MH-SET 2024 वेळापत्रक जाहीर, पात्रता व माहिती बघा

MHSET 2024 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) ने 3 जानेवारी 2024 रोजी 39वी MH – SET परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. एमएच सेट 2024 परीक्षा 7 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज 12 जानेवारी 202 ते 31 जानेवारी 2024 पर्यन्त ऑनलाइन अर्ज करण्याचे आहे. ही परीक्षा महाराष्ट्र आणि गोव्यातील सहायक प्राध्यापक पदासाठी उमेदवारांची पात्रता ठरविण्यासाठी घेतली जाते.

MH – SET 2024 माहिती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) द्वारे MH SET 2024 Exam महाराष्ट्र आणि गोव्यातील सर्व विद्यापीठे/महाविद्यालय मध्ये सहायक प्राध्यापक (Assistant Professor) पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (एमएच सेट) घेते. MH SET 2024 परीक्षा कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन, कायदा, संगणक शास्र, मानसिक, नीतिशास्त्र आणि सामाजिक शास्त्र; शिक्षण आणि शारीरिक शिक्षण आदी 32 विषयांमध्ये घेतली जाते. पुणे विद्यापीठाद्वारे एमएच सेटसाठी घेतले जाणारे 32 विषय खालील नमूद आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MH – SET पात्र होण्यासाठी उमेद्वारकडे दिलेल्या शाखेतील पदव्युत्तर पदवी (Post Graduate) असणे आवश्यक आहे

MH SET Eligibility Criteria :

MH SET 2024 परीक्षेसाठी अर्ज करण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांनी पात्रता निकष काळजीपूर्वक वाचावेत. MH SET परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवारांनी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • MH SET विषयामध्ये UGC मान्यता दिलेली पदव्युत्तर पदवी (Post Graduate Degree) असणे आवश्यक आहे.
  • परदेशी विद्यापीठ/संस्थेपासून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा/प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांच्या पदवी/डिप्लोमा/प्रमाणपत्राने संबंधित क्षेत्रातील मास्टर डिग्रीशी समतुल्यता ठरलेली असणे आवश्यक आहे. (AIU Equivalent)
  • पदव्युत्तर परीक्षा किंवा त्या समतुल्य परिक्षेत किमान 55% गुण असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 50% गुणांची आवश्यकता आहे.
  • ज्या उमेदवारांनी पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम चालू असो (Final Year Pursuing) किंवा जे अंतिम वर्षाची पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, ते देखील एमएच सेट 2024 परीक्षा देण्यासाठी पात्र आहेत.
  • इतर राज्यातील (महाराष्ट्र आणि गोवा वगळून) राखीव प्रवर्गातील उमेदवारांना मुक्त प्रवर्गाचा भाग म्हणून गणले जाईल.
  • या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी वरची वयोमर्यादा नाही.

MHSET Subjects List

MH SET Subject Codes & NamesQualificationPost Graduate Subject
01-MarathiMAMarathi
02-HindiMAHindi
03-EnglishMAEnglish
04-SanskritMASanskrit
05-UrduMAUrdu
10-HistoryMAHistory, Archaeology
11-EconomicsMA/MScEconomics, Home Economics, Financial Economics, Agribusiness Economics
12-PhilosophyMAPhilosophy
13-PsychologyMAPsychology
14-SociologyMASociology
15-Political ScienceMAPolitics/Political Science
16-Defence & Strategic StudiesMADefence Studies/ Defence & Strategic Studies
17-Home ScienceMSc/MAHome Science
18-Library & Information ScienceMLibLibrary Science/Library & Information Science
19-Journalism & Mass CommunicationMAJournalism & Mass Communication/ Journalism
20-Social WorkMASocial Work
21-Public AdministrationMAPublic Administration
30-Mathematical ScienceMSc/MA/MTech (Science)Mathematics/ Mathematical Science/ Statistics/ Appl. Math/ Ind Maths
31-Environmental ScienceMScEnvironmental Science/ Geoinformatics
32-Physical ScienceMScPhysics/ Physical Science/ Astrophysics
33-Chemical ScienceMScChemistry/ Chemical Science
34-Life ScienceMSc/MTech (Science)Botany/ Zoology/ Microbiology/ Life Science/ Biotechnology/ Biochemistry/ Virology/ Bioinformatics/Genetics
35-Earth, Atmospheric, Ocean & Planetary ScienceMScGeology/ Geoinformatics
36-GeographyMA/MScGeography
37-Computer Science & ApplicationMSc/MCA/ME/M.Tech Computer Science & Application/ Computer Science / Information Technology/ Industrial Mathematics With Computer Application
38-Electronic ScienceMSc/ME/M.TechElectronics/ Instrumentation
39-Forensic ScienceMScForensic Science
50-CommerceMComCommerce
51-ManagementMBA/MIM/MHRDM/MFM/MMM/MLSManagement, Marketing, HR, Finance, IT
60-LawLLM Law
70-EducationMEd/MAEducation
71-Physical EducationMPEdPhysical Education
MH SET Criteria

MH SET 2024 Important Dates :

एमएच सेट 2024 महत्त्वाच्या तारखा

क्र.नावतारीखवेळ
1ऑनलाइन अर्ज सुरू/ Application Starts12.01.202411:00 सकाळ
2ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख / Last Date31.01.202406:00 संध्याकाळ
3ऑनलाइन फी पेमेंटची शेवटची तारीख/ Online Payment31.01.202406:00 संध्याकाळ
4ऑनलाइन अर्ज सुरू / Application with Late Fees01.02.202411:00 सकाळ
5ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख (विलंब शुल्का रु.500/)07.02.202406:00 संध्याकाळ
6ऑनलाइन फी पेमेंटची शेवटची तारीख / Last Date with Late Fees07.02.202406:00 संध्याकाळ
7ऑनलाइन अर्ज फॉर्ममध्ये दुरुस्ती सुरू (संकेतस्थळावर)08.02.202411:00 सकाळ
8ऑनलाइन अर्ज फॉर्ममध्ये दुरुस्ती/सुधारणा करण्याची शेवटची तारीख (10-02-2024 नंतर कोणत्याही दुरुस्तीच्या विनंत्या स्वीकारल्या जाणार नाहीत)10.02.202406:00 संध्याकाळ
9प्रवेशपत्र वेबसाइटवर उपलब्धता / Hall Ticket28.03.202410:00 सकाळ
10परीक्षाची तारीख / Exam Date07.04.2024

MH SET 2024 Exam Pattern

राज्य पात्रता परीक्षा (MH SET) ही वस्तुनिष्ठ पद्धतीने घेतली जाते आणि त्यात दोन पेपर असतात. दोन्ही पेपर पूर्णपणे वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतात आणि ते खालील दिलेल्या तक्त्यानुसार विश्रांतीशिवाय दोन वेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा दिवशी घेतले जातात. लक्षणीय बाब म्हणजे, यामध्ये नकारात्मक गुण देणे नाही.

सत्रपेपरप्रश्न संख्या गुणकालावधी
पहिलाI५० प्रश्न, सर्व आवश्यक१००१ तास
दुसराII१०० प्रश्न, सर्व आवश्यक२००२ तास

MH SET Application – अर्ज कसा करावा

अर्ज प्रक्रिया:

  • एमएच-सेटसाठी अर्ज प्रक्रिया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन घेतली जाते: https://setexam.unipune.ac.in/
  • उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणी करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे.
  • एकदा नोंदणी झाल्यानंतर, उमेदवार वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, परीक्षा केंद्र पसंती इ. आवश्यक तपशील देऊन ऑनलाइन अर्ज फॉर्म भरू शकतात.
  • उमेदवारांनी छायाचित्र, स्वाक्षरी, जाती प्रमाणपत्र (लागू असेल) इ. आवश्यक दस्तावेजांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करणे आवश्यक आहे.
  • क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन मोडद्वारे अर्ज शुल्क भरा.
अधिकृत संकेतस्थळ MH SET 2024 Portal
महासराव Home

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा