या पोस्ट मध्ये तुम्हाला तलाठी पदाशी निगडीत (Talathi Information in Marathi ) अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे, जी तुम्हाला सर्व परीक्षेसाठी उपयुक्त आहे.
तलाठी पदाबद्दल संपूर्ण माहिती : Talathi Information in Marathi
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ७(३) नुसार प्रत्येक सजाकरिता एक किंवा अधिक तलाठी नेमले जातात. तहसीलदारालाच ‘मामलेदार’ असेही म्हंटले जाते.
1918पासून शाहू महाराजानी पगारी तत्त्वावर तलाठी नेमण्यास सुरवात केली होती.
तलाठ्यांची नेमणूक करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यास आहेत. तलाठी पदाची निवड स्पर्धा परीक्षांद्वारे केली जाते.
तलाठ्याच्या कार्यालयास ‘सजा’ असे म्हणतात. प्रतेक सजा करीता एक किवा अनेक तलाठी असतात.
तलाठी हा ग्रामीण मुलकी प्रशासनातील ग्रामस्तरावरील महसूल खात्याचा वर्ग – ३ चा कर्मचारी असतो. म्हणजेच तलाठी हे गट ‘क’ प्रकारचे पद आहे.
तलाठ्यावर नजिकचे नियंत्रण सर्कल ऑफिसरचे (मंडल अधिकारी) व तद्नंतर तहसीलदाराचे असते.
महसूल खात्याचे गावपातळीवरील दप्तर तलाठी सांभाळतो. जमीन महसूलाबाबत कोणताही अर्ज सर्वप्रथम तहसीलदार बघतो. त्यावर योग्य तो निर्णय घेऊन मग तो पुढे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जातो.
गावाचा नमुना क्र. ७-१२, ८ अ इत्यादींशी तलाठी संबंधित आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी गाव पातळीवर निश्चित केलेली नोंदणी पुस्तके, अभिलेख ठेवण्याचे कार्य तलाठी करतो.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ नुसार गाव पातळीवरील महसूलविषयक कामांची जबाबदारी तलाठी पार पाडतो.
गावपातळीवर महसूल, तगाई वसुली, दुष्काळ इत्यादी कार्यांशी तलाठी संबंधित आहे.
गावपातळीवर कुटुंबनियोजन कार्यक्रम यशस्वी करण्याची प्राथमिक जबाबदारी तलाठ्यावर असते.
गावपातळीवर जमीन महसूल थकबाकीदार व जमिनीच्या अधिकारपत्राची नोंद ठेवण्याची जबाबदारी तलाठ्याची असते.
गावपातळीवर पीक पाण्याची नोंद तलाठी करतो.
गावातील महसूल गोळा करण्याचे अधिकार तलाठ्यास आहेत.
गावपातळीवर शेतजमीनीचा आकार ठरविण्याचा अधिकार तलाठ्यास आहे.
गावातील जमीनधारकांच्या नोंदी ठेवण्याचे काम तलाठी करतो.
तहसीलदाराने निश्चित केलेली पिकांची आणेवारी तलाठी राबवतो.
गावपातळीवर कौटुंबिक शिधापत्रिका (रेशन कार्ड) वितरित करण्याचे कार्यदेखील तलाठी पार पाडतो.
गावपातळीवर निवडणूक यंत्रणेतील एक घटक या नात्याने निवडणुकीसंदर्भात सोपवलेली कामे पार पाडण्याची जबाबदारी तलाठ्यावर असते.
तहसीलदार, जिल्ह्याचा महसूल अधिकारी किंवा पोलिस अधिकारी यांच्या आदेशानुसार गावपातळीवरील मरणोत्तर चौकशीचे प्रतिवृत्त, फौजदारी प्रकरणातील जबानी व तपासणी इ. कामकाजाशी तलाठी संबंधित आहे.
तलाठ्यास गैरवर्तणुकीबद्दल शासन करण्याचे अधिकार उपजिल्हाधिकारी किंवा प्रांत अधिकाऱ्यास असतात.
गावपातळीवर तलाठी दप्तरात महसूल खात्याशी संबंधित माहिती २१ प्रकारच्या गाव नमुन्यात ठेवण्यात येते.
सातबारा (७/१२) उतारा -अधिनियम, १९६६ नुसार २१ विविध प्रकारचे ‘गाव नमुने’ तलाठी सज्जात ठेवलेले असतात.