महाराष्ट्र पोलीस शिपाईभरती – २०१९ करीता ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांना सूचित करण्यात येते कि, सदरील परीक्षा ऑनलाईन ऐवजी आता ऑफलाईन घेण्यात येणार असून सदरील लेखी परीक्षेची प्रवेशपत्र मिळविण्यासाठी संबंधित घटकांच्या वेबसाईट लिंकचा वापर करून आपला पासवर्ड रिसेट करणे आवश्यक आहे.
तसेच SEBC प्रवर्गातील उमेदवारांनी खुला (अराखीव) किंवा EWS पैकी एक प्रवर्ग विकल्प देणे गरजेचे आहे.
उमेदवारांना विनंती करण्यात येते कि, त्यांनी ज्या घटकांमध्ये/ जिल्हा/ आयुक्तालय/ राज्य राखीव पोलीस पोलीस बल गटात अर्ज केलेले आहेत, त्या संबंधित घटकांच्या खाली दिलेल्या वेबसाईट लिंकचा वापर करून दिनांक २२ ऑगस्ट २०२१ पर्यंत पासवर्ड रीसेट करणे/ बदलणे आवश्यक आहे, याची गांभीर्याने नोंद घ्यावी.