SWCD Recruitment 2023 : मृद व जलसंधारण विभागांतर्गत मोठी पदभरती लवकरचं

Soil and Water Conservation Department, Maharashtra Recruitment 2023 : मृद व जलसंधारण विभागांतर्गत राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील 670 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.

The Minister of Soil and Water Conservation, Sanjay Rathod, has announced that the department is conducting a recruitment process for 670 posts of Water Conservation Officer (Civil) Group-B (Ungazetted) in the state-level and district council-level machinery.

Mrudu and Jalasandharan Vibhag Bharti 2023

मंत्री श्री. राठोड म्हणाले की, शासन अधिसूचना दि.21 सप्टेंबर 2021 नुसार जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट- ब (अराजपत्रित) या पदांचे सेवाप्रवेश नियम अधिसूचित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार आयुक्त, मृद व जलसंधारण, औरंगाबाद हे या भरती प्रक्रियेचे नियुक्ती प्राधिकारी आहेत. या अनुषंगाने आयुक्त, मृद व जलसंधारण, औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली राज्य निवड समितीची स्थापना करण्यात आली आहे. या पद भरतीकरिता टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस या कंपनीसोबत करारनामा केला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या परीक्षेसाठी अभ्यासक्रमास तत्काळ मान्यता देऊन परीक्षेसाठी वेळ निश्चित करुन पद भरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी एकूण 200 गुणांची परीक्षा असून यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी (पदविकास्तर), मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धिमापन चाचणी या विषयांचा अंतर्भाव असणार आहे,

अधिकृत माहिती :

कोणती पदे भरणार : जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब (अराजपत्रित)

नोकरी ठिकाण – महाराष्ट्रात कोठेही

एकूण जागा: ६७०

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा

परीक्षा कोण घेणार : TCS

नवीन भरतीप्रक्रिया बघण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा