नगरपंचायत माहिती : Nagar Panchayat Mahiti

नगरपंचायत माहिती (Nagar Panchayat Mahiti) : १९९२-९३ साली झालेल्या ७४ व्या घटना दुरुस्तीमुळे नगरपंचायतीना घटनात्मक दर्जा प्राप्त होवून भारतीय राज्यघटनेच्या कलम २४३ मध्ये (क्यू) मध्ये तरतूद करण्यात आली.

• नगरपंचायत अशा ठिकाणी निर्माण केल्या जातात की जो भाग पूर्णपणे ग्रामीण नाही व पूर्णपणे शहरीही नाही. अशा भागासाठी नगरपंचायत स्थापन करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. नगरपालिका, नगरपंचायती अधिनियम १९६५ नुसार स्थापना केली जाते.

• महाराष्ट्रातील सर्वात पहिली नगरपंचायत – दापोली

• महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत नगरपंचायत – शिर्डी

कार्यकाळ

१) नगरपंचायतीचा व सदस्यांचा कार्यकाळ ५ वर्षाचा असतो.
२) नगरपंचायतीच्या राजकीय प्रमुखाला ‘अध्यक्ष‘ म्हणतात.
३) कार्यकारी अधिकारी नगरपंचायतीचे पदसिध्द सचिव असतात.
४) नगरपंचायतीच्या प्रशासकीय प्रमुखास ‘कार्यकारी अधिकारी‘ म्हणतात.

नगरपंचायत स्थापनेचे निकष

१) संबंधित गावाची लोकसंख्या १० ते २५ हजार यामध्येच असावी.
२) संबंधित गावातील बिगर कृषी व्यवसाय करण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा अधिक असावे.
३) संबंधित गाव महानगर पालिका पासून किमान २० ते २५ किलोमीटर अंतरावर असावे. नगरपंचायतीच्या मतदार संघास प्रभाग असे म्हणतात.

सदस्य संख्या

१) नगरपंचायतीची सदस्य संख्या ९ ते २० इतकी असते.
२) दोन तज्ज्ञ सदस्य राज्य शासनाद्वारे नियुक्त केले जातात.
३) त्या क्षेत्रातील आमदार व खासदार नगरपंचायतीचे पदसिध्द सदस्य असतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आरक्षण

१) महिलांना ५० टक्के राखीव जागा (२०११ पासून)
२) इतर मागासवर्गीयांना (OBC) २७ टक्के राखीव जागा.
३) अनुसुचित जाती जमाती यांना लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा.
४) आरक्षणाच्या जागा निर्धारीत करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो.

महाराष्ट्रातील नगरपंचायती

नगरपंचायती जिल्हा
माहूरनांदेड
दापोलीरत्नागिरी
मलकापूरअहमदनगर
आर्णीयवतमाळ
केजबीड
शिर्डीअहमदनगर
अर्दापूरनांदेड
कनकवलीसिंधूदुर्ग

• महाराष्ट्रातील सर्वात नवीन नगरपंचायत –
१) अर्धापूर, २) माहूर, ३) मलकापूर, ४) आर्णी (२०१२ पासून)

नगरपंचायतीचे अधिकार व कार्ये


१) संबंधित गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे.
२) गावातील सांडपाणी व दिवाबत्तीची व्यवस्था करणे.
३) राज्य शासनाने वेळोवेळी सोपविलेले कार्य पार पाडणे.
४) सार्वजनिक आरोग्याची व्यवस्था करणे.

10 Comments

  1. माहिती खूपच छान आहे परंतु सविस्तर विस्तृत स्वरूपात दिली असती तर अधिक माहीती झाली असती. परंतु छान आहे.
    महेश भास्करे. अकलुज .

    • नगर पंचायत हद्दीत घर दोन मजली असल्यास फक्त दुसरा मजला दुसऱ्याला विकता येतो का
      याबाबत माहिती द्यावी

  2. पुणे जिल्हा मध्ये मंचर(2021) नगरपंचायत झाली आहे

  3. सोलापूर मध्ये वैराग पण नगरपंचायत झाली आहे

  4. सोलापुर मध्ये माळशिरस तालुक्यात नातेपुते नवीन नगर पंचायत झाली आहे ..

  5. सातारा जिल्ह्यात दहिवडी मध्ये नवीन नगरपंचायत झाली आहे

  6. नगरपंचायतचा नगराधक्ष्याला दुकान चालू करण्यास ना हरकत दाखला अथवा इत्तर दाखले देण्याचा अधिकार आहे का?

  7. नाशिक मध्ये एकूण कित्ती नगरपंचायत आहेत.

  8. सातारा जिल्ह्यातील, फलटण तालुक्यातील साखरवाडी येथ नगरपंचायत व्हायला हवी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा