भारत : बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्पाची माहिती

भारत : बहुउद्देशीय जलसिंचन प्रकल्पाची माहिती

१) उकाई प्रकल्प

उकाई प्रकल्प हा गुजरात राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प आहे.

उकाई प्रकल्पाचा उद्देश पूरनियंत्रण करणे,तशेच जलसिंचन, जलविद्युतनिर्मिती करणे होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या योजनेंतर्गत गुजरातमध्ये तापी नदीवर सुरत जिल्ह्यात ‘उकाई‘ व ‘क्राक्रापारा’ ही दोन धरणे बांधली आहेत.

२) दामोदर खोरे योजना

दामोदर ही हुगळी नदीची उपनदी आहे.

पहिल्या पंचवार्षिक योजनेंतर्गत हाती घेतलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून बिहार राज्यात व पश्चिम बंगालमध्ये खालील ठिकाणी धरणे बांधण्यात आली.

झारखंड राज्यात : तिलैय्या, मैथुन, पंचेत, काणोर येथे धरणे. आणि प. बंगाल राज्यात : दूर्गापूर येथे धरण.

झारखंड व प. बंगाल या राज्यांसाठी दामोदर खोरे प्रकल्प वरदान ठरला आहे.

अमेरिकेतील ‘टेनेसी व्हॅली कार्पोरेशन’ (TVC)च्या धर्तीवर १९४८ साली भारतात ‘दामोदर खोरे विकास प्रकल्पाची’ स्थापना झाली.

तत्कालीन बिहार व पश्चिम बंगाल राज्यातील दामोदर नदीच्या महापुराची समस्या या महायोजनेमुळे मिटली असून ‘दामोदर म्हणजे बिहारचे दुःखाश्रू’ ही संकल्पना मागे पडण्यास मदत झाली आहे.

३) भाक्रा-नानगल प्रकल्प

भाक्रा-नानगल प्रकल्पाची स्थापना १९४६ (सतलज नदीवर) झाली.

जंगातील सर्वांत उंच धरणांपैकी एक प्रमुख धरण.

सतलज नदीवर दोन टप्प्यांत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

भाक्रा-नानगल प्रकल्प हि ‘भारतातील सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना’ आहे.

बहुउद्देश : जलसिंचन, जलविद्युत निर्मिती करणे.

पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाणा या चार राज्यांचा संयुक्त प्रकल्प.

या प्रकल्पातील वीज पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान व चंदिगढ यांना पुरविली जाते.

भाक्रा धरणाची वैशिष्ट्ये : धरणाच्या जलाशयाचे नाव : ‘गोविंद सागर’ (देशातील तिसरा मोठा जलाशय)

१२६ मीटर उंचीचे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उंचीचे धरण. येथून नानगल धरणात पाणी सोडले जाते.

४) हिराकुड प्रकल्प

ओडिशातील संबळपूरजवळ हिराकूड येथे ‘महानदीवर जगातील सर्वाधिक लांबीचे धरण’ (२५.८० कि.मी.) बांधण्यात आले आहे.

हिराकुड प्रकल्प हा ओडिशा राज्याचा बहुदेशीय प्रकल्प (जलविद्युत निर्मिती, पूरनियंत्रण).

बांधकाम सुरूवात : १९४८ ,राष्ट्रार्पण : १३ जानेवारी १९५७ (पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते) झाले.

याशिवाय ‘टिकरपाडा’ व ‘नराज’ येथेदेखील महानदीवर धरणे बांधण्यात आली आहेत.

फलित : हिराकूड प्रकल्पातील जलविद्युत रूरकेला (ओडिशा) येथील लोह-पोलाद प्रकल्पास पुरविली जाते.

महानदी व तिच्या मांद, तेल या उपनद्यांमुळे येणाऱ्या महापुरांचे नियंत्रण, पाणीपुरवठा हे उद्देश सफल झाले आहेत.

५) तुंगभद्रा प्रकल्प

तुंगभद्रा प्रकल्प हा विभाजनपूर्व आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे.

तुंगभद्रा प्रकल्पाचा उद्देश : सिंचन व जलविद्युतनिर्मिती करणे आहे.

६) नागार्जुनसागर प्रकल्प

विभाजनपूर्व आंध्र प्रदेश राज्याचा बहुउद्देशीय प्रकल्प.

आंध्र प्रदेशातील गुंटूर व तेलंगणातील नलगोंडा दरम्यान कृष्णा नदीवर धरण.

या धरणापासून ‘जवाहर कालवा’‘लालबहाद्दूर कालवा’ असे दोन कालवे सिंचनाच्या उद्देशाने काढले आहेत.

७) चंबळ प्रकल्प

राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांचा संयुक्त बहुउद्देशीय प्रकल्प चंबळ प्रकल्प हा चंबळ नदीवर आहे.

प्रकल्पातील दोन्ही राज्यातील मिळून धरणांची संख्या ३ आहे .व मुख्य उद्देश : विद्युतनिर्मिती आहे.

मध्य प्रदेशात : चौरासीगढ येथे धरण (जलाशयाचे नाव : गांधीसागर)

राजस्थान : चुलिया येथे धरण (जलाशय : राणाप्रतापसागर) व कोटा येथे धरण (जलाशयाचे नाव : जवाहरसागर)

८) रिहांद प्रकल्प

उत्तर प्रदेशचा प्रकल्प : उत्तर प्रदेशात मिर्धापूर येथे धरण, उद्देश : विद्युतनिर्मिती व जलसिंचन

९) जायकवाडी प्रकल्प

जायकवाडी प्रकल्पाची पायाभरणी १८ ऑक्टोबर १९६५ मध्ये लाल बहादूर शास्त्री यांच्या हस्ते झाली.

महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात पैठण येथे गोदावरी नदीवरील हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

जायकवाडी जलाशयाचे नाव : ‘नाथसागर‘ असे आहे .

हे धरण प्रथम बीड जिल्ह्यातील जायकवाडी (जयकुची वाडी) येथे प्रस्तावित होते; मात्र नंतर औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे हे धरण बांधले तरी मूळ जायकवाडी नाव कायम राहिले.

दुहेरी उद्देश : वीज निर्मिती व वीजनिर्मितीनंतर बाहेर आलेले पाणी पुन्हा उपसा करून धरणात सोडणे, अशी दुहेरी योजना असलेला जायकवाडी हा भारतातील एकमेव प्रकल्प.

धरण परिसरात म्हैसूर (कर्नाटक) येथील ‘वृंदावन गार्डन’च्या धर्तीवर पैठण येथे ‘संत ज्ञानेश्वर उद्यान’ विकसित केले आहे.

जायकवाडी वीजप्रकल्प क्षमता : १२ MW. येथून परळी औष्णिक वीज केंद्रात पाणीपुरवठा केला जातो,

जायकवाडी प्रकल्पावरील भार कमी करण्यासाठी सिंधफणा नदीवर माजलगाव येथे धरण बांधले आहे.

१०) कोसी प्रकल्प

कोसी प्रकल्प : भारतातील (विभाजनपूर्व) बिहार राज्य व नेपाळ यांचा संयुक्त बहुउद्देशीय प्रकल्प.

या प्रकल्पांतर्गत नेपाळमधील छतिया व हनुमाननगर येथे कोसी नदीवर दोन धरणे बांधली आहेत.

११) पेरियार प्रकल्प

या प्रकल्पांतर्गत, केरळमधील पेरियार या पश्चिम वाहिनी नदीवर धरण बांधून त्यातील पाणी पूर्वेकडे वाहणाऱ्या बैगई नदीत सोडण्यात आले आहे.

पेरियार प्रकल्पाचा तामिळनाडूमधील मदुराई व केरळमधील एर्नाकुलम या जिल्ह्यांना फायदा.

१३) इंदिरा सागर धरण

नर्मदा नदीवर मध्य प्रदेशचा बहुउद्देशिय प्रकल्प, इंदिरासागर हा देशातील सर्वात मोठा जलाशय.
स्थळ : मुंडी, मध्य प्रदेश , उंची : ९२ मीटर , वीजनिर्मिती क्षमता : १००० Mw

१४) रामगंगा प्रकल्प

उत्तराखंडमधील (विभाजनपूर्व उत्तर प्रदेशातील) गढवाल येथे रामगंगा या गंगेच्या उपनदीवर धरण,
दिल्ली शहरास पेयजलाचा पुरवठा या धरणातून होतो.

१५) तिहरी प्रकल्प

उत्तराखंड राज्यात भागीरथी नदीवरील धरण (उची: २६०.५ मीटर)
भारतातील प्रथम क्रमांकाचे सर्वाधिक उंचीचे धरण. रशियन तंत्रज्ञांचे सहकार्य, २००६ मध्ये राष्ट्रार्पण.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा