Marathi Barakhadi / Varnamala : In this article we will see Marathi Barakhadi as well Varnmala, Swaradi, Swar, Vyanjan with their charts.
मराठी भाषेमधील वर्णमाला त्याचे प्रकार, मराठी , मुळाक्षरे, वर्णमाला स्वर, स्वरादी, व्यंजन, चार्ट , आणि एकूण स्वर, व्यंजन, स्वरादी किती असतात ते खालील नोट्स मध्ये बघा. त्याच बरोबर मराठी वर्णमाला ची PDF सुधा उपलब्ध आहे.
सर्वप्रथम आपण वर्णमाला / Marathi Alphabets म्हणजे काय असते ते बघुया.
मराठी वर्णमाला / मुळाक्षरे : वर्णमाला (Varnamala) म्हणजे वर्णांचा संच आणि वर्ण म्हणजे आपण जे तोंडा द्वारे मूलध्वनी काढतो त्याला वर्ण म्हणतात.
मराठी वर्णमाला / मुळाक्षरे माहिती
मराठी भाषेमध्ये एकूण 52 वर्ण / मुळाक्षरे [ Mulakshare ] आहेत व मराठी वर्णांचे एकूण तीन प्रकार पडतात. खाली पूर्ण मराठी वर्णमाला दिली आहे.
मराठी वर्णमालेमध्ये 14 स्वर [ Swar ], 2 स्वरादी [Swaradi], 34 व्यंजने [Vyanjane] व 2 विशेष संयुक्त व्यंजने हे (क्ष, ज्ञ) आहेत. मराठी वर्णमाळेमद्धे 14 स्वर +2 स्वादरदी +34 व्यंजने +2 विशेष संयुक्त व्यंजने = असे एकूण 52 वर्णमाले आहे.
मराठी बाराखडी खालीलप्रमाणे [Marathi Barakhadi]
अ, आ, ॲ, ऑ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऌ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः
क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ
मराठी वर्णाचे / मुळाक्षरे चे एकूण ३ प्रकार आहेत.
- स्वर / Swar (Vowel)
- स्वरादी / Swaradi
- व्यंजन /Vyanjan (Consonant)
मराठी स्वर (Swar)
वर्णमाला स्वरांचा उच्चार होत असताना ओठांच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली होत असतात, पण ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखाबाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर /swar असे म्हणतात
स्वरांचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या साहाय्यावाचून होतो.
मराठी भाषेमध्ये एकूण 14 स्वर आहेत. – Marathi Swar
अ, आ, ॲ, ऑ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऌ, ए, ऐ, ओ, औ
पारंपरिक मराठी वर्णमालेमध्ये एकूण 12 स्वर होते. आधुनिक मराठी वर्णमालेमद्धे सुद्धा एकूण 14 स्वर आहेत.
मराठी स्वरांचे ३ प्रकार पडतात
- र्हस्व स्वर
- दीर्घ स्वर
- संयुक्त स्वर
र्हस्व स्वर Raswa swar
ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो, म्हणजे ज्यांचा उच्चार करायला थोडाच वेळ लागतो त्यांना र्हस्व स्वर असे म्हणतात.
र्हस्व स्वर उदाहरण (Example) : अ, इ, उ, ऋ, लू
दीर्घ स्वर
ज्या स्वरांचा उच्चार करायला अधिक वेळ लागतो म्हणजेच त्यांचा उच्चार लांबट होतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात.
दीर्घ स्वर उदाहरण: आ, ई, ऊ
संयुक्त स्वर –
दोन स्वर एकत्र येऊन जे स्वर तयार होतात त्यांना संयुक्त स्वर असे म्हणतात.
संयुक्त स्वर उदाहरण :
- ए = अ + इ/ई
- ऐ – आ+इ/ई
- ओ – अ+उ/ऊ
- औ – आ+उ/ऊ
सजातीय स्वर
एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.
सजातीय स्वर उदाहरण: अ-आ, उ-ऊ, ओ-औ, इ-ई, ए-ऐ
विजातीय स्वर
भिन्न उच्चारस्थानांतून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.
विजातीय स्वर उदाहरण: अ-ई, उ-ए, ओ-ऋ
मराठी म्हणी व त्यांचे अर्थ बघा
मराठी स्वरादी
अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णाच्या आधी स्वर येतो म्हणून त्यांना वर्णमाला स्वरादी असे म्हणतात. ज्याचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात.
स्वरादी म्हणजे स्वर आहे आदी म्हणजे आरंभी ज्याच्या असा वर्ण.
मराठी मध्ये एकूण दोन मूळ स्वरादी आहेत व त्या खालील प्रमाणे आहेत.
अं – () – अनुस्वार
अः – (:) – विसर्ग
इंग्रजीतून घेतलेले २ स्वरादी : अँ, आँ
मराठी व्यंजन – Marathi Vyanjan
ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही तसेच या वर्णाचा उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी ‘अ’ या स्वराचे साहाय्य घ्यावे लागते, अशा वर्णांना व्यंजने (Vyanjan) असे म्हणतात.
ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण होण्यास शेवटी स्वरांची मदत घेतली जाते त्यांना व्यंजन/स्वरान्त/परवर्ण असे म्हणतात.
मराठीत एकूण 34 व्यंजन आहेत.
Marathi Vyanjan Worksheets पुढील प्रमाणे आहे.
क्, ख्, ग्, घ्, ङ् च्, छ्, ज्, झ्, ञ् ट्, ठ्, ड्, ढ्, ण् त्, थ्, द्, ध्, न् प्, फ्, ब्, भ्, म् ,य् , र्, ल्, व्, श्, ष्, स् , ह् , ळ्
विशेष संयुक्त व्यंजने : ह्या विशेष संयुक्त व्यंजने मध्ये क्ष् , ज्ञ् हे दोन अक्षर आहे.
मराठी व्यंजनाचे प्रकार
स्पर्श व्यंजन
वर्णमालेतील क, ख पासून भ, म पर्यंतच्या व्यंजनोच्चारात आपल्या फुप्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जीभ, कंठ, तालू, मूर्धा, दात किंवा ओठ यांच्याशी तिचा स्पर्श होऊन हे वर्ण उच्चारले जातात, म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात.
एकूण २५ स्पर्श व्यंजने आहेत.
स्पर्श व्यंजन उदाहरण: क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, द, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म
कठोर व्यंजन
प्रत्येक वर्गातील पहिली दोन व्यंजने यांचा उच्चार करताना अधिक स्पर्श होतो म्हणून त्यांना कठोर व्यंजने म्हणतात.
कठोर व्यंजन उदाहरण: क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ
मृदू व्यंजन
प्रत्येक वर्गातील तिसरे व चौथे व्यंजन यांचा उपचार करताना थोडासाच स्पर्श होतो. तसेच जे उच्चारायला कोमल किंवा मृदु त्यांना मृदू व्यंजने असे म्हणतात .
मृदू व्यंजन उदाहरण: ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब ,भ
अनुनासिक/पर-सवर्ण
प्रत्येक वर्गातील शेवटचे व्यंजन यांचा उच्चार नासिकेतून म्हणजे नाकातूनही होतो म्हणून त्यांना अनुनासिक म्हणतात.
अनुनासिक/पर-सवर्ण व्यंजन उदाहरण: ड, त्र, ण, न, म
अर्धस्वर/अंतस्थ
य, र, ल, व, या व्यंजनांचा उच्चार जवळपास स्वरांसारखाच होतो त्यांना अर्धस्वर असे म्हणतात. तसेच ही व्यंजने स्पर्श व्यंजने व ऊष्मे यांच्यामध्ये येतात म्हणून त्यांना अंतस्थ (दोहोंच्यामध्ये असलेले) म्हणतात.
उम्मे/घर्षक
श, ष, स यांना उध्मे म्हणतात. ऊश्मन वायू मुखावाटे जोराने बाहेर टाकल्याप्रमाणे या वर्णाचा उच्चार होतो, यात घर्षण आहे. घर्षणामुळे उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना उमे म्हणतात.’
महाप्राण आणि अल्पप्राण
ह् या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते. अशा ह् मिसळून तयार होणाऱ्या वर्णांना महाप्राण असे म्हणतात.
श्, ष्, स् यांचा उच्चारही वायुच्या घर्षणाने होतो, म्हणून त्यांनाही महाप्राण असे म्हणतात.
एकूण १४ वर्ण महाप्राण मानले जातात. उरलेल्या वर्णांना अल्पप्राण असे म्हणतात.
• महाप्राण – ख्, घ्, छ्, झ्, ठ्, ढ्, थ्, ध्, फ्, भ्, श्, ष, स्, ह्
• अल्पप्राण – क्, ग्, ङ्, च्, ज्, ञ्, ट्, ड्, ण् त्, द्, न्, प्, ब्, म्, य्, र्, ल्, व्, ळ्
स्वतंत्र वर्ण
छ हे स्वत्रंत्र वर्ण/ मुळाक्षर आहे .
संयुक्त व्यंजन
क्ष व ज्ञ हे मूलध्वनी नसून ही संयुक्त व्यंजने आहेत.
क्ष = क + + अ
ज्ञ = द्++ य
मराठी उच्चारस्थानानुसार वर्ण
कंठ्य वर्ण
कंठातून निघणाऱ्या वर्णाना कंठ्य वर्ण म्हणतात.
कंठ्य वर्ण उदाहरण: अ, आ, क, ख, ग, घ, ङ, ह
तालव्य वर्ण:
तालूच्या पुढील भागाला कठोर तालू म्हणतात, जिभेचे टोक कठोर तालूला लावून ज्या वर्णाचे उच्चार होतात त्यांना तालव्य महणतात.
तालव्य वर्ण उदाहरण : इ.ई, च, छ, ज, झ, त्र, य, श
मूर्धन्य वर्ण
कठोर तालू व कोमल तालू (तालू व कंठ) यांच्या मधल्या भागाला मूर्धा म्हणतात. जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचा शेंडा या मूर्धला चिकटतो त्यांना मूर्धन्य वर्ण म्हणतात.
मूर्धन्य वर्ण उदाहरण : ऋ, ट, ठ, ड, ढ, ण, र, ष, ळ
दंत्य वर्ण
जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचे टोक वरच्या दातांच्या मागच्या बाजूस टेकते त्यांना दंत्य वर्ण म्हणतात.
दंत्य वर्ण उदाहरण : लू, त, थ, द, ध, न, ल, स
ओष्ठ्य वर्ण
खालच्या व वरच्या ओठांचा अयोग करून जे वर्ण उच्चारले जातात त्यांना ओष्ठ्य वर्ण म्हणतात.
ओष्ठा वर्ण उदाहरण : उ, ऊ, प, फ, ब, भ, म
कंठतालव्य वर्ण
कंठ + तालू चा उपयोग करून जे वर्ण विचारले जातात त्याला कंठतालव्य वर्ण म्हणतात.
कंठतालव्य वर्ण उदाहरण : ए, ऐ
कंठौष्ठ्य वर्ण
कंठ + ओष्ठ चा उपयोग करून जे वर्ण विचारले जातात त्याला कंठौष्ठ्य वर्ण म्हणतात.
कंठोष्ठ्य वर्ण उदाहरण : ओ, औ
दंतौष्ठय वर्ण
दंत + ओष्ठ चा उपयोग करून जे वर्ण विचारले जातात त्याला दंतौष्ठय वर्ण म्हणतात
दंतौष्ठय वर्ण उदाहरण : व
दंततालव्य वर्ण
कठोर तालूचा दातांकडील फुगीर व खरचरीत असा जो भाग असतो त्याला वर्क्स म्हणतात. हा दात व तालू यांच्या मधला भाग होय. तेथे उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनीना वर्ल्स ध्वनी म्हणतात, यांनाच दंततालव्य म्हणतात.
दंततालव्य वर्ण उदाहरण: च, छ, ज, झ
या मध्ये आपण सर्व मराठी बाराखडी म्हणजेच मराठी वर्णमाला मुळाक्षरे बघितले आहे , तुम्हाला आवडली असल्यास कंमेंट करून कळवा .
नक्की वाचा: संपूर्ण मराठी व्याकरण नोट्स
Super information
एकूण महाप्राण व अल्पप्राण किती व कोणते आहेत?
मराठी भाषेत ‘पत्र’ या शब्दातील ‘त्र’ हे अक्षर व्यंजन आहे की जोडाक्षर(जोडशब्द) आहे?
जोडाक्षर आहे. त + र = त्र.
Jodakshar
जोडशब्द
बढिया मिशन सर्व अभ्यासु विद्यार्थी मित्रांनी हे वाचायला हवं 💯
🥰🥰मराठी व्याकरण किंवा इतर कोणत्याही विषयावरील व्याकरण हे खुप emportent असते . म्हणून हे सर्व विद्यार्थ्यांनी मना पासून वाचलं पाहिजे🥰🥰
हो अगदी बरोबर
मराठी भाषेत एकूण १६ स्वर असतांना १४ कां दिलेत.२ स्वर जसे कीं ऋृ लृृ हे कां दिले नाहीत. मी जे शिकलो आहे तें १६ स्वर व ३६ व्यंजने असे आहेत. नक्की काय आहे? व्यंजनांच क्ष आणि ज्ञ चा उल्लेख काँग्रेस झाला नाही .माहिती व्हावी हीच अपेक्षा.
हे व्याकरण mpsc साठी उपयुक्त आहे काय??
मराठी व्याकरण चांगले समजावले आहे.