MPSC Group B आणि Group C अर्ज करण्यास नवीन संधी , वयोमर्यादेत एका वर्षाची वाढ

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, MPSC ग्रुप B (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा तसेच ग्रुप C परीक्षेच्या पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.

राज्य सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याने एमपीएससीच्या पदभरती जाहिरातींमध्ये बदल करणे आवश्यक झाले. यामुळे जाहिराती प्रसिद्ध होण्यात विलंब झाला. या विलंबामुळे अनेक उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर, आयोगाने 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या आणि निवड प्रक्रिया सुरू न झालेल्या जाहिरातींसाठी वयोमर्यादेत शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे.

MPSC Group B आणि Group C 2024 सयुंक्त परीक्षा अर्ज करण्यास मुदतवाढ …

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • अर्ज सादर करण्याचा दिनांक २६ डिसेंबर, २०२४ दुपारी १४.०० ते दिनांक ०६ जानेवारी, २०२५ रोजी २३.५९ वाजेपर्यन्त
  • ऑनलाईन परिक्षा शुल्क भरण्यासाठी विहित अंतिम दिनांक ०६ जानेवारी, २०२५ रोजी २३.५९ वाजेपर्यप्त
  • भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनादारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा अंतिम दिनांक ०८ जानेवारी, २०२५
  • चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक ०९ जानेवारी, २०२५ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत.

नवीन परीक्षा दिनांक :

  • महाराष्ट्र गट (अराजपत्रित) सेवा संयुक्‍त ब परीक्षा – ०२ फेब्रुवारी, २०२५ (Group B Prelims Date)
  • महाराष्ट्र गट’क सेवा संयुक्‍त पुर्व परीक्षा २०२४ – ०४ मे, २०२५ (Group C Prelims Date)
MPSC शुध्दीपत्रक (२३ डिसेंबर )डाउनलोड करा
MPSC Group B जाहिरात अर्ज करा
MPSC Group C जाहिरात अर्ज करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा