PCMC Fireman Bharti 2024: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अग्निशमन दलातर्फे 150 अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभाग अंतर्गत १५०पदे खालील प्रमाणे भरावयाची आहेत. सदर पदाची शैक्षणिक अर्हता, पदसंख्या, तपशिल व अटी-शर्ती खालील प्रमाणे
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024
पदाचे नाव: अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर
शैक्षणिक पात्रता:
- किमान १० (दहावी) उत्तीर्ण
- राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशमनज शिक्षण पाठयक्रम उत्तीर्ण असावा.
- एम.एस.सी.आय.टी. परिक्षा उत्तीर्ण. (MSCIT)
- मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक
शारिरीक पात्रता- उंची १६५ से.मी. छाती साधारण ८१ से.मी. फुगवून ०५ से.मी जास्तवजन ५० कि.ग्रॅ. दृष्टी चांगली
वय : किमान 18 ते कमाल 30 वर्षे .इतर नियमानुसार सूट
अर्ज कसा करावा:
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती साठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे, पात्र उमेदवाराने दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे व आपले कागदपत्रे उपलोड करून परीक्षेचे अर्ज फी भरायची आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व जाहिरात खाली दिली आहे.
जाहिरात (PCMC Bharti 2024 – Fireman) | डाउनलोड करा |
अर्ज करा (Application Link) | Apply Here |