◆ Simple Past Tense साधा भूतकाळ – Example
• Simple Past Tense साधा भूतकाळ : ‘बस सुटली, सूर्य उगवला, घंटा वाजली, किंवा मी त्याला मदत केली, मी त्याला एक झापड मारली’ असं जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही साध्या भूतकाळाची वाक्ये बोलत असता.या वाक्यांमधे तुम्ही काय केलं किंवा काय झालं ते सांगितलेलं आहे. यावरून साध्या भूतकाळाचा उपयोग असा लक्षात येतो.
● भूतकाळात (ठरावीक वेळी) एखादी क्रिया झाली किंवा एखादी घटना घडली असे सांगण्यासाठी हा काळ वापरला जातो.
तुम्हाला आठवतं – साध्या वर्तमानकाळाच्या मराठीच्या वाक्यात शेवटी साधारणपणे
‘तो, ते, त’ अशी अक्षरे असतात. त्याप्रमाणे साध्या भूतकाळाच्या वाक्यात शेवटी ला, ली, ले, लो, लं, ल्या,लास अशी अक्षरे असतात. मग यापैकी कुठलंही अक्षर वाक्याच्या शेवटी असेल तर तुम्ही पटकन् समजू शकता की वाक्य साध्या भूतकाळाचं आहे.
वाक्य साध्या भूतकाळाचं आहे असं कळल्यानंतर साध्या भूतकाळाच्या रचनेने वाक्य केलं की झालं. इंग्रजीचं वाक्य चुकायला जागाच नाही. तर लक्षात घ्या
◆ Simple Past Tense – साधा भूतकाळ रचना
• साध्या भूतकाळाची रचना : कर्ता + क्रियापदाचे दुसरे रूप +……………….
● साध्या भूतकाळाचे वाक्य करता येण्यासाठी क्रियापदाचे दुसरे रूप यावे लागते. म्हणून तुम्हाला कुठल्याही क्रियापदाचं दुसरं रूप माहीत असायला पाहिजे.
क्रियापदाचे दुसरे रूप बनवण्यासंबंधी माहिती हे आपण पुढे बघू .साध्या भूतकाळाची रचना तुम्हाला समजली. सुरुवातीला कर्ता, कर्त्यानंतर क्रियापदाचे
दुसरे रूप आणि त्यानंतर जे असेल ते.
● टीप :- ‘कर्ता’ म्हणजे फक्त सजीव शब्दच असतो असं नाही. व्याकरणात निर्जीव शब्दही
‘कर्ता’ होऊ शकतो. जसे, क्लास सुरू झाला, बस सुटली, घंटा वाजली, सूर्य उगवला’ या
वाक्यांमध्ये ‘क्लास, बस, घंटा आणि सूर्य’ कर्ते आहेत.
● आता पुढील वाक्यांचा अभ्यास करा (आणि नंतर हीच वाक्ये परत स्वतः करा) :
• उदा : १) तो आला (‘येणे म्हणजे come, come चे दुसरे रूप came)
= He came (कर्ता + क्रियापदाचे दुसरे रूप…)
२) तो गेला (‘जाणे म्हणजे go, go चे दुसरे रूप went)
= He went (कर्ता + क्रियापदाचे दुसरे रूप…)
३) तो विसरला (विसरणे = forget, forget चे दुसरे रूप forgot)
= He forgot (कर्ता + क्रियापदाचे दुसरे रूप…)
४) तो म्हणाला (म्हणणे = say, say चे दुसरे रूप said)
He said (कर्ता + क्रियापदाचे दुसरे रूप…)
५) तो हसला (हसणे = laugh, laugh चे दुसरे रूप laughed)
= He laughed (कर्ता + क्रियापदाचे दुसरे रूप…)
◆ Simple Future Tense – साधा भविष्यकाळ with Examples
● साधा वर्तमानकाळ आणि साधा भूतकाळ हे दोन काळ झाले .या दोन्ही काळाचा उपयोग, ओळख आणि रचना तुमच्या लक्षात आहेच. तुमचं बरोबरच आहे – शिकलेल्या गोष्टी लक्षात ठेवण्याला तर अर्थ आहे, नाहीतर पुढचं पाठ आणि मागचं….. त्याला काय अर्थ आहे? शिकलेल्या रचना तुम्हाला पाठ होण्यासाठी थोडा वेगळा सराव तुम्ही स्वत: करण्याची गरज आहे. यासंबंधी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. सध्या आपण साध्या भविष्यकाळाचा
उपयोग लक्षात घेऊ:
– भविष्यकाळात एखादी क्रिया होईल किंवा कर्ता (जसे, मी, तू, तो, हरी, रमेश, इ.) एखादी क्रिया करेल असा अर्थ व्यक्त करण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरला जातो.
– साध्या भविष्यकाळाची ओळख:– वाक्याच्या शेवटी -ल (जसे, तो जाईल), -न (जसे, मी जाईन), -णार/-ऊ (जसे, आम्ही जाणार / जाऊ),
– साध्या भविष्यकाळाची रचना :- कर्ता + will + क्रियापदाचे पहिले रूप……
• Examples : १) मी जाईन = i will go २) तो उद्या दहा वर्षांचा होईल.
He will be ten years old tomorrow. ३) मी खाईन = I will eat.
४) मी बसेन = I will sit.
६) मी त्याला उद्या भेटेन.
I will meet him tomorrow.
◆ साध्या वर्तमानकाळाबद्दल आणखी थोडी माहिती
● शक्यता व्यक्त करण्यासाठी will चा उपयोग केला जाऊ शकतो. जसे,
१) तो आता घरी असेल.
He will be at home now
२) हा उन्हाळा खूप गरम असेल.
This
summer will be very hot.
आंबे या वर्षी स्वस्त असतील.
Mangoes will be cheap this year.
● वर्तमानकाळाची सवय व्यक्त करण्यासाठी किंवा एखादी क्रिया नेहमीच घडते असे दर्शविण्यासाठी आपण साधारणपणे साधा वर्तमानकाळ वापरतो. पण एखाद्या वेळेस अशी क्रिया व्यक्त करण्यासाठी (विशेष करून क्रियेपेक्षा कर्त्याच्या वैशिष्ट्यावर जास्त जोर देण्यासाठी) साधा भविष्यकाळ सुद्धा वापरला जाऊ शकतो. जसे,
१) He will only listen to his father.
तो फक्त त्याच्या वडिलांचंच ऐकतो.
२) He will never listen to me.
तो माझं कधी ऐकत नाही.
३) He will never answer my question.
तो माझ्या प्रश्नाचं उत्तर कधी देत नाही.
४) Accidents will happen.
अपघात घडतीलच (= घडतातच). ५) Most soaps won’t lather in sea water.
बऱ्याच साबणांना समुद्राच्या पाण्यात फेस येत नाही.
६) Food will keep longer in the fridge.
अन्न फ्रिजमध्ये जास्त काळ टिकते.
◆ SHALL चा उपयोग
● SHALL : आधी, भविष्यकाळाच्या वाक्यात, । आणि we सोबत shall व इतर कोणत्याही
शब्दासोबत (कर्त्यासोबत) will वापरलं जायचं – जसे, I shall go, we shall go, he will
go, they will go, you will go.पण आजकाल (आधुनिक इंग्रजीमधे) ( आणि we धरून) कोणत्याही शब्दासोबत will चा उपयोग जास्त प्रचलित आहे – I will, we will, he will, you will, they will, इ. (तरीपण काहीजण आजसुद्धा shall व will चा जुना फरक पाळतात).
या अतिरिक्त shall चा उपयोग
● I आणि we सोबत shall चा उपयोग पुढील प्रमाणे ‘सुचविण्यासाठी किंवाविचारण्यासाठी’ (प्रश्नार्थी वाक्यात) केला जातो. जसे,
१) It’s very cold. Shall I shut the window?
खूप थंडी आहे. खिडकी बंद करू का?
२) Shall we eat out today?
आज आपण बाहेर जेवायचं का?
3) Shall we leave now?
आपण आता निघायचं का?
४) What shall we do now?
आपण आता काय करायचं?
५) Where shall we meet? ?
आपण कुठे भेटायचं?
६) Shall I drop you at the station?
मी तुला स्टेशनवर सोडू का?
७) Shall I help you to lift this box?
ही पेटी उचलायला मी तुला मदत करू का?
८) Which book shall I buy? ?
मी कोणतं पुस्तक विकत घेऊ?
९) How shall I do this?
मी हे कसं करू?
● एखादी गोष्ट होईलच किंवा व्हायलाच पाहिजे किंवा बोलणाऱ्याचा तसा निश्चय, निर्धार आहे असे दर्शविण्यासाठी shall वापरतात. जसे,
१) You shall get your right.
तुला तुझा हक्क मिळेलच.
२) She shall be permitted to go there.
तिला तिथे जाण्याची परवानगी द्यायलाच पाहिजे/दिली जाईलच. ३) Don’t worry, I shall be there to receive you at the station.
काळजी करू नकोस – तुला घेण्यासाठी मी स्टेशनवर असेन.
४) They shall not come here.
त्यांना इथे येता येणार नाही (याची मी काळजी घेईन).