● काळांचा क्रम ( The sequence
of tenses ) | Tenses in marathi – English Grammar
● एकाच वाक्यात दोन भाग असल्यास पहिला भाग कोणत्या काळाचा असेल तर दुसरा भाग कोणत्या काळाचा असावा याबद्दल दोन नियम आहेत. हे नियम मोडल्यास वाक्य व्याकरणदृष्ट्या चुकतं. अशी चूक टाळण्यासाठी खालील नियमांकडे लक्ष द्या.
● पुढे नियमांमधे पहिला भाग व दुसरा भाग असा उल्लेख केला जाईल तेव्हा पहिल्या भागाचा अर्थ वाक्यातील मुख्य भाग (Principal clause) व दुसऱ्या भागाचा अर्थ ‘मुख्य भागावर अवलंबून असलेला भाग’ (Subordinate clause) असा काढावा.
● नियम १:- इंग्रजीमधे वाक्यातील पहिला भाग भूतकाळाचा असेल तर दुसरा भाग सुद्धा भूतकाळाचाच असतो.
• १) I knew that he would come. (पहा – I know that he will come)
• २) I did all that was possible.
• ३) Oh, I didn’t know he was married.
• ४) The doctor took his pulse and said there was nothing to worry about. .
• ५) He studied hard so that he might pass the exam.
● मात्र या नियमाला दोन अपवाद आहेत.
● पहिला अपवाद म्हणजे जर दुसऱ्या भागात त्रिकालाबाधित नैसर्गिक सत्य असेल तर पहिला भाग भूतकाळाचा असला तरी दुसरा भाग वर्तमानकाळाचा असू शकतो. जसे,
● Our father taught us that honesty is always the best policy.
● दुसरा अपवाद म्हणजे वाक्यातील दुसरा भाग जर than ने सुरू होत असेल तर than
नंतरचा भाग जसा अर्थ अभिप्रेत आहे त्यानुसार कोणत्याही काळाचा असू शकतो.
जसे, I helped you more than I help my own brother.
I helped you more than I helped my own brother.
● नियम २:- वाक्यातील पहिला भाग वर्तमानकाळाचा किंवा भविष्यकाळाचा असल्यास नंतरचा दुसरा भाग जसा अर्थ अभिप्रेत आहे त्यानुसार कोणत्याही काळाचा असू शकतो.
• उदा. I am sure that he goes there.
• I am sure that he went there.
• I am sure that he will go there.
• She will say that he goes there.
• She will say that he went there.
• She will say that he will go there.
पण जेव्हा दुसऱ्या भागात ‘उद्देश’ व्यक्त केलेला असतो तेव्हा पहिला भाग वर्तमानकाळाचा किंवा भविष्यकाळाचा असल्यास दुसरा भाग वर्तमानकाळाचाच असतो.
• उदा. We eat so that we may live.
We will ask him so that we may know.