MPSC Rajyaseva 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 18 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची अधिसूचना जाहीर केली होती आहे. या भरतीद्वारे सामान्य प्रशासन विभाग, महसूल व वन विभाग त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागातील विविध राजपत्रित गट अ व गट ब, पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध.
अधिसूचनेतील महत्त्वाच्या तारखा MPSC Rajyaseva 2025
- अर्ज सादर करण्याची सुरुवात: 28 मार्च 2025
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 17 एप्रिल 2025
- पूर्व परीक्षा: 28 सप्टेंबर 2025
- मुख्य परीक्षा: 2026
एकूण जाहीर जागा –
विभाग | संवर्ग | जागा |
सामान्य प्रशासन विभाग (राज्यसेवा) | राज्य सेवा गट-अ व गट-ब | 127 |
सार्वजनिक बांधकाम विभाग | महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब | 114 |
महसूल व वन विभाग | महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब | 144 |
अर्ज करण्याची पात्रता – Eligibility Criteria
- उमेदवाराचे वय 01 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षे असावे.(इतर नियमांनुसार सूट)
- उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रता प्राप्त केलेली असावी. (Any Graduate)
वनक्षेत्रपाल पात्रता : BSC Botany, Chemistry, Physics, Math, Geology, Statistics, Agriculture, BE/B.Tech Engineering, Science or Math related Degree…
स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा : BE/B.Tech Civil Engineering or Related….
परीक्षा पद्धत – MPSC 2025 Rajyaseva Pattern
पूर्व परीक्षा दोन पेपरमध्ये घेतली जाईल. पेपर 1 मध्ये सामान्य अध्ययन आणि पेपर 2 मध्ये बुद्धिमत्ता चाचणी असेल. प्रत्येक पेपर 200 गुणांचा असेल आणि दोन्ही पेपर एकत्रितपणे 400 गुणांचे असतील.
MPSC राज्यसेवा 2025 साठी नवीन अभ्यासक्रम डाऊनलोड करा
MPSC राज्यसेवा 2025 नवीन वर्णनात्मक पॅटर्न नुसार होणार….
परीक्षेसाठी अर्ज कसा करावा? MPSC Application
उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागतील. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना MPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. अर्ज करण्याचा शुल्क ₹544/- आहे.
जाहिरात डाऊनलोड करा (18 मार्च) | MPSC 2025 Notification PDF |
MPSC नवीन सुधारित परीक्षा योजना (18 मार्च) | डाउनलोड करा |
अर्ज करण्याची लिंक (28 मार्च) | एमपीएससी ऑनलाइन |
परीक्षाची तयारी कशी करावी? How To Apply For MPSC Rajyaseva
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा ही महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षा आहे. या परीक्षेची तयारी करण्यासाठी उमेदवारांनी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात:
- एका चांगल्या अभ्यासक्रमाची निवड करा.
- नियमित अभ्यास करा.
- विविध प्रकारच्या प्रश्नांची सराव करा.
- आपल्या कमकुवत बाजूवर लक्ष केंद्रित करा.
MPSC राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा ही एक कठीण परीक्षा आहे, परंतु योग्य तयारी आणि मेहनतीने ती पार पाडणे शक्य आहे.