- जन्म २३ एप्रिल १८७३
- मृत्यू : २ एप्रिल १९४४
- पूर्ण नाव : महर्षि विठ्ठल रामजी शिंदे
- वडील : रामजी
- आई: यमुनाबाई
- जन्मस्थान : कर्नाटकातील जमखिंडी
- शिक्षण: विठ्ठल रामजी शिंदे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जमखिंडीतच झाले.
महर्षी वि. रा. शिंदे (१८७३-१९४४)
महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कर्नाटकातील जमखिंडी येथे २३ एप्रिल १८७३ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव यमुनाबाई असे होते.
त्यांचे पाळण्यातील नाव तुकाराम असे होते पण रामजी शिंदे हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त असल्याने त्यांनी आपल्या या मुलाचे नाव विठ्ठल असेही ठेवले व पुढे तेच नाव रूढ झाले.
विठ्ठल रामजी शिंदे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जमखिंडीतच झाले.
शाळेत ते एक बुध्दिमान विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. इ. स. १८९१ मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर काही काळ त्यांनी शिक्षकाची नोकरी केली.
पुढे इ. स.१८९३ मध्ये त्यांनी उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
पुण्यातील शिक्षणक्रमात त्यांना मराठा एज्युकेशन सोसायटीचे व बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांचे साहाय्य मिळाले. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून इ. स. १८९८ मध्ये त्यांनी बी. ए. ची पदवी संपादन केली.
महर्षी वि.रा.शिंदे यांचा मराठी, संस्कृत व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. फर्गुसन कॉलेजमध्ये त्यांनी बी एची पदवी मिळविली.
महर्षी शिंदे यांना डेक्कन मराठा एज्युकेशन असोशिएशनने शिक्षणाकरीता दरमहा १०रु दिले.
१९०१ मध्ये मुंबईतील प्रार्थना समाज व कलकत्यातील ब्राम्हो समाज यांच्या साह्याने इंग्लंड मधील मॅनचेस्टर येथे धर्म शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी ते गेले.
१९०५ साली महर्षी शिंदे यांनी पुणे येथे अस्पृश्य मुलांसाठी रात्रशाळा सुरु केल्या.
१६ ऑक्टोंबर १९०६ वि रा शिंदे यांनी अस्पृश्यतेचे निर्मुलन करण्यासाठी “ऑल इंडिया डिप्रेस क्लास मिशन” ची स्थापना केली.
महषी वि. रा. शिंदे जॉन स्टुअर्ट मिल या लेखकाच्या ऑन लिबर्टी व सबजेक्ट ऑफ बुमन या ग्रंथाचा प्रभाव होता.
२५ मे १९१६ रोजी पुण्यातील वसंत व्याख्यानमालेत गुन्हेगार जातीची सुधारणा या विषयावर त्यांनी चर्चासत्र चालविले होते.
१९११ मध्ये मुरळी सोडण्याच्या पद्धतीचे विरोधामध्ये त्यांनी प्रतिबंधक परीषद बोलावली. महर्षी शिंदे यांनी मुरळी सोडणे या प्रथेचा विरोध केला.
१९१७ मध्ये कलकत्ता येथे राष्ट्रीय सभेचे पार पडलेल्या अधिवेशनाच्या पहिल्या महीला अध्यक्ष म्हणुन अनी बेझंट यांची निवड झाली. या अधिवेशनामध्ये “अस्पृश्यता पाळु नये” असा ठराव पास करुन घेण्यामध्ये शिंदे याचे मोलाचे योगदान आहे.
१९२० मध्ये नागपुर येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परीषद बोलावली.
महर्षी वि. रा. शिंदे यांचे कार्य
इ. स. १८९८ मध्ये त्यांनी प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली.
इ. स. १९०१ मध्ये विठ्ठल शिंदे यांनी प्रार्थना समाजाच्या साहाय्याने युनिटेरियन या धर्मपंथाची शिष्यवृत्ती मिळवून ते ऑक्सफर्डला गेले व तेथील मँचेस्टर कॉलेजात त्यांनी तौलनिक धर्मशास्त्राचे शिक्षण घेतले.
इंग्लंडहून मायदेशी परत येत असताना अॅमस्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषद मध्ये त्यांनी ‘हिंदुस्थानातील उदार धर्म’ हा प्रबंध वाचला. इ. स. १९०३ मध्ये ते मायदेशी परत आले.
एकेश्वरवादी धर्माचे प्रचारक या नात्याने त्यांनी मुंबईच्या प्रार्थना समाजाचे काम १९.१० सालापर्यंत केले. या काळात त्यांनी तरुण ब्राह्मसंघ काढला. एकेश्वरी धर्म परिषद भरविण्यात पुढाकार घेतला व ‘सुबोधपत्रिका’ साप्ताहिकात त्यांनी अनेक लेख लिहिले.
इ. स. १९०५ मध्ये महर्षि विठ्ठल शिंदे अहमदनगरजवळ असलेल्या भिंगार या गावी अस्पृश्य बांधवांच्या सभेला निमंत्रित केले होते.
इ. स.१९०६ मध्ये अस्पृश्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करून त्यांचा उद्धार करण्यासाठी महर्षि शिंदे यांनी मुंबई येथे ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ (निराश्रित साहाय्यकारी मंडळ) हि संस्था स्थापन केली.
डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या वतीने महर्षि विठ्ठल शिंदे यांनी अने उपक्रम हाती घेतले. अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा, वसतिगृहे उघडणे, अस्पृश्यांच्या वस्तीत शिवणकामाचे वर्ग चालविणे, त्यांच्या प्रबोधनासाठी व्याख्यान , कीर्तने आयोजित करणे, आजारी माणसांची शुश्रूषा करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होता. त्यांनी या संस्थेच्या शाखा मुंबई, पुणे, सातारा, ठाणे, कोल्हापूर, अकोला इत्यादी ठिकाणी उघडल्या.
इ. स. १९१० मध्ये त्यांनी जेजुरी येथे मुरळीप्रतिबंधक सभा भरवून मुरळ्यांकडे समाजाचे लक्ष वेधले.
इ. स. १९१७ मध्ये कलकत्ता येथे अॅनी बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात अस्पृश्यता निवारणासंबंधीचा ठराव संमत व्हावा म्हणून त्यांनी पुढाकार घेतला.
इ. स. १९१८ मध्ये त्यांनी अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद, मुंबई येथे भरविली. मुंबईच्या प्रार्थना समाजाला त्यांचे हे कार्य न रूचल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला व पुढे इ. स. १९२३-२४ मध्ये ते कलकत्त्याच्या ब्राह्मो समाजात गेले.
ब्राह्मो समाजाचे मंगळूर येथील आचार्य म्हणून काही काळ त्यांनी काम केले.
इ. स. १९२८ मध्ये पुणे येथे शेतकरी परिषदेचे आयोजन करून त्यांनी येथील शेतकऱ्यांच्या समस्या सरकारपुढे मांडल्या आणि त्यांचे निवारण करण्यासंबंधी सरकारकडे आग्रह धरला. अशाच प्रकारच्या परिषदा मुंबई, तेरदाळ, जळगाव, चांदवड इत्यादी ठिकाणी आयोजित केल्या.
इ. स. १९३० मध्ये महात्मा गांधींच्या सत्याग्रह चळवळीत ते दाखल झाले व कायदेभंगाबद्दल त्यांना ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा झाली.
इ. स. १९३३ मध्ये त्यांनी ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हे पुस्तक लिहिले.
इ. स. १९३४ मध्ये बडोदा येथील मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी भरलेल्या तत्व न व समाजज्ञान’ या शाखा संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
महर्षी वि. रा. शिंदे यांची ग्रंथ संपदा :
१) अनटचेबल इंडिया
२) भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न -१९३३
३) माझ्या आठवणी व अनुभव (आत्मचरित्र्य)
४) मराठी भाषीक व कानडी भाषीक संबंध लेख
५) भागवत धर्माचा विकास हा महत्वपुर्ण लेख