Mahatma Gandhi Information in Marathi : समाज सुधारक महात्मा गांधी संपूर्ण माहिती मराठी मध्ये – आज येथे आपण बघणार आहोत संपूर्ण महात्मा गांधी यांची माहिती त्यांचे सामाजिक कार्य , महात्मा गांधी पुस्तके , विचार , भाषण व बरच काही .
महात्मा गांधी माहिती मराठी मध्ये
- जन्म : २ ऑक्टोबर १८६९
- मृत्यू : ३० जानेवारी १९४८
- पूर्ण नाव : मोहनदास करमचंद गांधी
- वडील :. करमचंद
- आई : पुतळाबाई
- जन्मस्थान : पोरबंदर (गुजरात )
- शिक्षण : इ. स. १८८७ मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण.
- इ. स. १८९१ मध्ये इंग्लंडमध्ये बॅरिस्टर होऊन ते भारतात परत आले.
- विवाह: कस्तुरबासोबत
- ओळख : भारताचे राष्ट्रपिता ,महात्मा
महात्मा गांधी यांची वैयक्तिक माहिती : Mahatma Gandhi Personal information in Marathi
भारताचे राष्ट्रपिता ,महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. १८८८ मध्ये ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी बॅरीस्टर ही पदवी मिळवली.
१८९१ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिलीला सुरवात केली. पण आयुष्यात एक वळण अचानक असे आले की ते दक्षिण आफ्रिकेत गेले. तेथे जाऊन वकिली करू लागले. तेथेही ते योगायोगानेच तेथील भारतीयांच्या अधिकाराच्या आंदोलनात ओढले गेले. पुढे या आंदोलनाचे नेतृत्व करून त्यांनी अहिंसात्मक आंदोलनाद्वारे आपले हक्क मिळविण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवला. सत्याग्रहाचा प्रयोगही त्यांनी तेथेच केला.
तेथेच त्यांनी १९०३ मध्ये इंडियन ओपीनिय नावाचे वृत्तपत्र काढले. सत्याग्रह शिबिराची स्थापनाही त्यांनी तेथे केली. १९१४ मध्ये ते भारतात परतले.
महात्मा गांधी केवळ अट्टल राजकारणीच नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते चांगले समाज सुधारक, कुशल अर्थज्ज्ञ होतेच याबरोबरच त्यांचा उत्कृष्ट जनसंपर्क होता. ज्यावेळी मुद्रण माध्यम इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते, अशा वेळी गांधीजींनी आपल्या विचारांची लाट गावागावात आणि शहराशहरात पोहचवली. त्यांच्या सरळ, साध्या व सोप्या भाषेचा प्रभाव लाखो लोकांवर पडत असे.
महात्मा गांधी यांचे कार्य – Mahatma Gandhi Works in Marathi
इ.स. १८९३ मध्ये त्यांना दादा अब्दुहा यांच्या व्यापारी कपनांचा खटला चालविण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत जावे लागले.
दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांना स्वतःलाही अन्याय-अत्याचाराला तोंड द्यावे लागले. त्याचा प्रतिकार करण्यासाठी भारतीय लोकांना संघटित करून त्यांनी इ. स. १८९४ मध्ये नाताळ इंडियन काँग्रेसची स्थापना केली.
इ.स. १९०६ मध्ये तेथील शासनाने एका आदेशान्वये कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते. याशिवाय कृष्णवर्णीयांच्या स्वातंत्र्यावर अनेक निबंध घातले. या अन्यायाविरुद गांधीजींनी सत्याग्रहाच्या मागनि यशस्वी लढा दिला.
इ.स. १९१५ मध्ये गांधीजी भारतात परत आले आणि त्यांनी सुरवातीला साबरमती येथे सत्याग्रह आश्रमाची स्थापना केली..
इ.स. १९१७ मध्ये बिहारच्या चंपारण्य भागात ब्रिटिश मळे मालकांकडून भारतीय शेतकन्यांवर ठरलेल्या दरात पिकविण्याची सक्ती केली जात असे. ही नीळ ठरलेल्या दरात मळेवाल्यांना विकण्याची सक्ती असल्यामुळे त्यात शेतकन्यांचे आर्थिक नुकसान होत होते. गांधीजींनी चंपारण्य शेतकन्यांना संघटित करून सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केले. परिणाम ब्रिटिश शासनाने शेतकन्यांवरील अन्याय दूर केला.
इ.स. १९१७ मध्ये गुजरातमध्ये खेडा जिल्ह्यात प्लेगची साथ पसरली तसेच तेथे वारंवार दुष्काळ पडत असे. त्यामुळे शेतकन्यांना सारा भरणे अशक्य झाले. त्यांनी सरकारकडे सारामाफीची मागणी केली; परंतु ब्रिटिश सरकारने ती अमान्य केली.
तेव्हा शेतकन्यांनी साराबंदीची चळवळ सुरू केली. गांधीजींनी शेतकऱ्यांचे नेतृत्व स्वीकारले व साराबंदीचा सत्याग्रह सुरु केला. थोड्याच कालावधीत सरकारने माघार घेतली व शेतसारा माफ केला.
इ.स. १९१८ मध्ये अहमदाबाद येथील कापड गिरणीतील कामगारांनी वेतनवाढ मागितली हाता. गिरणी मालकांनी या वेतनवाढीच्या मागणीला नकार दिला,गांधीजींच्या सल्ल्यावरून कामगारांनी संप ब उपोषण केले. गांधीजीही कामगारांबरोबर उपोषणाला बसले…अखेर गिरणी मालकांनी कामगारांची वेतनवाढीची मागणी मान्य केली.
इ. स. १९२० मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय सभेचे नेतृत्व महात्मा गांधीकडे आले.
इ.स. १९२० सालच्या नागपूर येथील अधिवेशनात राष्ट्रीय सभेने असहकाराच्या देशव्यापी चळवळीला पाठिंबा देणारा ठराव संमत केला. असहकार आंदोलनाची सर्व सूत्रे महात्मा गांधींकडे सोपवण्यात आली. असहकाराच्या ठरावान्वये शाळा महाविद्यालये, विधिमंडळे, न्यायालये, सरकारी कचेऱ्या, परदेशी माल यांच्यावर बहिष्कार घालण्याचे ठरले.
इ.स.१९२४ साली बेळगाव येथे राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.
इ. स. १९३० मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली. मिठावरील कर व मीठ तयार करण्याची सरकारची मक्तेदारी रद्द करावी, अशी गांधीजींनी व्हाइसरॉयकडे मागणी केली. व्हाईसरॉयने ही मागणी धुडकावून लावली तेव्हा गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून सत्याग्रह करण्याचे ठरविले.
महात्मा गांधी यांची दांडी यात्रा : Dandi Yatra information in Marathi
मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातमधील समुद्रकिनाऱ्यावरील गाव निश्चित केले. साबरमती आश्रमातून ७८ कार्यकत्यांनिशी गांधीजींनी दांडीकडे प्रयाण केले. ३८५ कि. मी. च्या या वाटचालीत असंख्य कार्यकर्ते त्यांना येऊन मिळाले. ५ एप्रिल १९३० रोजी गांधीजी दांडी येथे पोचले.
समुद्रकिनाऱ्यावरील मीठ उचलून त्यांनी मिठाचा कायदा मोडला व देशभर कायदेभंगाची चळवळ सूरु केली.
इ. स. १९३१ मध्ये राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहिले.
इ. स. १९३२ मध्ये त्यांनी अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना केली.
इ. स. १९३२ मध्ये महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जातीय निवाड्यासंदर्भात जो करार झाला तो पुणे करार म्हणून ओळखला जातो.
इ. स. १९३३ मध्ये त्यांनी ‘हरिजन’ नावाचे वृत्तपत्र सुरू केले.
इ. स. १९३४ मध्ये गांधीजींनी वर्धाजवळ ‘सेवाग्राम’ या आश्रमाची स्थापना केली. हरिजन सेवा, ग्रामोद्योग, ग्रामसुधार इत्यादी विधायक कार्यक्रम राबविण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
इ. स. १९४२ मध्ये चले जाव चळवळ सुरू झाली. ‘करेंगे या मरेंगे’ हा नवा मंत्र गांधीजींनी लोकांना दिला.
राष्ट्रपती महात्मा गांधी यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील संघर्ष : Mahatma Gandhi Freedom Fight in Marathi
सन ९ जानेवारी १९१५ साली कॉन्ग्रेस चे उदारमतवादी नेता “गोपाळकृष्ण गोखले” यांच्या सल्ल्याने महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले. महात्मा गाधी हे ‘गोपाळकृष्ण गोखले” यांना आपले राजकीय गुरु मानत असतं. ज्यावेळी महात्मा गांधी भारतात परत आले होते त्यावेळी ते एक राष्ट्रवादी नेता व संयोजक आणि संघटक म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली होती.
आपल्या राजकीय कार्याला सुरुवात करण्याच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या मनावर गोपाळ कृष्ण गोखले यांच्या संयम, संतुलन आणि व्यवस्थेच्या आतमध्ये राहून काम करणे या सारख्या विचाराचा प्रभाव त्यांच्या मनावर पडला होता. गोपाळ कृष्ण गोखले त्यावेळेला “भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेसचे” अध्यक्ष होते. भारतात आल्यानंतर गांधीजीनी देशाच्या विविध भागात जावून तेथील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक विषय समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले.
महात्मा गांधी यांची ग्रंथसंपदा
माय एक्सपेरिमेंट वुईथ ट्रुथ.
महात्मा गांधी पुस्तके : Mahatma Gandhi Books in Marathi
- इंडिअन होम रूल (हिंद स्वराज्य)
- गांधीजींची संक्षिप्त आत्मकथा
- गांधीजींचे जीवन त्यांच्याच शब्दांत
- गांधी विचार दर्शन: अहिंसाविचार
- गांधी विचार दर्शन: राजकारण
- गांधी विचार दर्शन: सत्याग्रह प्रयोग
- गांधी विचार दर्शन: सत्याग्रह विचार
- गांधी विचार दर्शन: सत्याग्रहाची जन्मकथा
- गांधी विचार दर्शन: हरिजन
- नैतिक धर्म
- माझ्या स्वप्नांचा भारत
तुम्ही बघितली आहे Mahatma Gandhi Information in Marathi , आवडली असल्यास नकी कंमेंट करून कळवा . इतर सर्व समाज सुधारक येथे बघा .