महानगरपालिका माहिती मराठी : Mahanagarpalika Mahiti Marathi : महाराष्ट्रात नगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या किंवा शहराची लोकसंख्यान ५ लाखांच्या पुढे गेली की, तेथे महानगरपालिका अस्तित्वात येते
शहरामध्ये महानगरपालिका स्थापन करण्याचा अधिकार हा राज्य शासनास आहे.
नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्याबाबत अंतिम निर्णय हा राज्य शासन घेते.
१९५० पर्यंत राज्यात मुंबई महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका अस्तित्वात होती.
मुंबई महानगरपालिकेचा कारभार हा मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ नुसार चालतो.
महाराष्ट्रात सध्या २९ महानगरपालिका कार्यरत आहेत. त्याची यादी (MahanagarPalika List ) खालीलप्रमाणे आहे .
१) नवी मुंबई | २) पिंपरी-चिंचवड |
३) पुणे | ४) औरंगाबाद |
५) अहमदनगर | ६) सांगली-मिरज-कुपवाड |
७) लातूर | ८) उल्हानगर |
९) जळगाव | १०) बृहन्मुंबई |
११) नागपूर | १२) ठाणे |
१३) कोल्हापूर | १४) पनवेल (१ ऑक्टोबर २०१६) |
१५) सोलापूर | १६) परभणी |
१७) अमरावती | १८) अकोला |
१९) नांदेड-वाघाळ | २०) नाशिक |
२१) मीरा-भाईंदर | २२) वसई-विरार |
२३) भिवंडी-निजामपूर | २४) चंद्रपूर |
२५) मालेगाव | २६) धुळे, |
२७) कल्याण | २८) इचलकरंजी (२०२२) |
२९) जालना (२०२३) |
- १ ऑक्टोबर २०१६ पासून महाराष्ट्रात पनवेल (जि. रायगड) ही २७ वी महानगरपालिका अस्तित्वात आली.
- ०५ मे २०२२ पासून इचलकरंजी ही २८ वि महानगरपालिका अस्तित्वात आली.
- जून २०२३ मध्ये जालना हि २९ महानगरपालिका म्हणून जाहीर
महानगरपालिका माहिती मराठी : Mahanagarpalika Mahiti Marathi
महानगरपालिकेची रचना
- नागरी लोकसंख्येच्या आधारे महानगरपालिकांची चार गटांत विभागणी केली जाते.
- महानगरपालिका सदस्यांची संख्या किमान ६५ ते कमाल २२१ इतकी असते.
- शहराच्या वेगवेगळ्या प्रभागामधून (वॉर्डस्) महानगरपालिकेच्या सदस्यांची प्रत्यक्ष प्रौढ मतदानाने निवड केली जाते.
महानगरपालिका सदस्य पात्रता
- नगरसेवक म्हणून ५ वर्षाचा अनुभव असला पाहिजे.
- नगरपरिषदेचा मुख्याधिकारी म्हणून ५ वर्षाचा अनुभव
- सामाजिक सेवेचा किमान ५ वर्षाचा अनुभव .
- नगरपालिका रुग्णलयात वैद्यकीय व्यवसायात कमीतकमी ५ वर्षाचा अनुभव
कार्यकाल
- महानगरपालिकेच्या निवडणुका दर ५ वर्षांनी होतात.
- साहजिकच सदस्यांचा कार्यकाल हा ५ वर्षांचा असतो.
- महानगरपालिकेतील निवडून आलेल्या सदस्यांना ‘नगरसेवक’ म्हणतात.
महानगरपालिकेतील आरक्षण
- महानगरपालिकेत महिला प्रतिनिधींसाठी : ५०% आरक्षण असते.
- नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी : २७% आरक्षण असते.
- अनुसूचित जाती-जमातींना एकूण लोकसंख्येशी असलेल्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात काही जागा राखीव असतात.
महापौर
- महापौरास शहराचा ‘प्रथम नागरिक’ संबोधले जाते
- महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाल अडीच वर्षे असतो.
- महापौरांच्या अनुपस्थितीत उपमहापौर त्यांचे कार्य पाहतात.
- महापौर आपला राजीनामा विभागीय आयुक्तांकडे देतात.
- नगरसेवक व उपमहापौर आपला राजीनामा महापौरांकडे देतात.
- महापौरांची कार्ये हे महानगरपालिकेचा कार्यकारी प्रमुख महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठका बोलाविणे व त्यांचे अध्यक्षस्थान स्वीकारणे.
- महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची बैठक तीन महिन्यातून एकदा होते.
महानगरपालिका व नगरपालिका कार्य / कामे
- सार्वजनिक पाणीपुरवठा करणे ,आरोग्य सेवांची उबलब्धता करून देणे ,जन्म मृत्यूची नोंद ठेवणे .
- रोगराई निर्मूलन ,स्वछता कार्यक्रमांची अंबलबजावणी ,प्राथमिक व माध्यमिक शिक्षण इत्यादी.