- जन्म : २८ मे १८८३
- मृत्यू : २६ फेब्रूवारी १९६६
- पूर्ण नाव : विनायक दामोदर सावरकर
- वडील : दामोदर
- आई : राधाबाई
- जन्मस्थान : भगूर (जि. नाशिक, महाराष्ट्र)
- शिक्षण : इ. स. १९०५ मध्ये मुंबई विद्यापीठातून बी. ए. ची पदवी संपादन. इ. स. १९०६ मध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले. परीक्षेत उत्तीर्ण होऊनसुद्धा क्रांतिकारक असल्याकारणाने बॅरिस्टरची पदवी देण्याचे लांबविण्यात आले.
- विवाह: माईसोबत (इ. स. १९०१)
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य
शालेय शिक्षण घेत असतानाच सावरकरांनी इ. स. १९०० मध्ये ‘मित्रमेळा’ नावाची संघटना स्थापन केली. पुढे इ.स. १९०४ मध्ये मित्रमेळ्याचे ‘अभिनव भारत’ या संघटनेत रूपांतर झाले.
इ.स. १९०५ साली बंगालच्या फाळणीविरूद्ध स्वदेशी बहिष्काराची चळवळ सुरू झाली. त्या वेळी विनायक सावरकरांनी पुण्याला गाडीभर विदेशी कपडे जमवून, त्यांची मिरवणूक काढून संभाजी पुलाजवळ विदेशी कापडांची प्रचंड होळी केली. तेथे लोकमान्य टिळक, शिवरामपंत परांजपे आणि स्वतः सावरकर यांची सूर्तिदायक भाषणे झाली.
इ. स. १९०६ मध्ये श्यामजी कृष्णा वर्मा यांची शिष्यवृत्ती घेऊन बॅरिस्टर होण्यासाठी ते इंग्लंडला गेले.
लडनच्या ‘इंडिया हाऊस’ मध्ये भारतीय क्रांतिकारकांच्या सभा होऊ लागल्या.
त्या सभाचे आयोजन सावरकर करू लागले. शस्त्रास्त्रे जमविण्याची मोहीम, बाँम्ब बनविण्याचे तंत्र, भारतात गुप्तपणे पिस्तुल पाठविणे इत्यादी कार्यामुळे ‘इंडिया हाऊस’ भारतीय क्रांतिकारकांच्या चळवळीचे केंद्रच बनले.
सावरकरांनी या काळात ‘जोसेफ मॅझिनी’ या नावाचे मॅझिनी या इटालियन देशभक्ताचे चरित्र, १८५७ चे भारतीय स्वातंत्र्यसमर’ इत्यादी महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले.
इ. स. १९०७ मध्ये जर्मनीत आंतरराष्ट्रीय सोशालिस्ट काँग्रेस भरली. तिला सावरकरांच्या प्रेरणेने मादाम कामा गेल्या व भारताचा तीन रंगी स्वतंत्र ध्वज त्यांनी तेथे प्रथमच फडकवला. या ध्वजावर तांबड्या, केशरी व हिरव्या रंगाचे तीन आडवे पट्टे होते. मधल्या पट्ट्यावर ‘वंदे मातरम्’ हे शब्द लिहिलेले होते.
वरच्या पट्ट्यावर आठ कमळे होती व तळच्या पट्ट्यावर सूर्य व चंद्रकोर काढलेली होती.
रशियन क्रांतिकारकांकडून बॉम्ब तयार करण्याची विद्या शिकण्यासाठी त्यांनी हेमचंद्र दास आणि सेनापती बापट यांना फ्रान्सला पाठविले. त्यांच्यामार्फत ही विद्या भारतात आली.
इकडे नाशिकला त्यांचे वडील बंधू गणेशपंत ऊर्फ बाबा सावरकर यांना अभिनव भारताच्या ‘मित्रमेळ्या तील देशभक्तीपर गीतांबद्दल इ.स. १९०९ साली जन्मठेपेची शिक्षा जॅक्सन या इंग्रज न्यायाधीशाने सुनावली. या शिक्षेचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्हेरे या युवकाने नाशिक येथे जॅक्सनची हत्या केली. सरकारे अभिनव भारत संघटनेशी संबंधित असलेल्या लोकांना अटक करण्यास सुरुवात केली. जॅक्सनच्या हत्येचा संबंध सरकारने विनायक दामोदर सावरकरांशी जोडला.
सावरकरांना लंडनला पकडून मोरिया बोटीने भारतात पाठविण्यात आले. वाटेत फ्रान्समधील मार्सेलिसजवळ त्यांनी बोटीतून समुद्रात उडी मारली आणि फ्रान्सचा किनारा गाठला. पण फ्रेंच पोलिसांनी त्यांना आश्रय देण्याऐवजी इंग्रजांच्या ताब्यात दिले.
भारतात सावरकराना आणून त्यांच्यावर खटला भरण्यात आला.
न्यायालयाने त्यांना पन्नास वर्षाची (दोन जन्मठेपेची) सश्रम कारावासाची शिक्षा दिली. ती भोगण्यासाठी त्यांना अंदमानला पाठविण्यात आले. तेथे त्यांना अमानुष शिक्षा भोगावी लागली. सुरुवातीला वर्षभर अंधारकोठडीत ठेवण्यात आले.
त्यानंतर हातापायांत बेड्या ठोकून अंदमान येथेच तुरुंगात ठेवण्यात आले. तुरुंगात त्यांच्यावर अनेक बंधने होती आणि रात्रंदिवस कष्टाची कामे करावी लागत होती.
अशा परिस्थितीतही सावरकरांनी विविध प्रकारची साहित्यनिर्मिती केली.
त्याचबरोबर तुरुंगात असताना त्यांनी शुद्धीकरणाची चळवळ सुरू केली होती.
इ.स. १९२४ मध्ये सावरकरांना रत्नागिरीत स्थानबद्ध म्हणून ठेवण्यात आले.
राजकारणात भाग घ्यायचा नाही आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत राहायचे या अटीवर सुटका झाली. तेव्हा वर्षे हिंदूसंघटन, अस्पृश्यता निवारण, शुद्धीकरण या चळवळी केल्या. रत्नागिरीत सर्वांना खुले असलेले पतितपावन मंदिर उभारले.
इ. स. १९३७ मध्ये सावरकरांची बिनशर्त मुक्तता झाली. त्याच वर्षी हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.
इ.स. १९३८ मध्ये मुंबई येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी सैनिकीकरणाची चळवळ केली. तिचा फायदा आझाद हिंद सेनेला मिळाला. त्या सेनेचे निर्माते नेताजी सुभाषचंद्र बोस सावरकरांना मुंबईला भेटून गेले होते.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. आपण ज्यासाठी झगडलो ते भारताचे स्वातंत्र्य ‘याचि देही याचि डोळा’ पाहायला मिळाल्याबदल त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. सावरकर हे ‘अखंड भारता’चे पुरस्कर्ते होते. देशाच्या फाळणीला त्यांचा तीव्र विरोध होता. पाकिस्तानच्या निर्मितीबद्दल त्यांनी काँग्रेस जबाबदार धरले होते.
१० मे १९५२ रोजी पुण्याला त्यांनी ‘अभिनव भारत’ ही संस्था विसर्जित करून टाकली. कारण तिचा स्वातंत्र्य मिळविणे हा हेतू साध्य झाला होता.
दुनियेतील पहिले असे कवी ज्यांनी अंदमानच्या एकांत कारागृहात भीतींवर खीळ आणि कोळशाने कविता लिहिल्या आणि त्या पाठ केल्या. या प्रकारे पाठ केलेल्या 10 हजार ओळी त्यांनी जेलहून सुटल्यावर पुन्हा लिहिल्या.
ग्रंथसंपदा
माझी जन्मठेप १८५७ चे भारतीय स्वातंत्र्यसमर, जोसेफ मॅझिनी चरत्र, हिंदू पदपादशाही, काळे पाणी, सन्यस्त खड्ग. हिंदुत्व इत्यादी ग्रंथ व तसेच ‘कमला हा काव्यसंग्रह.
सन्मान
नागपूर विद्यापीठाद्वारे ‘डी. लिट.’ पदवी.
विशेषता
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सावरकरांनी बजावलेल्या महान कामगिरीबद्दल त्यांना
‘स्वातंत्र्यवीर’ म्हणून गौरविले जाते.
Very nice information keep it up 👍😊