१) ‘लोणचे’ शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे?
1) कानडी
1) पोर्तुगीज
2) अरबी
4) फारशी
२) ‘शिपाई शूर होता’ या वाक्यातील शूर काय आहे?
1) नाम
२) सर्वनाम
३) विशेषण
4) क्रियापद
३) समानार्थी ‘वीज’ याबद्दल ……….
1) चपला
२) चमकणे
३) तेज
4) प्रकाश
४) खालीलपैकी कोणत्या वर्णाच्या पूर्वी स्वर आहे ?
1) ॲ
२) अः
३) अ
4) ऊ
५) देशी शब्द ओळखा.
1) पुष्प
२) कवी
३) टेबल
4) बोका
६) उपसर्गसाधित शब्द निवडा.
1) पैठण
२) भरजरी
३) बंदिस्त
4) मोफत
७) दिलेल्या संधीविग्रहाची योग्य संधी करा. सत् + मान
1) सण्मान
२)सन्मान
३) सम्मान
4) सत्यमान
८) शुद्ध शब्द ओळखा.
1) लुटूपुटू
२)लुटपुट
३) लूटूपुटू
4) लुटुपुटु
९) ‘लिंबु’ या शब्दासाठी अनेकवचनी शब्द ओळखा.
1) लिंबे
२) लिबू
३) लिंबू
4) लिबु
१०) ‘पतीचा भाऊ’ या शब्दसमुहासाठी योग्य शब्द निवडा.
1) नवरदेव
२) दीर
३) मेहुणा
4) साडु
११) तिन्ही लिंगात येणारा शब्द ओळखा.
1) वेळ
२) मुंगूस
३) पोर
4) बाग
१२) हात दाखवून ……… म्हण पूर्ण करा.
1) गुणलक्षण
२) अवलक्षण
३)अपूर्व क्षण
4) लक्षण
१३) षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते?
1) ऊन-हून
२) चा, चि, चे
३) नी, शी, ई
4) त, ई, आ
१४) ‘देवाज्ञा होणे’ म्हणजे …..
1) साक्षात्कार होणे
2) देव पावणे
3) अवतार घेणे
४) मृत्यू पावणे
१५) अचूक विधाने ओळखा.१) एकाक्षरी शब्दाचे सामान्यरुप होत नाही. 2) परकीय भाषेतील शब्दांचे सामान्यरुप होत नाही.
1) 1 बरोबर 2 चूक
2) 1 चूक 2 बरोबर
3) दोन्ही चूक
४) दोन्ही बरोबर
१६) ‘किमान’ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा.
1) कमान
2) जास्त
3) कमी
४) कमाल
१७) दर्शक सर्वनाम ओळखा.
1) कोण
2) हा
3) आपण
४) मी
१८) ‘शब्द लावणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?
1) दोष देणे
2) बोलणे
3) शब्दांची रचना करणे
४) लेखन करणे
१९) ‘पिकलेले फळ’ खाली पडले. वाक्यातील विशेषण ओळखा.
1) पिकलेले
2) फळ
3) खाली
४) पडले
२०) ‘पूर्ण भविष्यकालीन’ क्रियापद कोणते?
1) वाचले असेल
2) वाचत जाईल
3) वाचेल
४) वाचत असेल