●सिंधवर ब्रिटिशांचा ताबा (१८४३)
● सिंधचा स्वायत्त राज्य म्हणून उदयः
• सिंध प्रथम कलोरा जमातीच्या, तर १७८३ नंतर बलुची जमातीच्या ताब्यात होते. मुघल साम्राज्याच्या विघटनानंतर ते बलुची जमातीच्या अमिरांच्या नियंत्रणाखाली एक स्वायत्त राज्य म्हणून उदयास आले. अमिरांच्या नियंत्रणाखालील सिंध तीन घटकांमध्ये विभागलेला होता. हैद्राबाद, मीरपूर आणि खैरपूर. या तिन्ही क्षेत्रांवर बलुची जमातीच्या वेगवेगळ्या शाखा राज्य करीत होत्या.
● सिंधवर ताबा मिळविण्याची कारणेः
• ब्रिटिशांनी सिंध राज्य जिंकून घेण्यासाठी पुढील कारणे कारणीभूत ठरली.
१)भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रजांना वायव्य सरहद्दीवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे होते. रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी त्यांना भिती होती, म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्तानवर आपला प्रभाव प्रस्थापित
करण्याचे ठरविले. अफगाणिस्तानकडे जाणारे मार्ग सिंधूमधून जात होते. त्यामुळे सिंधचे महत्व इंग्रजांच्या ध्यानात आले.
२)सिंधमधील सिंधू नदीच्या मार्गाने व्यापार वाढीची शक्यताही इंग्रजांच्या लक्षात आली.
● सिंध आणि ब्रिटिशांमधील सुरुवातीचे संबंधः
• सिंध जिंकून घेण्याचे कोणतेही प्रत्यक्ष कारण ब्रिटिशांकडे नव्हते. त्यांच्या सुरूवातीच्या संबंधांदरम्यानच्या पुढील महत्वाच्या घटना घडून आल्याः
१)१८०९ मध्ये लॉर्ड मिंटो (पहिला) याने सिंधच्या अमिरांकडे आपला प्रतिनिधी पाठवून त्यांच्याशी एक मैत्री करार केला.
२)अलेक्झांडर बन्स याने १८३१ मध्ये सिंधू नदीमार्गे लाहोरपर्यंत प्रवास केला. त्यातून सिंधू नदीचे व्यापारी महत्व ध्यानात आले.
३)१८३२ मध्ये लॉर्ड बेंटिंकने अमिरांबरोबर एक करार केला, ज्याद्वारे सिंधमधील रस्ते व नद्या ब्रिटिश व्यापारासाठी खुल्या करण्यात आल्या.
४)लॉर्ड ऑकलंडने १८३९ मध्ये सिंधच्या अमिरांना तैनाती फौजेचा तह करण्यास भाग पाडले.
● युद्ध व सिंधवर कब्जा
• युद्ध व सिंध ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेत पुढील घटना घडून आल्या:
१)१८४२ मध्ये नवीन गर्व्हनर-जनरल लॉर्ड एलनबरो याने सिंधच्या अमिरांना व जनतेला युद्धासाठी कारण नसतांनाही चिथवले.
२)१८४२ मध्ये सिंधमध्ये ब्रिटिश रेसिडेन्ट म्हणून सर चार्लस नेपियर याची नेमणूक करण्यात आली.
३)१८४३ मध्ये चार्लस नेपियरने इमामगड हा सिंधमधील वाळवंटी किल्ला उद्धस्त केला.
४)त्यामुळे बलुचींनी ब्रिटिश रेसिडेन्सीवर हल्ला करून युद्धाला सुरूवात केली.
५)नेपियरने मियानी येथे बलुची लष्कराला पराभूत केले. काही अमीर ब्रिटिशांना शरण आले.
६)मात्र मीरपूरचा अमीर शेर मुहम्मद याने युद्ध चालू ठेवले. डाबो येथे नेपियरने त्याचा पराभव केला. त्याला सिंधमधून निष्काषित करण्यात आले.
७)१८४३ मध्ये ब्रिटिशांनी औपचारिकरीत्या सिंध राज्य ताब्यात घेऊन आपल्या राज्याशी जोडून घेतले. सर चार्लस नेपियरला सिंधचा पहिला गर्व्हनर म्हणून नेमण्यात आले.
८)कारण नसतांना सिंधच्या अमिरांना व जनतेला युद्धासाठी चिथवून सिंध जिंकण्यात आले. सिंधवर कब्जा मिळविल्यानंतरचार्लस नेपियरने लॉर्ड एलनबरोला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, ‘I have sin(ne)d’. (‘मी सिंध मिळविले आहे/पाप
केले आहे’.)
● पंजाब राज्य (१७९२-१८४९)
• पार्श्वभूमी
१५ व्या शतकाच्या अखेरीस गुरू नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली. गुरू हरगोविंद (१६०५-४५) यांनी शिखांचे लढवय्या समाजामध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र, दहावे व शेवटचे गुरू गोविंद सिंह (१६६६-१७०८) यांच्या नेतृत्वाखाली शिखांचे एका राजकीय व लष्करी सत्तेत रूपांतर झाले. गुरू गोविंद सिंह यांनी १६९९ मध्ये खालसा
पंथाची स्थापना करण्याच्या आधी तसेच नंतर राजपूत आणि मुघलांविरूद्ध अनेक लढाया लढल्या.
• गुरू गोविंद सिंह यांच्या मृत्यू नंतर बंदा बहादूर याच्या नेतृत्वाखाली ‘खालसा’ ने मुघलांच्या विरूद्ध लढा दिला. त्याने शेतकऱ्यांना व पंजाबमधील कनिष्ठ जातींना संघटित करून सतलज व यमुना नद्यांच्या दरम्यान (दिल्ली व लाहोर दरम्यान) आपल्या सार्वभौम प्रशासनाची घोषणा केली, तसेच गुरू नानक ) व गुरू गोविंद सिंह यांच्या नावाने नाणी प्रसृत केली. १७१५
मध्ये बंदा बहादूरला मुघलांनी कैद केले व १७१६ मध्ये ठार केले.
• १८ व्या शतकात अनेक सक्षम नेत्यांच्या नेतृत्वाखाली शिखांनी त्यांनतर प्रथम स्वतःला ‘जत्था’ मध्ये, तर त्यानंतर ‘मिस्लां’ मध्ये संघटित केले. या सर्व जत्था व मिस्लांच्या एकत्रित सेनेला ‘दल खालसा’ असे म्हटले जात असे. दल खालसाची दिवाळी आणि
बैसाखीला सभा होत असे. या सभांमध्ये सामुहिक निर्णय घेतले जात असत. त्यांना ‘गुरूमत्ता’ (गुरूचा प्रस्ताव) असे संबोधले जाई. शिखांनी ‘राखी’ व्यवस्था स्थापन केली, ज्याअंतर्गत शेतकऱ्यांकडून त्यांच्या उत्पादनाचा २० टक्के हिस्सा कर म्हणूनbघेऊन त्यांना संरक्षण प्रदान करण्यात येत असे.
• नादीर शाह आणि अहमद शाह अब्दालीच्या हल्ल्यानंतर शिखांना .१८३८ उभे राहण्याची पुन्हा संधी मिळली. त्यांनी पुन्हा राजकीय पोकळी भरून काढली. १७६५ ते १८०० दरम्यान त्यांनी पंजाब व जम्मू आपल्या नियंत्रणाखाली आणला. शिखांनी स्वतःला १२मिस्लांमध्ये संघटित केले. हे मिस्ल पंजाबच्या वेगवेगळ्या रणजितसिंहाने भागात कार्यरत होते व परस्परांना सहकार्य करीत असत. सुरूवातीला मिस्ल समानतेच्या तत्वावर कार्य करीत. मिस्लचा
प्रमुख व इतर कारभार ठरविण्यामध्ये सर्व सदस्यांचा सहभाग असे. कालांतराने मात्र त्यांवर जमीनदारांचे वर्चस्व निर्माण झाले.
● रणजितसिंह (१७९२-१८३९)
• रणजितसिंह १७९२ मध्ये सुखरचकिया मिस्लचे प्रमुख बनले. रणजितसिंह हे धैर्यवान लढवय्या, कार्यक्षम प्रशासक आणि कुशल मुत्सद्दी होते. त्यांनी १७९९ मध्ये लाहोर व १८०२ मध्ये अमृतसर जिंकून घेतले. अमृतसरच्या सुवर्णमंदिरावर सोन्याचा घुमट
चढविला. १७९९ मध्ये त्यांनी स्वतःला लाहोरचा महाराजा म्हणून घोषित केले. सतलजच्या पश्चिमेकडील सर्व मिस्लांवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले, १८०६ मध्ये लुधियाणावर कब्जा मिळविला.
● अमृतसरचा तह (१८०९)
• भारतात रशियाचा संभाव्य शिरकाव टाळण्यासाठी चार्लस मेटकाफ याला रणजितसिंहाबरोबर तह करण्यासाठी पाठविण्यात आले. दीर्घ चर्चेनंतर २५ एप्रिल, १८०९ रोजी अमृतसर येथे या करारावर सह्या करण्यात आल्या. या करारामध्ये पुढील तरतुदी होत्याः
i)रणजितसिंहाशी कायमस्वरूपी मैत्री आणि सर्वाधिक पसंतीच्या राज्याचा (most favoured power) दर्जा.
ii)सतलजच्या उत्तरेकडील सर्व प्रदेशांवर रणजितसिंहाच्या सार्वभौमत्वाचा स्विकार.
iii)सतलजच्या डाव्या किनाऱ्यावर त्या प्रदेशाच्या अंतर्गत संरक्षणासाठी आवश्यक तेवढेच सैन्य ठेवण्यास संमती. त्यांनतर रणजितसिंहाने कांग्रा, अटक, मुलतान, काश्मिर, पेशावर आणि इतर अनेक प्रदेश जिंकून घेतले. १८१४ मध्ये त्याने
अफगाणिस्तानच्या शाह शुजाला संरक्षण देण्याच्या बदल्यात कोहिनूर हिरा मिळविला. (कोहिनूर हिरा मुघलांकडून नादीर शाहाने, तर त्याच्याकडून अहमद शाह अब्दालीने मिळविला होता. पुढे तो अब्दालीचा वंशज शाह शुजाकडे आला. पुढे दुसऱ्या इंग्रज-शीख युद्धानंतर शिखांकडून तो इंग्रजांनी मिळविला. आजही तो इंग्लंडच्या राजमुकुटात आहे.) १८३१ मध्ये रणजितसिंह आणि लॉर्ड बेंटिंक यांची भेट घडून आली.
• १८३८ मध्ये रणजितसिंह, लॉर्ड ऑकलंड आणि शाह शुजा यांच्यात शाह शुजाला अफगाणिस्तानच्या गादीवर बसविण्याच्या उद्देशाने त्रिपक्षीय तह (Tripartite Treaty)झाला. १८३९ मध्ये रणजितसिंहाचा मत्यू झाला.
● रणजितसिंहाने केलेल्या सुधारणा
• रणजितसिंहाने केलेल्या सुधारणांमध्ये पुढील बाबींचा समावेश होतोः
i)युरोपियनांच्या मदतीने युरोपीय धर्तीवर शक्तीशाली, शिस्तबद्ध आणि साधनसंपन्न लष्कराची निर्मिती.
ii)सैनिक म्हणून शिखांबरोबरच गोरखा, बिहारी, ओरिया, पठाण, पंजाबी मुस्लिम यांचीही भरती.
ii)लाहोर येथे आधुनिक तोफखान्याची स्थापना.