Sir, Madam, Dear Use in Marathi

● १) वयाने आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला सभ्यपणे उद्देशण्यासाठी sir किंवा madam हे शब्द वापरले जातात. जसे,
• Excuse me sir, can I help you?
माफ करा साहेब, मी आपली मदत करू शकतो का?

● २) अनौपचारिक इंग्रजीमधे mate, buddy, love, dear हे शब्द पुरुष पुरुषांना उद्देशण्यासाठी वापरू शकतात. जसे,
• Have you got a pen, dear? तुझ्याकडे पेन आहे का भाऊ/मित्रा?

● ३) पुरुषाला उद्देशण्यासाठी man हा शब्द वापरला जाऊ शकतो – विशेषतः जेव्हा बोलणारा थोडा चिडलेला असतो तेव्हा. जसे,
• Shut up, man. चूप बस, यार.
• Listen, man, I won’t bear this again.
हे बघ, मी हे पुन्हा सहन करणार नाही, ऐकलंस?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

● ४) स्त्रीला उद्देशण्यासाठी lady, पुरुषाला उद्देशण्यासाठी mister किंवा mac चा जात नाहीत.
• Hey, mister, get your hands off my bike. अरे भाऊ, माझ्या सायकलवरून हात काढ.
Listen lady, I don’t want to see you here again.
तुम्ही मला इथे पुन्हा दिसता कामा नये, ऐकून घ्या.

● ५) लोकांच्या गटाला उद्देशून बोलण्यासाठी folks / everybody / everyone
वापरता येईल. पुरुषांच्या गटाला उद्देशण्यासाठी guys किंवा chaps हे शब्द वापरता
येतात. अमेरिकेत guys लोकांच्या (म्हणजे स्त्रिया आणि पुरुष दोघांच्या) गटाला
उद्देशण्यासाठी सुद्धा वापरतात.
• Hello folks/ Hello everyone! मित्रांनो!
• Well folks / OK everybody, shall we start now?
बर मित्रांनो / मंडळी – सुरुवात करायची का आता?
• Well, folks, time is up now, let us stop here, see you tomorrow.
बरं, मित्रांनो, वेळ संपली आहे आता, आपण इथे थांबू आणि उद्या भेटू.

● ६) Sire – मालकाला किंवा राजाला उद्देशून बोलायचा शब्द (= मालक/महाराज!)

● ७) Doctor, nurse आणि (पोलिस अधिकाऱ्यासाठी) officer हे शब्द सोडून इतर
व्यवसाय दर्शवणारे शब्द उद्देशून बोलण्यासाठी सहसा वापरले जात नाहीत.
उदा. I have lost my appetite, doctor. डॉक्टर साहेब, मला भूक राहिली नाही.

● ८) आईला उद्देशून बोलण्यासाठी Mother, Mom, Mama, Mummy हे शब्द व वडिलांना उद्देशून बोलण्यासाठी Father, Dad, Daddy, Pop, Papa हे शब्द वापरले जातात.

● ९) आईवडील आपल्या मुलांना उद्देशण्यासाठी अगर पती-पत्नी एकदुसऱ्याला उद्देशण्यासाठी darling, sweetheart, dear, honey हे शब्द वापरू शकतात.

● १०) न्यायाधीश वगैरे ला उद्देशन बोलण्यासाठी Your honour चा उपयोग केला जाऊ

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा