तलाठी भरतीत राज्यात एकच परीक्षा – एकाच दिवशी पेपर, 4625 जागा

तलाठी भरती २०२३ – महसूल विभागातर्फे राज्यात होणाऱ्या तलाठी भरती लवकरच जाहीर करण्यात येणार असून, या भरतीसाठी राज्य स्तरावर एकच परीक्षा होणार असे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर उमेदवार हा एकाच जिल्ह्यसाठी अर्ज करू शकतो.

महसूल विभागातील क गटातील पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यास परवानगी शासनाने दिली आहे. तलाठी भरती ची प्रारूप जाहीर करण्यात आले आहे. राज्यात एकूण 4625 तलाठ्यांची पद रिक्त असून, त्यासाठी ही मेगा भरती होणार आहे. राज्याच्या जमाबंदी आणि भूमी अभिलेख विभागाने येत्या 20 जूनपासून भरतीसाठी लिंक खुली करण्याची परवानगी शासनाला मागितली आहे. लिंक खुली झाल्यानंतर उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

आत्तापर्यंत तलाठी भरती प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका काढून परीक्षा घेण्यात येत होती. मात्र, यंदा भूमी अभिलेख विभागाने भरती आणि परीक्षेची कार्यवाही करण्याचे काम TCS कंपनीला दिले आहे. तलाठी भरतीसाठी घेण्यात येणार्‍या परीक्षेकरिता अभ्यासक्रमही निश्चित करण्यात आला असून, संपूर्ण राज्यातील परीक्षार्थींसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तलाठी भरती तयारी साठी जुन्या 100+ प्रश्नपत्रिका डाउनलोड करा

तलाठी भरती अर्ज लिंक ओपन झाल्यावर नोंदणी करता 21 दिवसांचा मुदत कालावधी असणार आहे. राज्यभरातून किमान पाच ते आठ लाख विद्यार्थी उमेदवार ही परीक्षा देतील, असा अंदाज आहे. त्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया करून 17 ऑगस्ट किंवा 12 सप्टेंबर या दिवशी परीक्षा घेण्याची तयारी दाखवण्यात आली आहे.

संदर्भ – पुढारी

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा