MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एकूण 8 हजार 169 पदे भरण्यासाठी महाभरती ची जाहिरात प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र अराजपात्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून पदे भरली जाणार आहेत.
एकूण जागा :
- सहाय्यक कक्ष अधिकारीची ७८
- राज्य कर निरीक्षकची १५९
- पोलीस उप निरीक्षकची ३७४
- दुय्यम निबंधकची (मुद्रांक निरीक्षक) ४९
- दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क)ची ६
- तांत्रिक सहाय्यकचे १
- कर सहाय्यकची ४६८
- लिपिक टंकलेखक ७०३४
महाराष्ट्र राज्यपात्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त (MPSC Combine Prelim) परीक्षा 2023 ही 30 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे. तर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य ( Mains ) परीक्षा 2 सप्टेंबर 2023 रोजी तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023, 9 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे.
Official Notification :
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या एकूण 8,169 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात(क्रमांक 01/2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे.https://t.co/MCMN6Peqpt
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) January 20, 2023
Good bless you