मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (Ladka Bhau Yojna) योजना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील तरुणांसाठी “मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना” 2024 जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या तरुणांना दर महिन्याला ₹10,000 पर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील तरुणांना शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी प्रोत्साहन देण्यासाठी “मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना” म्हणजेच “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” नावाची महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, 12 वी उत्तीर्ण तरुणांना दर महिन्याला ₹6,000, डिप्लोमाधारक तरुणांना ₹8,000 आणि पदवीधर तरुणांना ₹10,000 पर्यंत आर्थिक मदत प्रदान केली जाणार आहे.
माझा लाडका भाऊ योजनेचा उद्देश
मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना ही केवळ आर्थिक मदत देणारी योजना नाही तर ती शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार यांचा एकत्रित मार्ग आहे. या योजनेमध्ये सहभागी होणारे तरुण एका वर्षासाठी कारखान्यात अप्रेंटिस म्हणून काम करतील आणि या काळात त्यांना कामाचा मौल्यवान अनुभव मिळेल. या अनुभवाचा उपयोग करून ते पुढे चांगल्या नोकरीच्या संधी मिळवू शकतील.
- अनुभव आणि कौशल्य: एका वर्षाच्या अप्रेंटिसशिपद्वारे, तरुणांना त्यांच्या क्षेत्रातील आवश्यक कौशल्ये आणि अनुभव प्राप्त होतील.
- रोजगाराची शक्यता: अप्रेंटिसशिप पूर्ण झाल्यावर, या तरुणांना त्याच कारखान्यात किंवा इतरत्र रोजगाराची संधी मिळण्याची शक्यता वाढेल.
- आर्थिक मदत: सरकार अप्रेंटिससाठी कारखान्याला पैसे देईल आणि त्यांना स्टायपंड देखील प्रदान करेल.
योजनेचे लाभ:
- 12 वी/HSC उत्तीर्ण – दरमहा 6 हजार रुपये
- ITI/डिप्लोमा उत्तीर्ण – दरमहा 8 हजार रुपये
- पदवीधर/Graduate उत्तीर्ण – दरमहा 10 हजार रुपये
लाडका भाऊ योजना पात्रता:-
- उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे.
- उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२वी पास/ आयटीआय/ पदविका/ पदवी/पदव्युत्तर असावी. मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्रअसणार नाहीत.
- उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा.
- उमेदवाराची आधार नोंदणी असावी.
- उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे.
- उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरनोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.
माझी लाडका भाऊ योजनेसाठी लागणारे कागदपत्रे :-
- शैक्षणिक कागदपत्रे – 12 वी पास, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी सर्टिफिकेट .
- अर्जदाराचे रहिवाशी प्रमाणपत्र. (Domicile/Nationality Certificate)
- आधार कार्ड / Aadhar Card
- बँक खाते आधार कार्डशी सलग्नित असावे.
- याचबरोबर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, पासपोर्ट आकाराचे फोटो
अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे?
- मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना 2024 च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://rojgar.mahaswayam.gov.in/”
- नोंदणी करा” बटणावर क्लिक करा.
- आवश्यक माहिती आणि कागदपत्रे जमा करा.
महत्वाचे तारखा:
- अर्ज स्वीकारण्याची सुरुवात: 1 जुलै 2024
- अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख:~~~~~
ऑनलाईन अर्ज Mahaswayam Rojgar या वेबसाईट वर करण्यात येणार आहे,
माझा लाडका भाऊ योजना App Link / अर्ज करा | https://rojgar.mahaswayam.gov.in |
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना GR | डाऊनलोड करा |
अधिक माहिती | येथे क्लीक करा |
व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा | टेलिग्राम ग्रुप जॉईन करा |