लालबहादूर शास्त्री(इ. स ११०४ ते १९६६) – Lal Bahadur Shastri Information in Marathi

  • जन्म : २ ऑक्टोबर ११०४
  • मृत्यू : १० जानेवारी १९६६
  • पूर्ण नाव : लाल बहादुर शारदाप्रसाद श्रीवास्तव
  • वडील : शारदाप्रसाद
  • आई : रामदुलारी देवी.
  • जन्मस्थान : मोगलसराई (जि. वाराणसी, उत्तर प्रदेश
  • शिक्षण : काशी विद्यापीठातून तत्वज्ञान’ विषय येऊन ‘शास्त्री’ ही पदवी त्यांनी मिळविली.
  • विवाह : ललितादेवी

लालबहादूर शास्त्री

भारतीय राजकारणात ज्यांना मानाचा मुजरा करावा असे थोर देशभक्त म्हणजे लालबहादुर शास्त्री. काशी विद्यापीठातुन त्यांना शास्त्री ही पदवी मिळाली.

देशसेवेच्या तीव्र ओढीने लाला लजपतराय यांच्या लोकसेवक समाजाचे ते सभासद झाले. तेथे त्यांनी मनापासून कार्य केले.  स्वातंत्र चळवळीतुन त्यांना अनेकवेळा तुरुंगवास भोगावा लागला. त्यातूनच त्यांची पं. नेहरूंशी ओळख झाली. तुरुंगवासात त्यांनी वाचन, लेखन, मनन करण्यात वेळ घालवला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाल बहादूर शास्त्री केवळ दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. विशीतील त्यांची आई आपल्याड तीन मुलांसह वडिलांच्या घरी स्थायिक झाली.

तीसहून अधिक वर्षे आपल्या समर्पित सेवेदरम्यान लाल बहादूर शास्त्री निष्ठा, क्षमतेसाठी जनमानसांत लोकप्रिय झाले. नम्र, दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी लोकांची भावना समजून घेणारे खऱ्या अर्थाने त्यांचे मित्र बनले. त्यांनी आपल्या दूरदर्शी वृत्तीने देशाला विकासाच्या मार्गावर नेले.

लाल बहादूर शास्त्री यांच्यावर महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा होता.

आपले गुरु महात्मा गांधीच्या शैलीत ते एकदा म्हणाले. “कठोर मेहनत ही प्रार्थनेच्या समान आहे.” महात्मा गांधी यांची परंपरा कायम राखणारे लाल बहादूर शास्त्री यांनी भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले.

कार्य

इ.स. १९२० मध्ये गांधीजींनी सुरू केलेल्या असहकार चळवळीत लालवहा शास्त्री कॉलेजात असतानाच भाग घेतला व कारावासही भोगला.

इ.स. १९२७ मध्ये लालबहादुर शास्त्री लोकसेवक मंडळाचे सदस्य झाले.

इ.स. १९३० मध्ये लालबहादुर शास्त्रीनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला त्यामुळे त्यांना अडीच वर्षांची शिक्षा होऊन ते तुरुंगात गेले.

लालबहादुर शास्त्रींनी आपला मनमिळाऊपणा आणि साधेपणा यामुळे लोकाना आपलेसे केले. पक्षामधील भांडणे ते मिटवीत.

गांधीजींनी १९४२ मध्ये सुरू केलेल्या ‘छोडो भारत’ स्वातंत्र्य आंदोलनातही काही काळ भूमिगत राहून त्यांनी चळवळीला मार्गदर्शन केले.

इ.स. १९४६ मध्ये उत्तर प्रदेश विधिमंडळावर निवडून येऊंन मंत्री झाले.

इ. स. १९५२ साली ते पंडित नेहरूंच्या मध्यवर्ती मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री झाले.

इ. स. १९५६ मध्ये केरळ प्रांतात अरियालूर येथे एक प्रचंड रेल्वे अपघात झाला . ती वार्ता ऐकताच शास्त्रींना खूप दुःख झाले.

त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून शास्त्रीजींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

इ. स. १९५७ मध्ये लोकसभा निवडणुकांत लालबहादुर शास्त्रींनी काँग्रेसला विजय मिळवून दिला. ते स्वतः अलाहाबाद मतदारसंघातून निवडले गेले आणि दळणवळण खात्याचे मंत्री झाले. त्या वेळी झालेल्या पोस्टखात्याचा संप त्यांनीच मिटविला. पुढे मंत्रिमंडळात बदल झाला. शास्त्रीना व्यापार आणि उद्योग खाते मिळाले. त्यामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला.

इ. स. १९६०-६१ मध्ये गोविद वल्लभ पंत गेल्यावर पंडित नेहरूनी शास्त्रीवर गृहमंत्री पदाची जबाबदारी सोपवली.

इ.स. १९६२ मध्ये झालेल्या निवडणुकीतही ते परत लोकसभेवर निवडून आले आणि गृहमंत्री झाले.

पंडित नेहरूच्या निधनानंतर १९६४ मध्ये भारतीयानी लालबहादुर शास्त्रींना पंतप्रधान केले.

इ. स. १९६५ मध्ये शास्त्रीजी पंतप्रधान असताना पाकिस्तानने काश्मीर गिळकृत करण्यासाठी त्या भागावर आक्रमण केले पण त्यांच्या आदेशानुसार भारतीय सैन्याने पाकिस्तानचे पुरते कंबरडे मोडले. याच वेळी शास्त्रींनी किसानांना आणि जवानांना ‘जय जवान, जय किसान’ ही घोषणा दिली.

यूनोने युद्धबंदीचा आदेश दिला. रशियाचे पंतप्रधान कोसिजीन यांनी शास्त्रींना आणि आयुबखानना वाटाघाटीसाठी ताश्कंदला बोलावले. तेथे वाटाघाटी, चर्चा होऊन १० जानेवारी १९६६ ला ४ वाजता शास्त्री आणि आयुबखान यांनी कोसिजीनना साक्षी ठेवून करारावर सह्या केल्या. यालाच ताश्कंद करार असे म्हणतात. त्याच दिवशी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.

पुरस्कार

इ. स. १९६६ मध्ये मरणोत्तर ‘भारतरल्न’.

मृत्यू

१० जानेवारी १९६६ रोजी त्यांचे निधन झाले.

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा