बंगालची फाळणी व वंग-भंग चळवळ : Partition of Bengal and Anti-Partition Movement

बंगालची फाळणी व वंग-भंग चळवळ (Partition of Bengal and Anti-Partition Movement)

प्रास्ताविक

बंगालची फाळणी : १९०५ पर्यंत देशात जहालवादी नेत्यांचा असा एक गट निर्माण झालेला होता, ज्याने राजकीय प्रक्षोभास नवी दिशा दाखविण्याचा आणि राजकीय चळवळीचे नेतृत्व करण्याचा चांगला अनुभव प्राप्त केलेला होता. १९०५ मधील बंगालच्या फाळणीमुळे जहालवादाच्या उदयास मूर्त स्वरूप मिळाले, आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीने दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला.

फाळणीची योजना व उद्देश (Scheme and Objects of
Partition)

• फाळणीची योजना व उद्देश (Scheme and Objects of Partition)
• लॉर्ड कर्झनचा काँग्रेसला व राष्ट्रीय चळवळीला कमकुवत करण्याचा प्रयत्न चालू होता. बंगालची फाळणी हा त्याचाच एक भाग होता. ७ जुलै, १९०५ रोजी कर्झनने सिमल्याहून फाळणीची घोषणा केली, त्यानुसार २० जुलै, १९०५ रोजी बंगाल प्रांताचे विभाजन दोन भागांमध्ये करण्याचा आदेश जारी करण्यात आला. फाळणी १६ ऑक्टोबर, १९०५ रोजी अंमलात येणार होती. हे दोन प्रांत पुढीलप्रमाणे:

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

i)पूर्व बंगाल व आसाम प्रांत : बंगाल प्रांतातून चितगाव, ढाका विभाग व माल्दा जिल्हा तोडून शेजारिल आसाम प्रांताला जोडून हा प्रांत तयार केला जाईल. या प्रांताची लोकसंख्या ३१ दशलक्ष असेल, आणि

ii)उर्वरित बंगाल प्रात : सबलपूर व इतर पाच ओरिसातील संस्थाने बंगाल प्रांतात समाविष्ट करून उर्वरित बंगाल प्रांत तयार केला जाईल. त्यांची लोकसंख्या ५४ दशलक्ष असेल, ज्यापैकी १८ दशलक्ष बंगाली आणि ३६ दशलक्ष बिहारी व ओरिया व्यक्ती असतील.

• लॉर्ड कर्झनने फाळणी करण्याचे सरकारी कारण ‘प्रशासकीय सोय’ (administratitiveconvenience) असे सांगितले. त्यांच्या मते तत्कालिन बंगाल प्रांत खूप मोठा असल्याने कलकत्त्याहून त्याचे प्रशासन प्रभावीपणे करता येत नाही.

छुपा उद्देशः मात्र फाळणीच्या मागे राष्ट्रवादी बंगाली जनतेमध्ये धर्माच्या व भाषेच्या आधारावर फूट पाडणे हा छुपा उद्देश होता, कारण नव्या पूर्व बंगाल व आसाम’ प्रांतात मुस्लिम बहुसंख्य व बंगाली हिंदू अल्पसंख्य ठरतील, तर बंगाल प्रांतात हिंदू जरी बहुसंख्य असतील तरी बंगाली हिंद अल्पसख्य ठरतील.म्हणजेच, हिंदू-मुस्लिम ऐक्य तोडून राजकीयदृष्ट्या अतिशय जागृत असलेल्या बंगाली समाजाचे तुकडे करणे, हा त्यामागील छुपा उद्देश होता.

काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांची प्रतिक्रिया (Reaction of Congress and Nationalists)

काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांची प्रतिक्रिया (Reaction of Congress and Nationalists)
i) काँग्रेस व बंगाली राष्ट्रवादी नेत्यांनी फाळणीला स्पष्टपणे विरोध दर्शविला. बंगाली जनतेतील विविध गटांनी (जमीनदार,व्यापारी, वकील, शहरांतील गरीब व्यक्ती, आणि महिला) फाळणीला उत्स्फूर्त विरोध दर्शविला.

ii)फाळणी केवळ प्रशासकीय सोयीसाठी नसून ती भारतीय राष्ट्रवादास आव्हान म्हणून करण्यात आली आहे, याची राष्ट्रवादी नेत्यांना खात्री झाली. बंगाली जनतेमध्ये प्रादेशिक, धार्मिक व भाषिक आधारावरून फूट पाडून बंगाली जनतेमधील राष्ट्रवाद कमकूवत करण्याचा छुपा उद्देश त्यांच्या ध्यानात आला.

iii)फाळणीमुळे बंगाली भाषेच्या विकासाय खीळ बसेल, असेही त्यांचे मत होते.

iv)तसेच त्यांनी असेही मत मांडले की, बंगाल प्रांतातील बंगालीभाषिक प्रदेशापासून हिंदी-भाषिक प्रदेश आणि ओरिया-भाषिक वेगळा केल्यास खरी प्रशासकीय कार्यक्षमता निर्माण करता येईल. बंगालची फाळणी जनमत पूर्णपणे डावलून करण्यात आल्यामुळेच त्याविरूद्ध ताव्र चळवळ उभी राहीली.

वंग-भंग चळवळ(Anti-Partition Movement)

वंग-भंग चळवळ (Anti-Partition Movement)
• बंगालच्या फाळणीला विरोध म्हणून करण्यात आलेल्या चळवळीला ‘वंग-भंग चळवळ’ (Anti-Partition Movement) असे म्हणतात. या चळवळीदरम्यान स्वदेशीला आलेल्या उधाणामुळे तिला ‘स्वदेशी चळवळ’ असेही संबोधले जाते.

• वंग-भंग चळवळ ही बंगालमधील कोणत्याही एका गटाची चळवळ नव्हती, तर ती बंगालमधील संपूर्ण राष्ट्रीय नेतृत्वाची चळवळ होती. सुरूवातीच्या टप्प्यात चळवळीचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी व कृष्णकुमार मित्रा या मवाळ नेत्यांनी केले, तर नंतरच्या टप्यात चळवळीचे नेतृत्व जहाल व क्रांतीकाऱ्यांच्या हातात गेले. अर्थात, संपूर्ण चळवळी दरम्यान मवाळ तसेच जहाल नेत्यांनी एकमेकांशी पूर्णपणे सहकार्य केले.

चळवळीला सुरूवात (Beginning of the Movement)

चळवळीला सुरूवात (Beginning ofthe Movement)
• फाळणी अंमलात येण्याच्या आधीच ७ ऑगस्ट, १९०५ रोजी चळवळीला सुरूवात झाली. या दिवशी कलकत्याच्या टाऊन हॉलमध्ये सभा घेण्यात येऊन फाळणीविरूद्ध व्यापक प्रदर्शन करण्यात आले. तसेच ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकण्याचा ठराव पारित करण्याचा आला. या सभेनंतर, चळवळ संपूर्ण स्वदेशी प्रांतात नेण्यासाठी विविध प्रतिनिधी प्रांतात पसरले.

• १६ ऑक्टोबर, १९०५ रोजी फाळणी अंमलात आली. या दिवशी चळवळीने पुढील स्वरूप धारण केलेः

i) चळवळीच्या नेत्यांनी हा दिवस संपूर्ण बंगालमध्ये राष्ट्रीय शोक दिन’ (day ofnational mourning) म्हणून घोषित केला.

ii)हा दिवस उपवासाचा दिवस (dayof fasting) म्हणून साजरा करण्यात आला. कलकत्यामध्ये हरताळ पाळण्यात आला. लोकांनी अनवाणी चालून पहाटेच्या वेळी गंगा नदीत स्नान केले.

iii)रविंद्रनाथ टागोर यांनी सप्टेंबर मध्ये लिहिलेले ‘अमार सोनार बांगला’ हे गीत असंख्य लोकांनी गायिले. (पुढे १९७१ मध्ये हे गीत बांग्लादेशाने आपले राष्ट्रगीत म्हणून स्विकारले.)

iv)कलकत्त्याचे रस्ते ‘वंदे मातरम्’ या गीताने भरून गेले. (हे गीत रात्रभरातून बंगालचे राष्ट्रीय गीत बनले व लवकरच पुढे राष्ट्रीय चळवळीचे राष्ट्रगीत’च बनले.)

v) रक्षा बंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. हिंदू व मुस्लिमांनी परस्परांच्या हातावर अतूट एकतेचे प्रतिक म्हणून राख्या बांधल्या.

vi)दुपारच्या वेळी, आनंद मोहन बोस या जेष्ठ नेत्याने बंगालच्या अतूट एकतेचे प्रतिक म्हणून फेडरेशन हॉल’ची पायाभरणी केली. जमलेल्या सुमारे ५०, ००० लोकांसमोर त्यांनी भाषण केले.

चळवळीचे महत्व (Importance of the movement)

चळवळीचे महत्व (Importance of the movement)
• स्वदेशी चळवळ ही भारतीय राष्ट्रवादाच्या दिशेने टाकण्यात आलेले एक क्रांतीकारी पाऊल होते. ही चळवळ म्हणजे अक्रिय सर्वसामान्य लोकांच्या सहभागाचा पहिला प्रयोग होता. त्यामुळेच राष्ट्रीय चळवळीस एक नवे वळण लागले.

• ही चळवळ जरी तात्काळ यशस्वी झाली नाही, तरी निर्माण झालेल्या राष्ट्रवादी भावना मात्र कमी झाल्या नाहीत. लोक आणि एकप्रकारे मोठ्या निद्रेतून जागे झाले होते, त्यांना आत्मसन्मान व आत्मविश्वास प्राप्त होऊन जन संघटन व राजकीय कृतीच्या नवीन पद्धतींमध्ये सहभागी होण्याचा त्यांचा विश्वास बळावला होता.

दिल्ली दरबार, १९११ (Delhi Durbar, 1911)

दिल्ली दरबार, १९११ (Delhi Durbar, 1911)
•पुढे हळूहळू इंग्लंडमध्ये बंगालच्या फाळणीची चूक ध्यानात येत गेली. शेवटी १२ डिसेंबर, १९११ रोजी लॉर्ड हार्डिंगच्या काळात ‘दिल्ली दरबार’ भरविण्यात आला. हा दरबार इंग्लंडचा राजा जॉर्ज पंचम व त्याची राणी मेरी यांच्या स्वागतासाठी बोलविण्यात आला होता .

i)या दरबारात बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा करण्यात आली.केली. बंगालच्या फाळणीला विरोध निरर्थक आहे, असे सांगतांना भारतमंत्री लॉर्ड मोर्लेने फाळणी ही एक ‘settled fact’ आहे असे सांगितले होते. त्याला सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी ‘we unsettle settled facts’ असे उत्तर दिले होते. ते १९११ मध्ये खरे ठरले.
या दरबारातच ब्रिटिश भारताची राजधानी कलकत्याहन दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला .

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा