१) पुढील विभक्तीमधुन पंचमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा.
1) त ई आ
2) ऊन हून
3) स लाना ते
4) चा चीचे
२) पाया घालणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
1) शेवटाला नेणे
2) पाया पडणे
3) पाय धुणे
4) प्रारंभ घालणे
३) रूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
1) रंगरूप
2) बेरूप
3) सुरूप
4) स्वरूप
४) पुढील नावांमधुन कवयित्रीचे नसलेले नाव सांगा.
1)इंदिरा संत
2) अरुणा ढेरे
3) आरती प्रभू
4) शांता शेळके
५) पुल्लिंगी शब्द ओळखा.
1) जोगी
2) शांती
3) भुवई
4) गुज
६) शांत या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
1) नीरव
2) निखळ
3) निर्मळ
4) निव्वळ
७) पुढील शब्दांमधुन विशेषण ओळखा.
1) कृती
2) कट्टर
3) कवाड
4) कट्टा
८) अर्पुवाई हे प्रवास कोणी लिहले?
1) वि. भा देशपांडे
2) गो. पु. देशपांडे
3) पु. ल. देशपांडे
4) ना. घ. देशपांडे
९) इकडे आड तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ ओळखा.
1) मुबलक पाणी असणे
2) दोन्ही बाजूने अडचणीत सापडणे
3) एका वेळी दोन संधी मिळणे
4) एखादया गावी नदी नसणे
१०) प्रश्नार्थक वाक्य ओळखा.
1) होते ते सगळे बऱ्यासाठी.
2) बरा होशील हं.
3) बरं आहे का ?
4)बर आहे येतो .
११) आम्ही प्रत्येक वस्तुकडे पैशाच्या माध्यमातुन पाहतो वाक्यातील कर्ता ओळखा.
1) वस्तु
2) पैसा
3) प्रत्येक
4) आम्ही
१२) म. फुले यांनी समाज जागृती केली. वाक्याचा प्रकार ओळखा.
1) केवलवाक्य
2) संयुक्त
3) मिश्र
4) आज्ञार्थी
१३) बाबांनी विमानाने प्रवास केला. अधोरेखीत शब्दातील विभक्तीचा कारकार्थ ओळखा.
1) कर्ता
2) कर्म
3) करण
4) संप्रदान
१४) पक्षी आकाशात उडाले. अधोरेखीत विभक्तीचा कारकार्थ ओळखा.
1) संबंध
2) अधिकरण
3) अपादान
4) सप्रदान
१५) चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. विशेषणाचा प्रकार ओळखा.
1) अधिविशेषण
2) विधीविशेषण
3) सार्वनामिक विशेषण
4) यापैकी नाही
१६) आपण आम्हाला मार्गदर्शन करावे. सर्वनामाचा प्रकार ओळखा.
1) आत्मवाचक
2) पुरूषवाचक
3) संबंधी
4) दर्शक
१७) मराठीत मुळसर्वनामे किती आहेत?
1) 6
2) 9
3) 12
4) निश्चित सांगता येत नाही
१८) एकवचनी शब्द निवडा.
1) ससा
2) दिशा
3) आज्ञा
4) भाषा
१९) खालीलपैकी विशेषनाम ओळखा.
1) महासागर
2) नवलाई
3) सरस्वती
4) गुलामगिरी
२०) खालीलपैकी सामान्यनाम ओळखा.
1) महासागर
2) नवलाई
3) सरस्वती
4) गुलामगिरी
२१) नामाबद्दल विशेषण माहिती सांगणारा शब्द म्हणजे …….होय.
1) भाववाचक नाम
2) विशेषण
3) प्रतिनाम
4) सर्वनाम
२२) राम गाणे गातो- या वाक्यातील गाणे हे काय आहे?
1) कर्ता
2) विशेषण
3) कर्म
4) सर्वनाम