महाराष्ट्रातील तरुणांना जर्मनीत नोकरची संधी, 10,000 पदे ऑनलाईन अर्ज सुरु

Maha Germany Recruitment 2024 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे! राज्य सरकारने आपल्या तरुणांना विदेशात उज्ज्वल भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जर्मनीच्या बाडेन-वूटेनबर्ग (Baden-Württemberg ) राज्याशी करार करून, राज्य सरकारने मराठी तरुणांना या राज्यात रोजगार उपलब्ध करून देण्याची महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.

या योजनेतून राज्य सरकार तरुणांना संपूर्ण सहकार्य करणार आहे. यात भाषा प्रशिक्षण, कौशल्य विकास, रोजगार मार्गदर्शन आणि वीजां मिळवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया यांचा समावेश होईल. यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना जर्मनीत सहजतेने नोकरी मिळण्यास मदत होईल.

या पहिल्या टप्प्यात, 10,000 उमेदवारांना विविध क्षेत्रातील 30 प्रकारच्या नोकऱ्यांसाठी आवश्यक असलेले सर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून निवडलेल्या या उमेदवारांना जर्मन भाषेचे मोफत प्रशिक्षण देण्यात येईल. याशिवाय, त्यांना संबंधित व्यवसायाचे (ट्रेडचे) ही व्यावहारिक प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून ते जर्मन कंपन्यांमधील गरजेनुसार योग्य असतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोणत्या क्षेत्रात आहे नोकरी :

Healthcare

  • Nurse (Hospital)/ Medical assistants (MFA)
  • Lab assistant
  • Radiology assistant
  • Dental assistant
  • Care giver to sick and senior citizens
  • Physiotherapists
  • Documentation and coding / Third party administration
  • Accounting and Administration

Hospitality

  • Servers / Waiters
  • Receptionists
  • Cooks
  • Hotel managers
  • Accountants
  • Housekeepers / Cleaners

Craftsmen

  • Electricians
  • Electricians specialized in renewableenergies
  • Heating technicians
  • Painters
  • Carpenters
  • Brick / tile layers Mason
  • Plumbers
  • Mechanics for vehicle repairs (ightand heavy Vehicle)

Miscellaneous

  • Drivers (bus / tram / train / truck)Security
  • Delivery (postal service)
  • Packers and movers
  • Support at Airport § Cleaners
  • baggage handlers
  • Housekeeping
  • Sales assistants
  • Ware-house assistance

निवड कशी होणार :

“निवडलेल्या उमेदवारांना जर्मन भाषेचे मोफत प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षणानंतर, त्यांना आपल्या निवडलेल्या क्षेत्रानुसार जर्मन भाषेचे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक असेल. याशिवाय, त्यांना संबंधित व्यवसायाचे व्यावहारिक प्रशिक्षणही दिले जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया राज्य सरकारद्वारे समर्थित आहे आणि यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र उभारली जाणार आहेत.”

अर्ज कसा करावा :

इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचून खाली दिलेल्या संकेतस्थाळावर अर्ज करायचा आहे .

शासकीय GRयेथे क्लिक करा
पात्रता GR येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा : https://maa.ac.in/GermanyEmployment/

7 thoughts on “महाराष्ट्रातील तरुणांना जर्मनीत नोकरची संधी, 10,000 पदे ऑनलाईन अर्ज सुरु”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा