Relative Pronouns in Marathi संबंधी सर्वनाम

संबंधी सर्वनाम (relative pronouns) – English Grammar in Marathi

संबंधी सर्वनाम (Relative Pronouns)
मराठी बोलताना जो, जी, जे, ज्याने, ज्याला, ज्याचा असे शब्द आपण वापरतो.तेव्हा इंग्रजीमधे यांच्यासाठी कोणते शब्द वापरायचे ते आपल्याला सध्या पहायचं आहे. या शब्दांना व्याकरणात संबंधी सर्वनाम (relative pronouns) असे म्हणतात. इंग्रजीतील संबंधी सर्वनाम पुढीलप्रमाणे आहेत.

1.WHO

WHO : हा शब्द संबंधी सर्वनाम असताना याचा अर्थ जो, जे, जी, ज्या, ज्याने, ज्यांनी असा होतो.
– उदा राम हा एकटाच मुलगा आहे जो वेळेवर येतो.
: Ram is the only boy who comes on time.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2.WHICH

● WHICH : या संबंधी सर्वनामाचा अर्थ who सारखाच होतो (म्हणजे जो, जे, जी, इत्यादी.) पण
who आणि which मधे फरक आहे. who चा उपयोग साधारणपणे फक्त माणसांच्या बाबतीत
होतो. आणि which चा उपयोग निर्जीव वस्तू आणि प्राण्यांच्या बाबतीत होतो. पण प्राण्यांच्या बाबतीत who चा सुद्धा उपयोग केला जाऊ शकतो.
उदा. हे एकच पुस्तक आहे जे मी वाचलेलं नाही.
This is the only book which I haven’t read.

3.THAT


THAT : हा शब्द संबंधी सर्वनाम असताना याचा अर्थ who आणि which सारखाच होतो (म्हणजे
जो, जे, ज्याने, इत्यादी). आणि हा शब्द सजीव व निर्जीव दोघांच्या बाबतीत वापरला जातो.
उदा. हे एकच पुस्तक आहे जे मी वाचलेलं नाही.
This is the only book that I haven’t read.
टीप:-who आणि which च्या ठिकाणी बऱ्याचदा त्याच अर्थाने that चा उपयोग केला जाऊ शकतो. पण कधीकधी who आणि which च्या ठिकाणी that वापरता येत नाही.

4.WHOM

WHOM :या शब्दाचा उपयोग ज्याला, जिला, ज्यांना या अर्थाने होतो. whom हा शब्द माणसांच्या बाबतीत वापरला जातो. निर्जीव वस्तू व प्राण्यांच्या बाबतीत या अर्थाने which किंवा that वापरतात.
उदा. राहूल हा एकमेव विश्वसनीय माणूस आहे ज्याला आपण हे विचारू शकतो. Rahul is the only reliable person whom we can ask this.
पण नेहमीच्या बोलण्यात whom ऐवजी बऱ्याचदा who किंवा that वापरतात. मात्र शब्दयोगी अव्यय (म्हणजे for, by, from वगैरे) नंतर who किंवा that कधी येणार नाही. तेव्हा फक्त whom येईल .

● उदा. There are 80 students in the class of whom 35 are girls.
वर्गात ८० विद्यार्थी आहेत, ज्यापैकी ३५ मुली आहेत.
टीप : ज्याला साठी इंग्रजीमधे शब्द whom आहे असं आपण आत्ताच पाहिलं. पण कधी ज्याला साठी फक्त who च वापरावं लागू शकतं. जसं ‘मला’ साठी इंग्रजीत सहसा me शब्द येतो पण प्रसंगी ‘मला’ साठी I सुद्धा वापरावं लागतं,
उदा. राम हा एकच मुलगा आहे ज्याला हे माहीत आहे.
Ram is the only boy who knows this.

5 WHOSE

WHOSE : या शब्दाचा उपयोग ज्याचा, ज्याची, ज्याचे, ज्यांचे, जिचा या अर्थाने होतो.
उदा. हे पुस्तक एका माणसाबद्दल आहे ज्याचं जीवन चिकाटीचं जिवंत उदाहरण आहे.
This book is about a man whose life is a living example of perseverance.
Whose हा शब्द जास्त करून सजीवाच्या बाबतीत वापरला जातो – पण निर्जीवाच्या बाबतीत सुद्धा याचा उपयोग शक्य आहे. या अर्थाने निर्जीवाच्या बाबतीत दुसरा पर्याय of which आहे.
उदा. आम्ही अशा ट्रेनने प्रवास केला जिचा वेग ताशी ३०० किमी होता.
We travelled by a train whose speed was 300 kmph./
We travelled by a train the speed of which was 300 kmph.

● ज्या नामासाठी संबंधी सर्वनाम वापरले जात आहे ते नाम नंतर येणाऱ्या वाक्यांमध्ये कर्म असल्यास तेव्हा (अनौपचारिक इंग्रजीमधे) संबंधी सर्वनाम वाक्यातून गाळले जाऊ शकते.
जसे,
१) हे आहे का ते पुस्तक ज्याबद्दल तू बोलत होतास?Is this the book that you were talking about?(संबधी सर्वनाम आहे) Is this the bookyouwere talking about? (संबंधी सर्वनाम गाळलेलं आहे.). २) मी जे पुस्तक सध्या लिहित आहे ते या वर्षाच्या शेवटपर्यंत तयार होण्याची शक्यता आहे..
The book (that/which)I am writing at present is likely to be ready by the end of this year.
३) हा एक अनुभव आहे जो मी कधी विसरू शकत नाही. This is an experience (which) I can never forget .
४) ज्या व्यक्तीचा तू आत्ताच उल्लेख केला तो आमच्या बँकत आधी चपराशी होता. The person (whom) you just mentioned was once a peon in our Bank. ५) आपण खाल्लेलं अन्न (म्हणजे जे अन्न आपण खाल्लं ते) शिळं होतं. The food (that / which) we ate was stale. ६) त्याने मला दिलेला सल्ला निरुपयोगी होता.
The advice (that/which) he gave me was useless. ७) तू मागत असलेली किंमत अवाजवी आहे.
The price (that/ which) you are asking is unreasonable. (वर इंग्रजीच्या वाक्यांमधे कंसात दिलेले संबंधी सर्वनाम वापरून तर बोलता येईलच पण बऱ्याचदा ही संबंधी सर्वनामे गाळली जातात.)

WHICH या संबंधी सर्वनामाच्या ठिकाणी that हे संबंधी सर्वनाम वापरले जाऊ शकते असे आपण आधी बोललो पण शब्दयोगी अव्ययानंतर which च्या ठिकाणी that वापरले जाऊ शकत नाही.

१) हे एकच तत्त्व आहे ज्यावर मी विश्वास ठेवतो.
This is the only principle in which I believe.
२) हा एक विषय आहे ज्यात मला जास्त रस नाही.
This is a subject in which I am not much interested.
या दोन्ही वाक्यांमधे in नंतर which च्या ठिकाणी that वापरले जाऊ शकत नाही.

वरील सर्व माहितीकडे लक्ष ठेवून आता खालच्या वाक्यांचा बारकाईने अभ्यास करा:

१) तो म्हणतो की एका वर्षात तो अब्जाधीश होईल जे मला वाटतं अशक्य आहे. He says he will be a billionaire in a year, which, I think, is impossible. २) तो माणूस ज्याला आपण काल भेटलो तो या दुकानाचा मालक आहे.
The man whom we met yesterday is the owner of this shop.
३) मी त्या मुलाबद्दल बोलतोय ज्याला आपण काल सकाळी भेटलो.
I am talking about the boy whom we met in the moming yesterday.
४) ज्यालाही हे पाहिजे त्याला किंमत मोजावी लागेल.
Anyone who wants this will have to pay the price,
५) जे लोक आपल्या अपयशासाठी दुसऱ्यांना दोष देतात ते जीवनात कधी यशस्वी होऊ शकत नाहीत.
People who blame others for their failure can never succeed in their life.
६) हे पुस्तक एका माणसाबद्दल आहे जो वयाच्या तिसाव्या वर्षी अब्जाधीश झाला.
This book is about a man who became a billionaire at the age of 30 years.
७) कुठलाही माणूस ज्याला हे सत्य माहीत आहे तो इकडे कधी दुर्लक्ष करणार नाही.
No man who knows this reality will ever neglect it.
८) ही एक गोष्ट आहे जी मला नेहमीच हवीशी वाटली आहे.
This is something which I have always wanted.
९) जो रस्ता यशाकडे जातो तो खूप बलिदानांनी भरलेला असतो.
The road which leads to success is full of sacrifices.
१०) जी कार मी काल विकली तिचा आज अपघात झाला.
The car which I sold yesterday had an accident today.
११) मी एक कार पाहिली जी ताशी ३०० किलोमीटर वेगाने धावू शकते.
I saw a car which can run at 300 kilometres per hour.
१२) मी तुझ्यासाठी जे करू शकतो ते इतकंच आहे.
This is all (that) I can do for you.

● टीप :- विशेषणाचे superlative रूप आणि little, all, much, nothing, everything यांच्यानंतर which पेक्षा जास्त करून that वापरतात. आणि संबंधी सर्वनाम गाळण्याची
परिस्थिती असेल तर गाळून टाकतात.

१३) ज्या घरात आम्ही सध्या राहत आहोत ते खूप लहान आहे.
The house in which we are living at present is very small
आपण आधी शिकल्याप्रमाणे इथे which च्या ठिकाणी that वापरता येणार नाही. हे वाक्य in हे शब्दयोगी अव्यय पुढे वापरून सुद्धा होईल, जसे, The house which we are living in at present is very small. (आता इथे मात्र which च्या ठिकाणी that वापरता येईल.)
१४) ज्या लोकांना त्यांनी आमंत्रण दिलं आहे ते सर्व श्रीमंत लोक आहेत.
The people (whom) they have invited are all rich. १५) ज्या माणसाला आपण दुकानाचा मालक समजलो तो तर तिथला नोकर होता.
The man (whom) we thought to be the owner of the shop was actually servant there.
१६) तू एकटाच आहेस ज्याला मी हे सांगत आहे. You are the only one whom I am telling this.
१७) ज्या माणसाकडून आम्ही हे घर विकत घेतलं तो प्रामाणिक माणूस होता. The man from whom we bought this house was an honest person.
१८) सध्या मी ज्या लोकांसोबत राहतो ते विश्वसनीय लोक नाहीत. The people with whom I live at present are not trustworthy.
१९) ज्यांच्यासाठी मी काम करतो ते पाटील साहेब खूप चांगले गृहस्थ आहेत. Mr. Patil, for whom I work, is a very good man.
२०) माझे लंडनमधे खूप मित्र आहेत ज्यापैकी काही माझे वर्गमित्र आहेत.
I have many friends in London, some of whom are my classmates.
२१) तो असा माणूस आहे ज्याचे तत्त्व खूप विचित्र आहेत.
He is a man whose principles are very strange.
२२) माझे वडील, ज्यांचा स्वभाव सगळ्यांनाच माहीत आहे, खूप कडक माणूस आहेत.
My father, whose nature is known to everyone, is a very strict
person. .
२३) ही एक अशी कृती आहे जिचा परिणाम धोकादायक असू शकतो.
This is an action whose result can be dangerous.
This is an action the result of which can be dangerous.

संबंधी सर्वनाम ज्याच्या बाबतीत वापरले जाते त्यानुसार क्रियापद वापरतात :

१) I, who am a sinner, expect to be forgiven by God.
मी, जो एक पापी माणूस आहे, परमेश्वराकडून माफ केलं जाण्याची अपेक्षा करतो.
२) He, who is a sinner, expects to be forgiven by God.
तो, जो एक पापी माणूस आहे, परमेश्वराकडून माफ केलं जाण्याची अपेक्षा करतो.
३) We, who are sinners, expect to be forgiven by God.
आम्ही, जे पापी लोक आहोत, परमेश्वराकडून माफ केलं जाण्याची अपेक्षा करतो.
४) Those who think themselves wise are fools. जे स्वत:ला शहाणे समजतात ते मूर्ख असतात.
4) One who thinks himself wise is a fool. जो स्वत:ला शहाणा समजतो तो मूर्ख असतो.

पुढील एक वाक्य पहा : तो पहिलाच माणूस होता ज्याने हे कोडं सोडवलं,
He was the first man who solved this riddle.

आत्ताचं हे मराठीचं वाक्य मराठीतच दुसऱ्या प्रकारे (आणि कदाचित अधिक सोया प्रकारे) असं म्हणता येईल :-हे कोडे सोडवणारा तो पहिलाच माणूस होता. तसंच इंग्रजीती वरचं वाक्य इंग्रजीतच दुसऱ्या (जास्त सोप्या ) पद्धतीने असं म्हणता येईल :- He was the first man to solve this riddle.


अशी आणखी काही उदाहरणे :

१) माझी अडचण विचारात घेणारा तू एकटाच आहेस.
You are the only one who considered my problem.
You are the only one to consider my problem.
२) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला तो पहिलाच भारतीय होता.
He was the first Indian who was honoured by this reward.
He was the first Indian to be honoured by this reward.
३) या कॉलनीत राहणारे सर्वच लोक व्यापारी आहेत.
People who live in this colony are all businessmen.
People living in this colony are all businessmen.
४) सहलीवर जाऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे १५ जूनच्या आधी नोंदवावीत.
People who wish to go on the picnic should enlist their names
before 15th January. / People wishing to go on…..
५) चुकीच्या दिशेने जात असलेला माणूस आपल्या ध्येयावर कधी पोहोचणार नाही.
The man who is going in the wrong direction will never reach
his goal / The man going in the wrong…..

खालील काही वाक्यांकडे लक्ष द्या ज्यांच्यामधे who किंवा which च्या ठिकाणी that चा उपयोग करता येत नाही : १) राहूल, जो दिवसभर काम करतोय, आता थकलेला असणार आहे.
– Rahul, who has been working all day, must be tired now.
२) हरी, जो शाळेत माझा वर्गमित्र होता, आता इंजिनिअर आहे.
– Hari, who was my classmate at school, is an engineer now.
३) जोशी साहेब, जे आता अब्जाधीश आहेत, आधी खूप गरीब माणूस होते. – Mr. Joshi, who is a billionaire now, was once a very poor man.
४) हे घर, जे आम्ही दोन लाख रुपयाला विकत घेतलं होतं, आता त्याची किंमत चार लाख रुपये आहे.
This house, which we had bought for Rs. 2,00,000/-, is now worth Rs. 4,00,000.
५) तुझा आळशीपणा, जो मी आत्तापर्यंत सहन केला आहे, तो आता असह्य होत आहे.
Your laziness, which I have tolerated till now, is getting intoler able now.
६) माझ्याकडे शेकडो पुस्तके आहेत, ज्यापैकी बहुतांश मानसशास्त्रावर आहेत.
I have hundreds of books, most of which are on psychology
७) ही गुंतवणूक, ज्यात मला पहिल्यांदा रस नव्हता, खूप लाभदायक ठरली आहे.
This investment, in which I was not interested at first, has proved very profitable.
आता शेवटी but या संबंधी सर्वनामाकडे आपण लक्ष देऊ:BUT
but हा शब्द संबंधी सर्वनाम म्हणून क्वचितच वापरला जातो. संबंधी सर्वनाम असताना but चा अर्थ who /which + not असा होतो.
उदाहरणे:१) इथे असं घर नाही ज्यात टीव्ही नाही.
There is no house here which does not have a TV set.
There is no house here but has a TV set.
२) असा माणूसच नाही जो या वास्तविकतेवर विश्वास ठेवत नाही.
There is no man who does not believe in this reality.
There is no man but believes in this reality/ fact.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा