Netaji Chandra Bose Information In Marathi : नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतातील महान नेता होते. त्यांनी ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात भारताचा स्वातंत्र्यसंग्रामात अहम भूमिका निभावली. त्यांचं जन्म २३ जानेवारी १८९७ ला कटक, उडीसा मध्ये झालं होतं. त्यांच्या वैद्यकीय शिक्षणानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये शैक्षणिक अभ्यास सुरू केलं आणि स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची माहिती
- जन्म : २३ जानेवारी १८९७
- मृत्यू : १८ ऑगस्ट १९४५
- पूर्ण नाव : सुभाषचंद्र जानकीनाथ बोस
- वडील : जानकीनाथ
- आई : प्रभावती देवी
- जन्मस्थान : कटक (ओरिसा)
- शिक्षण : इ.स. १९१९ मध्ये बी. ए. इ.स. १९२० मध्ये आय. सी. एस. परीक्षा उत्तीर्ण
नेताजी सुभाषचंद्र बोस थोड्यकात
तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा” असा नारा देत भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवचैतन्य देणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८८७ रोजी कटक मध्ये झाला सुभाषचंद्र बोस झाला. लहानपणापासूनचं ते बंडखोर वृत्तीचे होते.
नेताजींना ८ भावंडे होती. त्यांचा क्रमांक ९ वा होता. त्यांना शालेय जीवनातच राष्ट्रप्रेमाचे बाळकडू मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षी, नेताजींनी हिमालयाच्या दिशेने प्रस्थान केले. पण त्यांना काही गुरुदर्शन झाले नाही म्हणून त्यांनी स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून त्यांना आपले गुरु बनवले.
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात ज्या थोर वीरांनी कशाचीही पर्वा न करता उडी घेतली आणि अगदी निकराने लढा देत भारताला स्वतंत्र करण्यात मोलाची भूमिका बजावली, त्या थोर वीरांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव आघाडीने घेतले जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे भारत भूमीचा एक तळपता सूर्य होता.
नेताजी यांचे कार्य
इ. स. १९२१ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी सरकारी नोकरीतील अत्यंत मानाच्या जागेचा त्याग करून राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात उडी घेतली. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा देणारे ते पहिलेच आय.सी.एस.अधिकारी होते.
इ. स. १९२४ मध्ये कलकत्ता महानगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची चित्तरंजन दास यांनी नियुक्ती केली. परंतु याच पदावर असताना कोण पुरावा नसताना इंग्रज सरकारने क्रांतिकारकांशी संबंध ठेवल्याच्या आरोपावरून त्याना अटक केली आणि मंडालेच्या तुरुंगात त्यांची रवानगी केली.
इ. स. १९२७ मध्ये सुभाषचंद्र बोस व जवाहरलाल नेहरू या दोघा युवा नेत्यांची काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवड झाली. या निवडीने देशातील युवकांत मोेठे चैतन्य संचारले.
सुभाषचंद्र बोस यांनी वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी काँग्रेसने ब्रिटिशांकडे करावी, असा आग्रह धरला. इ.स. १९२९ च्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत केला. हा ठराव संमत होण्यास सुभाषचंद्र बोस यांनी भरपूर प्रयत्न केले.
इ.स. १९३८ साली सुभाषचंद्र बोस हरिपुरा काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष झाले.
इ. स. १९३९ साली त्रिपुरा येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात ते गांधीजींचे उमेदवार डॉ. पट्टाभि सीतारामय्या यांचा पराभव करून निवडून आले. पण गांधीजींचे अनुयायी त्यांना सहकार्य करत नव्हते. तेव्हा त्यांनी पदाचा राजीनामा दिला व ‘फॉरवर्ड ब्लॉक’ हा नवा पक्ष स्थापन केला.
‘इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात गुंतलेले आहे. या परिस्थितीचा फायदा येऊन स्वातंत्र्यासाठी भारताने सशस्त्र लढा करावा.’ असा प्रचार ते करीत होते. यामुळे इंग्रज सरकारचात्यांच्यावर रोष झाला.
सरकारने त्यांना तुरुंगात डांबले पण त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना घरीच नजरकैदेत ठेवण्यात आले. १५ जानेवारी, १९४१ रोजी सुभाषवाबू वेशांतर करून इंग्रजांच्या पहान्यातून निसटले. काबूलमार्गे ते जर्मनीची राजधानी बर्लिन येथे गेले.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी सुभाषबाबूनी हिटलरशी चर्चा केली.
जर्मनीमध्ये ‘आझाद हिंद रेडिओ केंद्र’ सुरू केले. या केंद्रावरून इंग्रजाविरुद्ध राष्ट्रव्यापी उठाव करण्याचा संदेश ते भारतीयांना देऊ लागले.
जर्मनीत राहुन भारतीय स्वातंत्र्यासाठी आपणास काही भरीव स्वरूपाची कती करता येणार नाही, असे लक्षात येताच सुभाषचंद्र बोस जर्मनीहून एका पाणवडीतून जपानला गेले.
रासबिहारी बोस हे भारतीय क्रांतिकारक त्या वेळी जपानमध्ये राहात होते त्यांनी मलेशिया, सिंगापूर, म्यानमार इत्यादी पूर्व आशियायी देशांतील भारतीयांचा ‘इंडियन इंडिपेन्डन्स लीग’ (हिंदी स्वातंत्र्य संघ) स्थापन केला होता. जपानच्या हाती पडलेल्या इंग्रजांच्या लष्करातील हिंदी सैनिकांची ‘आझाद हिंद सेना त्यांना संघटितकेली होती.
तिचे नेतृत्व स्वीकारण्याची सुभाषबाबूंना रासबिहारी बोस यांनी विनंती केली, नेताजीनी ती मान्य केली. अशा रीतीने सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेनेचे सरसेनापती बनले.
१९४३ च्या ऑक्टोबर महिन्यात सुभाषबाबूंच्या अध्यक्षतेखाली ‘आझाद हिंद सरकार’ स्थापन झाले. अंदमान व निकोबार बेटांचा ताबा घेऊन आझाद हिंद सरकारने तेथे तिरंगा ध्वज फडकाविला. अंदमानला ‘शहीद बेट’ व निकोबार स्वराज्य बेट’ अशी नावे दिली. जगन्नाथराव भोसले, शहानवाझ खान, प्रेमकुमार सहगल, डॉ. लक्ष्मी स्वामीनाथन इत्यादी त्यांचे निकटचे सहकारी होते. डॉ. लक्ष्मी स्वामीनाथन या ‘झाशीची राणी’ पथकाच्या प्रमुख होत्या. ‘तिरंगा ध्वज’ हे आझाद हिंद सेनेचे निशाण, ‘जयहिंद’ हे अभिवादनाचे शब्द, ‘चलो दिल्ली’ हे घोषवाक्य, तर ‘कदम कदम बढ़ाये जा’ हे समरगीत होते.
आझाद हिंद सेनेने मॉवडॉक, कोहिमा ही महत्त्वाची ठाणी जिंकली. इंफाळ ठाणे जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु नैसर्गिक परिस्थितीमुळे तेथे त्यांना यश मिळू शकले नाही. १९४४ च्या अखेरीस युद्धाचे पारडे इंग्लंड व अमेरिका यांच्या बाजूने झुकू लागले. जपानने या क्षेत्रातून माघारीचा निर्णय घेतला. त्यामुळे एकंदर परिस्थितीमुळे आझाद हिंद सेनेला माघार घ्यावी लागली.
जपान सरकारच्या निवेदनानुसार सुभाषचंद्र बोस एका विमानाने टोकियो जाण्यास निघाले असताना त्या विमानाला फोर्मोसा म्हणजेच ताईहोकू बेटावरील विमानतळाजवळ अपघात झाला. या अपघातात १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचा दुर्दैवी अन्त झाला.
ग्रंथसंपदा – इंडियन स्ट्रगल
पुरस्कार
भारत सरकारने १९९२ साली सुभाषबाबूंना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान जाहीर केला परंतु बोस कुटंबीयांनी तो स्वीकारण्यास नकार दिला.
मृत्यू
१८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात सुभाषबाबूंचा दुर्दैवी अन्त झाला.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू हे आजवर न उलगडलेलं कोडं आहे. भारत सरकार देखील हे प्रकरण शांतचं ठेवण्याचा प्रयत्न करते. असं म्हटलं जातं की नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला, परंतु त्यांच्या शरीराचे कोणतेही अवशेष मिळालेले नाहीत. याच कारणामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू एक रहस्य बनून राहिलं आहे.
१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आले होते. परंतु नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करत हा पुरस्कार काढून घेण्यात आला. दिलेला भारतरत्न पुरस्कार परत घेण्याची भारतीय इतिहासातील ही एकमेव घटना आहे.
काही अभ्यासक आणि जाणकार असे मानतात की जर फाळणीवेळी नेताजी भारतात असते तर कदाचित भारताची फाळणी न होता भारत अखंड राष्ट्र म्हणून टिकून राहिला असता.