PERFECT TENSE पूर्ण काळ
PERFECT TENSE- पूर्ण काळ| Present,past,future Perfect Tense – English Grammer
◆ Present Perfect Tense – पूर्ण वर्तमानकाळ
● PERFECT TENSE पूर्ण काळ
1. Present Perfect Tense – पूर्ण वर्तमानकाळ : एखादी क्रिया सध्या चालू आहे असे दर्शवण्यासाठी जसं आपण चालू वर्तमानकाळ
वापरतो त्याचप्रमाणे एखादी क्रिया (बोलताक्षणी) पूर्ण आहे असे दर्शवण्यासाठी पूर्ण वर्तमानकाळ वापरतात (पूर्ण झालेली क्रिया व्यक्त करताना हा काळ भूतकाळाला वर्तमानकाळाशी जोडतो).
पूर्ण वर्तमानकाळाच्या मराठीच्या वाक्यात क्रियापदाच्या शेवटी लं, ला, ले, लो, ली अशी अक्षरे व क्रियापदानंतर आहे, आहेस, आहेत असे शब्द असतात. जसे, तो आला आहे, ते आले आहेत, तू आला आहेस, मला हे समजलं आहे.
• रचना :- कर्ता + have/has + क्रियापदाचे तिसरे रूप +
● have आणि has चा फरक
– have आणि has चा फरक
एकवचनी शब्दासोबत has वापरतात.पण I आणि you (एकवचनी असले तरी) I आणि
अनेकवचनी शब्दासोबत have वापरतात.
(म्हणजे he, she, it, Ram, Sham सोबत has; व you सोबत have ).
१) तो आला आहे. (‘येणे’ म्हणजे come, come चे तिसरे रूप come)
He has come (कर्ता + have/has + क्रियापदाचे ३ रे रूप + ….)
२) ते आले आहेत.
They have come.
३) मी आलो आहे.
I have come.
४) तू आला आहेस.
You have come.
५) मी हे पुस्तक वाचलं आहे/वाचलंय. I have read this book.
६) मी त्याला पत्र पाठवलं आहे. I have sent him a letter.
७) मी त्याची परवानगी घेतली आहे. I have taken his permission.
८) तू खूपं बदलला आहेस.
You have changed a lot.
९) किमती पुन्हा वाढल्या आहेत. Prices have risen again.
१०) तू आता बाप झाला आहेस. You have become a father now.
● पूर्ण वर्तमानकाळाबद्दल आणखी थोडी माहिती
● पूर्ण वर्तमानकाळाबद्दल आणखी थोडी माहिती
भूतकाळ दर्शवणाऱ्या शब्दासोबत (जसे, yesterday, last night, in 1980, इ.)
या काळाचा उपयोग होत नाही. म्हणजे I have sent him a letter yesterday असे म्हणत नाहीत.
या काळात (नुकतीच पूर्ण झालेली क्रिया दर्शवताना) just चा बऱ्याचदा उपयोग केला जातो. जसे, He has just come (तो आत्ताच आला आहे). (just च्या वाक्यातील जागेकडे लक्ष द्या.
● भूतकाळात सुरू झालेली क्रिया अद्याप सुरू आहे असे दर्शवण्यासाठी सुद्धा पूर्ण वर्तमानकाळ वापरला जाऊ शकतो. जसे, He has lived here for ten years = त्याला इथे राहायला दहा वर्षे झाली आहेत (म्हणजे अद्यापही इथेच राहतोय). पण He lived here for ten years या साध्या भूतकाळाच्या वाक्याचा अर्थ होतो :- तो इथे दहा वर्षे राहिला (म्हणजे आता तो इथे राहत नाही).
I have worked in this company for six months = मला या कंपनीत काम सुरू करून सहा महिने झाले आहेत (आणि अद्यापही इथेच काम करतोय).
पण I worked in this company for six months = मी या कंपनीत सहा
महिने काम केलं (पण आता करत नाही.)
◆ Past Perfect Tense – पूर्ण भूतकाळ
● Past Perfect Tense- पूर्ण भूतकाळ
– पुढील वाक्य पहा :हरी माझ्याकडे दुपारी दोन वाजता आला. मी त्याला येण्यासाठी सकाळी दहा वाजता फोन केला होता.
समजा हे वाक्य तुम्ही सायंकाळी ६ वाजता बोलत असाल तर दुपारचे दोन ही had भूतकाळातील वेळ झाली. आणि फोन करण्याची क्रिया या भूतकाळातील वेळेच्या (म्हणजे दुपारी दोनच्या) आधीच पूर्ण झाली होती. आणि असा अर्थ व्यक्त करण्यासाठीच म्हणजे
• एखादी क्रिया भूतकाळातील एखाद्या (ठरावीक) वेळेच्या आधी अगर त्या वेळेपर्यंत पूर्ण
झाली होती असे दर्शवण्यासाठी पूर्ण भूतकाळ वापरतात.
मी त्याला सकाळी दहा वाजता फोन केला होता हे पूर्ण भूतकाळाचे वाक्य आहे.यावरून पूर्ण भूतकाळाची ओळख लक्षात येते :
ओळख :- क्रियापदाच्या शेवटी ला, ले, ली, लो अशी अक्षरे आणि क्रियापदानंतर होता, होती, होते, होतं असे शब्द (म्हणजे वाक्याच्या शेवटी – लं होतं, ले होते, इ.)
● रचना :- कर्ता + had + क्रियापदाचे तिसरे रूप +…….
● आता खालील वाक्यांचा अभ्यास करून ही वाक्ये पुन्हा स्वत: करावीत.
१) मी त्याला सकाळी दहा वाजता फोन केला होता.
I had phoned him at 10 in the morning.
२) तो आला होता.
He had come.
३) ते इथे आले होते.
They had come here.
४) मी तिथे गेलो होतो.
I had gone there.
५) मी त्याला सांगितलं होतं.
I had told him.
६) मी त्याला विचारलं होतं.
I had asked him.
७) त्याने मला वचन दिलं होतं.
He had given me a promise.
८) आम्ही तिथे एकदा गेलो होतो. We had gone there once.
९) आम्ही आठ जण तिथे गेलो होतो.
Eight of us had gone there.
१०) त्याने मला तिथे जाण्याचा सल्ला दिला होता. He had advised me to go there.
११) आम्ही त्याची परवानगी घेतली होती. We had taken his permission.
१२) तो मला विसरला होता.
He had forgotten me.
१३) आम्ही त्यांना आमंत्रण दिलं होतं. We had invited them.
● भूतकाळातील एखाद्या ठरावीक वेळेच्या आधी सुरू झालेली क्रिया त्या वेळेवरही सुरूच होती असे दर्शवण्यासाठी सुद्धा पूर्ण भूतकाळ वापरला जाऊ शकतो. जसे, In 1985, 1 had lived in Mumbai for 10 years १९८५ मधे मला मुंबईत राहायला १० वर्ष झाले होते.
◆ Future Perfect Tense – पूर्ण भविष्यकाळ
● Future Perfect Tense
– पूर्ण भविष्यकाळाचा उपयोग :- भविष्यकाळातील ठरावीक वेळेच्या आधी एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल असे दर्शवण्यासाठी हा काळ वापरला जातो.
उदा :- मी या महिन्याच्या शेवटपर्यंत हे पुस्तक वाचलेलं असेल.
क्रिया झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यासाठी सुद्धा या काळाचा उपयोग केला जाऊ शकतो .
या काळाची ओळख :- क्रियापदाच्या शेवटी लं, ला, ले, ली, लो अशी अक्षरे आणि क्रियापदानंतर असेल, असतील असे शब्द (म्हणजे वाक्याच्या शेवटी ‘लं असेल.ले असतील, इत्यादी)
• रचना :- कर्ता + will have + क्रियापदाचे तिसरे रूप
• आता खालील उदाहरणांचा अभ्यास करून ही वाक्ये परत स्वत: करा:१) बस सुटली असेल.
The bus will have left.
२) तो आतापर्यंत घरी पोहोचला असेल.
He will have reached/got home by now.
३) या महिन्याच्या शेवटपर्यंत मी हे पुस्तक वाचलेलं असेल.
I will have read this book by the end of this month.
४) माझी परीक्षा १५ मार्चपर्यंत संपलेली असेल.
My examination will have finished by the 15th of March.
५) या वर्षाच्या शेवटपर्यंत मी हे पुस्तक
लिहिणं संपवलेलं असेल,
I will have finished writing this
the end of next week.