मराठी व्याकरण प्रश्नसंच ८ : Marathi Grammar Practice Test 08

1) खालीलपैकी कवी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता?

1) कवियित्री
2) कवित्री
3) कवयित्री
4) कवयत्री

2) चुकीची जोडी शोधा?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1) 25 वर्ष-रौप्य महोत्सव
2) 50 वर्ष-सुवर्ण महोत्सव
3) 65 वर्ष-हिरक महोत्सव
4) 100 वर्ष-शताब्दी महोत्सव

3) ‘शाश्वत’ या शब्दाचा शब्दसमूह कोणता?

1) शिल्लक राहिलेला
2) कायम टिकणारा
3) न टाळता येणारे
4) मुदयाला धरुन असणारे

4) मी आंबा खातो याचा काळ ओळखा.

1) साधा वर्तमानकाळ
2) साधा भूतकाळ
3) साधा भविष्यकाळ
4) चालू वर्तमानकाळ

5) मी दहावी परीक्षा पास झालो चा काळ ओळखा?

1) अपूर्ण भूतकाळ
2) पूर्ण भूतकाळ
3) साधा भूतकाळ
4) चालू वर्तमानकाळ

6) टाकीचे घाव सोसल्याशिवाय ……येत नाही.

1) मोठेपण
2) ईश्वरपण
3) देवपण
4) विश्वरुप

7) खालील शब्दातील सामान्य नाम ओळखा.

1) डोंगर
2) सहयाद्री
3) अरवली
4) हिमालय

8) सायकल हा शब्द मूळ……..भाषेतला आहे?

1) हिंदी
2) इंग्रजी
3) तमिळ
4) फारसी

9) लगीनघाई’ शब्दसमूहास योग्य शब्द निवडा?

1) धावपळ
2) गोंधळ
3) झटापट
4) शातता

10) ‘सुपारी देणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.

1) सुपारी खाण्यास देणे
2) पानात सुपारी टाकणे
3) काम सोपविणे
4) यापैकी नाही

11) वाक्यातील प्रयोग ओळखा ‘तिने चिंच खाल्ली’.

1) सकर्मक कर्तरी
2) कर्मणी
3) अकर्मक कर्तरी
4) भावे

12) अनेकवचन करा ‘तळे’

1) तळ्या
2) तळे
3) तळवे
4) तळी

13) शंकराची उपासना करणारा —-

1) लिंगायत
2) कापालिक
3) शैव
4) भोळेशंकर

14) ज्याची किंमत होऊ शकत नाही असे —–

1) बिनमोल
2) अनमोल
3) बहुमोल
4) महाग

15) द्विगू समास-

1) वनभोजन
2) अनिष्ट
3) चतुर्भुज
4) धननीठ

16) त-हेवाईचा राजा काय आहे.

1) विशेषनाम
2) गुणविशेषण
3) क्रियापद
4) सवनाम

17) अमृताहूनी गोड। नाम तुझे देवा ।। यामधील अलंकार ओळखा.

1) व्यतिरेक
2) भ्रांतिमान
3) रुपक
4) अतिशयोक्ती

18) शब्दाच्या किती जाती आहेत?

1) सहा
2) आठ
3) पाच
4) दहा

19) ‘आंगतूक’ च्या विरुद्धार्थी शब्द कोणता.

1) कधीतरी
2) निर्गुतूक
3) अचानक
4) आमंत्रित

20) पाहण्यासाठी जमलेले लोक : यासाठी योग्य शब्द कोणता?

1) श्रोते
2) प्रेक्षक
3) गर्दी
4) जमाव

21) खालीलपैकी सूर्य या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता?

1) प्रभाकर
2) दिनकर
3) दिवाकर
4) निशाकर

22) विदयार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी या वाक्याचा प्रकार ओळखा

1) संकेतार्थ
2) आज्ञार्थी
3) उद्गारार्थी
4) विध्यर्थ

23) आधुनिक विचारांचा दृष्टिकोण असणारा?

1) प्रतिगामी
2) पूरोगामी
3) अधोगामी
4) उर्ध्वगामी

24) लोक —– च्या मागे धावतात म्हणूनच फसतात?

1) नंदीबैल
2) देवमाणूस
3) घोरपड
4) मृगजळ

25) खडा या शब्दाचे अनेकवचन कोणते.

1) खडी
2) खेडे
3) खोडी
4) खडे

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा