SECR Nagpur Recruitment 2025 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभाग (South East Central Railway ) ने नुकतीच एक मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत नागपूर भाग आणि मोतीबाघ वर्कशॉप येथे प्रशिक्षणार्थी (Apprentice) पदांसाठी एकूण 1007 जागा भरण्यात येणार आहेत.
भरतीचा तपशील –
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर ने 1 एप्रिल 2025 रोजी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, रायपूर विभागात विविध ट्रेड्समध्ये प्रशिक्षणार्थी पदांसाठी 1007 रिक्त जागा उपलब्ध आहेत. ही भरती प्रक्रिया विशेषतः 10वी उत्तीर्ण १आणि आयटीआय पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा असेल, ज्यामध्ये उमेदवारांना रेल्वेच्या विविध क्षेत्रांमध्ये व्यावहारिक प्रशिक्षण दिले जाईल.
पात्रता निकष – Eligibilty Criteria
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
- शैक्षणिक पात्रता: – Educational Criteria :
- उमेदवाराने 10+2 शिक्षण पद्धती अंतर्गत 10वी परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
- संबंधित ट्रेडमध्ये मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय / ITI अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
- वयोमर्यादा:
- उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे.
- SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया – Selection Process
SECR रेल्वे प्रशिक्षणार्थी भरतीसाठी निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेवर (Merit) आधारित असेल. यामध्ये:
- 10वी/SSC आणि आयटीआय/ITI परीक्षेतील सरासरी गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल.
- दोन्ही परीक्षांना समान वेटेज दिले जाईल.
- निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल, जिथे त्यांना त्यांची मूळ कागदपत्रे, जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास) आणि वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
जाहिरात डाउनलोड करा – SECR Nagpur Recruitment Notification PDF
अर्ज प्रक्रिया – How To Apply
या भरतीसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. इच्छुक उमेदवारांनी खालील पायऱ्या फॉलो कराव्या:
- अधिकृत वेबसाइट https://apprenticeshipindia.gov.in ला भेट द्या.
- “Apprentice Registration” पर्यायावर क्लिक करून नोंदणी करा.
- आवश्यक माहिती भरा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि संबंधित कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी अपलोड करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट घेऊन ठेवा.
महत्त्वाच्या तारखा – Important Dates
- अधिसूचना जारी: 1 एप्रिल 2025
- ऑनलाइन अर्ज सुरू: 5 एप्रिल 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मे 2025
प्रशिक्षणादरम्यान स्टायपेंड – Stipend
प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना रेल्वे बोर्डाच्या नियमानुसार स्टायपेंड दिला जाईल. हा स्टायपेंड प्रशिक्षणार्थींना आर्थिक आधार प्रदान करेल आणि त्यांना त्यांच्या कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल.