यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
लेखापालउमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणे आवश्यक आहे.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

Forest Recruitment Official Page : – वनरक्षक भरतीचे अधिकृत जाहिरात डाउनलोड व अर्ज येथे करा

वन भरती वयोमर्यादा :

वनरक्षक पदासाठी वयोमर्यादा

  • सर्वसाथारण प्रवर्ग: 18 ते 27
  • मागास प्रवर्ग: 18 ते 32

इतर पदासाठी वयोमर्यादा

  • सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 40 वर्षे
  • मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे

शारीरिक पात्रता : Physical Criteria For Forest Guard

पुरुष महिला
उंची163 सेमी150 सेमी
छाती79 सेमी (84 सेमी फुगवून)लागू नाही
वजनवैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणातवैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात

महाराष्ट्र वनरक्षक वेतन : Forest Guard Salary

नवीन GR नुसार वन भरती वेतन श्रेणी – 21700 ते 69100 रुपये /- असेल

जिल्हानिहाय रिक्त पदे – वनरक्षक भरती – Forest Guard District Wise Vacancies

विभाग – जिल्हा रिक्त
नागपूर277
चंद्रपूर122
गडचिरोली200
अमरावती250
यवतमाळ79
औरंगाबाद73
नांदेड10
नंदुरबार82
धुळे96
जळगाव68
अहमदनगर11
नाशिक88
पुणे73
ठाणे310
पालघर150
कोल्हापूर249
एकूण2138

वन रक्षक भरती निवड प्रक्रिया :

  • ऑनलाईन परीक्षा – पात्र उमेदवारांची १२० गुणांची ऑनलाईन परीक्षा TCS कंपनी द्वारे घेण्यात येणार. परीक्षा स्वरूप खालीलप्रमाणे
  • परीक्षा निकाल
  • कागदपत्रे तपासणी, शारीरिक मोजमाप व धाव चाचणी – ऑनलाईन परीक्षेत किमान ४५% गुण प्राप्त उमदेवारांना बोलवण्यात येईल

वन रक्षक लेखी परीक्षा स्वरूप :

अ क्रविषयप्रश्नांची संख्यागुण
1मराठी भाषा१५३०
2इंग्रजी भाषा१५३०
3सामान्य ज्ञान१५३०
4बौद्धिक चाचणी१५३०
एकूण६०१२०

वनरक्षक भरती अभ्यासक्रम येथे डाउनलोड करा .

वन भरती अर्ज कसा करावा : Forest Guard Application

भवन रतीचा द्राफ्ट जाहिरात आली असून याच १० जून ते ३० जून पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रक्रिया होणार असून वन विभागाचे अधिकृत संकेतस्तळं https://mahaforest.gov.in/ यावर उपलब्ध करण्यात येईल

वनरक्षक भरतीचे जुने पेपर्स डाउनलोड करा

वन विभाग जाहिरात डाउनलोड करा (Forest Guard Advertisement )

2 thoughts on “Maha Forest Recruitment 2023: वन विभाग भरतीला सुरुवात 2138+279 जागा, जाहिरात प्रसिद्ध”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा