रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्रनाथ तर आईचे नाव शारदा देवी होते. कोलकात्याच्या जोरशंका ठा़कूरबाडी येथे पिराली ब्राह्मण कुटुंबातील ते होते.
- जन्म :७ में १८६१
- मृत्यू : ७ ऑगस्ट १९४१
- पूर्ण नाव : रवींद्रनाथ देवेन्द्रनाथ टागोर.
- वडील : देवेंद्रनाथ
- आई: शारदा देवी
- जन्मस्थान : कलकत्ता
- शिक्षण: शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांनी घरी शिक्षक ठेवून रविबाबूंकडून अभ्यास करून घेतला, या वेळी बंगाली, संस्कृत, इंग्रजी या भाषा आणि गणित, इतिहास, भूगोल विषय ते शिकले,
- विवाह : मृनालीनीसोबत
रवींद्रनाथ टागोर
रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्रनाथ तर आईचे नाव शारदा देवी होते. कोलकात्याच्या जोरशंका ठा़कूरबाडी येथे पिराली ब्राह्मण कुटुंबातील ते होते.
देवेंद्रनाथ व शारदा देवी या दोघांच्या १४ अपत्यांपैकी रवींद्रनाथ हे १३ वे अपत्य होते. वयाच्या ८ व्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहली.
वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी वडिलांसोबत कलकत्ता सोडले व भारतभ्रमण सुरू केले.
भारतातील अनेक ठिकाणे त्यांनी पाहिली. याच काळात त्यांनी खगोलशास्त्र, विज्ञान, संस्कृत, इतिहास या विषयातले अनेक ग्रंथ, पुस्तके वाचली. अनेक महान व्यक्तींची आत्मचरित्रे अभ्यासली. इतका दांडगा व्यासंग व वाचन असल्याने वयाच्या फक्त १६ व्या वर्षी त्यांनी लिखाण सुरू केले.
त्यांनी रचलेल्या प्राथमिक कविता या सतराव्या शतकातील भानूसिंह नामक वैष्णव कवीच्या आहेत असे प्रथम सांगितले परंतु नंतर त्या स्वतःच रचलेल्या आहेत असे मान्य केले.
या कवितांमुळे ते प्रसिद्ध झाले होते. नंतर त्यांनी “संध्या-संगीत”, बंगाली भाषेत “भिकारिणी” ही लघुकथा तर सुप्रसिद्ध कविता “निर्झरेर स्वप्नभंग” इत्यादी प्रसिध्द रचना केल्या.
कार्य
इ.स. १८७६ मध्ये रवीद्रनाथांची पहिली कविता ‘वनफूल’ ‘ज्ञानाकुर’ मासिकामध्ये प्रकाशित झाली.
इ. स.१८७८ मध्ये ते इंग्लंडला गेले. लंडन येथील ब्रायटन विद्यालयात व यनिव्हर्सिटी कॉलेजात त्यांचे काही शिक्षण झाले. पण कोणतीच पदवी न मिळविता १८८० साली परत आले. त्यांचे सर्व शिक्षण स्वयंपादित आहे.
इ. स. १८८१ मध्ये त्यांनी ‘वाल्मीकी प्रतिभा’ हे पहिले संगीत नाटक लिहिले.
तसेच ‘साधना’,’भारती’ व ‘वंगदर्शन’ या मासिकांचे त्यांनी संपादन केले.
इ.स. १९०१ मध्ये कलकत्त्याजवळील ‘बोलपूर’ येथे ‘शांतिनिकेतन’ या संस्थेची स्थापना केली. मुलांना शाळेच्या इमारतीतील चार भिंतींच्या आत कोंडून त्यांना क्ष व रटाळ पद्धतीने शिक्षण देण्याऐवजी निसर्गाच्या सान्निध्यात वागण्याची संधी देऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मुक्त विकास घडवून आणला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
शांतिनिकेतन च्या जोडीनेच ग्रामोद्धाराचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून रवींद्रनाथांनी ‘श्री निकेतन’ ची स्थापना केली.
इ. स.१९१२ मध्ये रवींद्रनाथ इंग्लंडला गेले. गीतांजलीत आलेल्या बंगाली कविताचे त्यांनी इंग्रजीत भाषांतर केले होते. श्रेष्ठ कवि डब्ल्यू. वी. यट्स यांना ते इतके आवडले की, त्यांनी त्या संग्रहाला प्रस्तावना लिहिली आणि काव्यसंग्रहाची इंग्रजी प्रत प्रकाशित झाली.
इ. स. १९१३ मध्ये डॉ. आल्फ्रेड नोबेल फाऊंडेशन ने रवींद्रनाथ टागोरांच्या ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहास साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार प्रदान केला.
नोबेल पुरस्कार मिळाल्यामुळे रवींद्रनाथ यांची कीर्ती साऱ्या जगभर पसरली. लवकरच ‘गीतांजली’ ची विविध परदेशी व भारतीय भाषांमध्ये भाषांतरे झाली. गीतांजलीमधील कवितांचा मुख्य विषय ईश्वरभक्ती असून अतिशय कोमल शब्दांत व अभिनय पद्धतीने रवींद्रनाथांनी ती व्यक्त केली आहे.
रवींद्रनाथांचे विविध क्षेत्रांतील थोर कार्य पाहून इंग्रज सरकारने इ स. १९१५ साली त्यांना ‘सर’ ही बहुमानाची पदवी दिली. पण या पदवीने रवींद्रनाथ इंग्रज गरकारचे मिंधे बनले नाहीत. १९१९ साली पंजाबात जालियनवाला बागेत इंग्रज सरकारने हजारो निरपराध भारतीयांना गोळ्या मारून ठार केले तेव्हा संतापलेल्या रवींद्रनाथ यांनी ‘सर’ पदवीचा त्याग केला.
इ. स. १९२१ मध्ये रवींद्रनाथांनी ‘विश्वभारती’ या विद्यापीठाची स्थापना केली.
विश्वभारतीने शिक्षण क्षेत्रात अनेक नव्या संकल्पना आणल्या आणि शिक्षणपद्धतीला नवी दिशा देण्याचे कार्य केले.
इ. स. १९३० मध्ये म्हणजेच रवींद्रनाथांना वयाच्या ७० व्या वर्षी चित्रकला शिकण्याची इच्छा झाली. त्यांनी दहा वर्षात ३००० चित्रे काढली.
ग्रंथसंपदा
गौरा, गीतांजलि, पोस्ट ऑफिस, चित्रा, द गार्डन, लिपिका, द गोल्डन बोट इत्यादी.
पुरस्कार
इ. स. १९१३ साली साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला.
कलकत्ता विद्यापीठाकडून ‘डी. लिट’ पदवी मिळाली.
ऑक्सफर्ड विद्यापीठकडून डॉक्टरेटची पदवी त्यांना प्रदान करण्यात आली.
विशेषता
जण, गण, मन’ या राष्ट्रगीताचे निमति नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय.
विश्वकवी रवींद्र नाथ टागोर हे आपल्या भारतामधील उच्च दर्जाचे साहित्यकार आहेत. त्यांचे बहुमूल्य विचार आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे. नोबल पारितोषिक प्राप्त विजेते आणि भारताच्या अश्या रत्नाला आमचा मानाचा मुजरा. टागोर यांचे काही बहुमूल्य विचार ..
1 तथ्य अनेक असले तरी सत्य एकच आहे.
2 जे आपले आहे ते आपल्याला मिळणारच.
3 खरं प्रेम स्वातंत्र्य देतं. अधिकार गाजवत नाही.
4 विनम्रतेत महान असणारे महानतेच्या सर्वात जवळ असतात.
5 नदीकाठी उभे राहून फक्त पाणी बघितल्याने आपण नदी पार करू शकत नाही.
6 मृत्यू प्रकाश दूर करणे नाही, तर केवळ दिवा विझवणे आहे कारण आता सकाळ झाली.
7 जी व्यक्ती नेहमीच दुसऱ्यांचे चांगले करण्यात व्यस्त असते, त्याच्याकडे स्वतः चांगलं होण्यासाठी वेळच उरत नाही.
8 प्रत्येक मूल जगात येताना संदेश देतं की देव अजूनही मनुष्याकडून निराश झालेला नाही.
9 एकट्या फुलाने काट्यांचा द्वेष करू नये. फूल तर एकच आहे पण काट्यांची संख्या जास्त आहे.
10 भांड्यात ठेवलेले पाणी चमकतं, समुद्राचे पाणी अस्पष्ट दिसतं. लघु सत्य स्पष्ट शब्दात मांडता येऊ शकतं परंतु महान सत्य नेहमी मौन राहतं.