विविध परिमाणे मापन : गणिताचा अभ्यास करत असताना विविध परिमाणे माहिती असणे खूप गरजेचे आहे. तशेच अंकगणित अभ्यासाच्या दृष्टीने विविध परिमाणे मापन येणे सुद्धा महत्त्वाचे आहे. म्हणून आज विविध परिमाणे त्यांचे मापन यांचा अभ्यास करणार आहोत .कुठल्या वस्तू मोजण्यासाठी कुठल्या परिमाणाचा उपयोग करावा लागतो.
परिमाणे म्हणजे काय ? = परिमाणे म्हणजे मोजमापे. विविध वस्तू मोजण्यासाठी आपण माप वापरतो त्या विशिष्ट्य मोजमापाना परिमाणे म्हणतात.निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू मोजण्यासाठी विविध प्रकारची परिमाणे वापरावी लागतात.
विविध परिमाणे मापन
(1) वेळ मोजण्यासाठी सेकंद, मिनिट, तास ही परिमाणे वापरतात.
60 सेकंद = 1 मिनिट होतो
60 मिनिट = 1 तास होतो
24 तास = 1 दिवस होतो
(2) एखाद्या वस्तूची अथवा जागेची लांबी मोजण्यासाठी ‘मीटर’ हे परिमाण वापरतात. कापडाची लांबी मीटरमध्ये मोजतात. दोन
गावांतील अंतर किलोमीटरमध्ये सांगतात.
1,000 मीटर= 1 किलोमीटर होतो.
1 मीटर = 100 सेंटिमीटर
1 सेंटिमीटर = 10 मिलिमीटर होतात.
(3) दूध, पाणी यांसारखे पातळ पदार्थ किंवा द्रवपदार्थ मोजण्यासाठी लीटर’ हे परिमाण वापरतात.
1000 मिलिलिटर = 1 लिटर
1000 ग्रॅम = 1 किलोग्रॅम
(4) धान्य व इतर वस्तूंचे वजन करण्यासाठी ‘किलोग्रॅम’ हे परिमाण वापरतात.
1 किलो = 1,000 ग्रॅम होतात.
100 किलोग्रॅमचा = 1 क्विंटल होतो.
10 क्विंटल = 1 टन
(5) 12 वस्तूंचा एक डझन आणि 12 डझनांचा एक ग्रोस होतो.
(6) 24 कागदांचा एक दस्ता आणि 20 दस्त्यांचे एक रीम होते.
(7) 10 किंवा 10 च्या पटीत असणाऱ्या परिमाणांना दशमान पद्धती’ची परिमाणे असे म्हणतात. लांबी मोजणे, वजन करणे, द्रवपदार्थ
मोजणे यांसाठी सध्या दशमान पद्धतीची परिमाणे प्रचलित आहेत.
(8) लांबी, रुंदी, उंची, जाडी, अंतर इत्यादींच्या मोजमापासाठी आपण सेंटिमीटर, मीटर, किलोमीटर इत्यादी एकके (परिमाणे) वापरतो.
वस्तुमान (व्यवहारात यालाच आपण वजन म्हणतो) मोजण्यासाठी आपण ग्रॅम, किलोग्रॅम, मिलिग्रॅम, क्विंटल इत्यादी एकके वापरतो.
क्षेत्रफळ मापनासाठी सेंटिमीटर (किंवा चौरस सेंटिमीटर); मीटर (किंवा चौरस मीटर) इत्यादी एकके वापरतो. वेळ मोजण्यासाठी
सेकंद, मिनिट, तास इत्यादी एकके वापरतो.
एककांमधील विविध परिमाणे मापन
• 10 मिलिमीटर = 1 सेंटिमीटर
• 100 सेंटिमीटर = 1 मीटर
• 1,000 मीटर = 1 किलोमीटर
• 1,000 मिलिलीटर = 1 लीटर
• 60 सेकंद = 1 मिनिट
• 60 मिनिट = 1 तास
• 24 तास = 1 दिवस
• 1,000 ग्रॅम = 1 किलोग्रॅम
• 100 किलोग्रॅम = 1 क्विंटल
• 24 कागद = 1 दस्ता
• 20 दस्ते = 1 रीम
• 12 वस्तू = | डझन
• 12 डझन = 1 ग्रोस
• 100 वस्तू = 1 शेकडा
• 100 पैसे = 1 रुपया
👍