Kal in Marathi : संपूर्ण मराठी व्याकरणातील काळ व त्याचे पूर्ण प्रकारची माहिती आपण येथे बघणार आहोत. काळ म्हणजे काय, काळ ओळखा, विविध काळाचे वाक्य त्याच बरोबर काळाचे प्रकार वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ, त्याचे प्रकार आणि प्रत्यकाचे उदाहरण व स्पष्टीकरण.
काळ म्हणजे काय आणि काळाची व्याख्या : वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो .
काळ व त्याच प्रकार- Types of Tenses in Marathi
काळाचे प्रकार किती व कोणते : काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात व ते खालीलप्रमाणे
- 1. वर्तमान काळ – Vartaman Kal
- 2. भूतकाळ – Bhoot Kal
- 3. भविष्यकाळ – Bhavishya Kal
वर्तमान काळ : Vartman kaal in marathi
क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ ‘वर्तमानकाळ’ असतो.
वर्तमान काळ वाक्य
- a. मी आंबा खातो.
- b. मी क्रिकेट खेळतो.
- c. ती गाणे गाते.
- d. आम्ही अभ्यास करतो.
वर्तमानकाळाचे 4 उपप्रकार घडतात. Vartaman Kalache Prakar
i) साधा वर्तमान काळ Sadha Vartaman Kal
जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळात घडते तेव्हा त्याला ‘साधा वर्तमानकाळ’ असे म्हणतात.
साधा वर्तमान काळ वाक्य
- a. मी आंबा खातो.
- b. कृष्णा क्रिकेट खेळतो.
- c. प्रिया चहा पिते.
ii) अपूर्ण वर्तमान काळ / चालू वर्तमानकाळ apurn vartaman kal
जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळात असून ती अपूर्ण किंवा चालू असे तेव्हा त्या वर्तमान काळाला ‘अपूर्ण किंवा चालू वर्तमानकाळ’ म्हणतात.
अपूर्ण वर्तमानकाळ वाक्य
- आनंद पत्र लिहीत आहे.
- पूजा अभ्यास करीत आहे.
- आम्ही जेवण करीत आहोत.
iii) पूर्ण वर्तमान काळ – Purn Vartaman Kal
जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला ‘पूर्ण वर्तमानकाळ’ असे म्हणतात.
पूर्ण वर्तमानकाळ वाक्य
- मी आंबा खाल्ला आहे.
- आम्ही पेपर सोडविला आहे.
- विधार्थ्यांनी अभ्यास केला आहे.
iv) रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ Riti Vartaman Kal
वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला ‘रीती वर्तमानकाळ’ असे म्हणतात.
रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ वाक्य
- मी रोज फिरायला जातो.
- प्रदीप रोज व्यायाम करतो.
- कृष्णा दररोज अभ्यास करतो.
भूतकाळ : BhutKal
जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. असा बोध होतो तेव्हा त्या काळाला ‘भूतकाळ’ असे म्हणतात
भूतकाळ वाक्य मराठी Bhutkal sentence in Marathi
- राम शाळेत गेला.
- मी अभ्यास केला.
- तिने जेवण केले.
भूतकाळचे 4 उपप्रकार प डतात.
i) साधा भूतकाळ Sadha Bhutkal
एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास ‘साधा भूतकाळ’ असे म्हणतात.
साधा वर्तमान काळ वाक्य (Sentences of Sadha Bhutkal)
- रामने अभ्यास केला
- मी पुस्तक वाचले.
- सिताने नाटक पहिले.
ii) अपूर्ण/चालू भूतकाळ Purn Bhutkal
एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला
‘अपूर्ण भूतकाळ/चालू भूतकाळ’ असे म्हणतात.
अपूर्ण भूतकाळ वाक्य (Sentences of Apurn/Chalu Bhutkal)
- मी आंबा खात होतो.
- दीपक गाणे गात होता.
- ती सायकल चालवत होती.
iii) पूर्ण भूतकाळ Purn Bhutkal
एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पुर्णपणे संपलेली असते, असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला ‘पूर्ण भूतकाळ’ असे म्हणतात.
पूर्ण भूतकाळ वाक्य (Sentences of Purn Bhutkal)
- सिद्धीने गाणे गाईले होते.
- मी अभ्यास केला होता.
- त्यांनी पेपर लिहिला होता.
- राम वनात गेला होता.
iv) रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ Riti /Chalu Bhutkal
भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते. अशा काळाला ‘चालू-पूर्ण भूतकाळ’ किंवा
‘रीती भूतकाळ’ असे म्हणतात.
रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ वाक्य. (Examples of Ritti Chalu Bhutkal)
- a. मी रोज व्यायाम करीत होतो/असे.
- b. ती दररोज मंदिरात जात होती/असे.
- c. प्रसाद नियमित शाळेत जात होता/असे.
भविष्यकाळ : Bhavishyakal
क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला ‘भविष्यकाळ’ असे म्हणतात.
भविष्यकाळ मराठी वाक्य Bhavishyakal Sentences in Marathi
- मी सिनेमाला जाईल.
- मी शिक्षक बनेल.
- मी तुझ्याकडे येईन.
i) साधा भविष्यकाळ – Sadha Bhavishyakal
जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो अशा वेळी ‘साधा भविष्यकाळ’ असतो.
साधा भविष्यकाळ वाक्य Sentences of Sadha Bhavishyakal
- उधा पाऊस पडेल.
- उधा परीक्षा संपेल.
- मी सिनेमाला जाईल.
ii) अपूर्ण / चालू भविष्यकाळ Apurn / Chalu Bhavishyakal
जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल तेव्हा त्याला
‘अपूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.
अपूर्ण / चालू भविष्यकाळ वाक्य Sentences of Apurn / Chalu Bhavishyakal
- मी आंबा खात असेल.
- मी गावाला जात असेल.
- पूर्वी अभ्यास करत असेल.
- दिप्ती गाणे गात असेल.
iii) पूर्ण भविष्यकाळ Purn Bhavishyakal
जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला ‘पूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.
पूर्ण भविष्यकाळ वाक्य Examples of Purn Bhavishyakal in Marathi
- मी आंबा खाल्ला असेल.
- मी गावाला गेलो असेल.
- पूर्वाने अभ्यास केला असेल.
- दिप्तीने गाणे गायले असेल.
iv) रीती भविष्यकाळ / चालू पूर्ण भविष्यकाळ Riti Bhavishyakal
जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल, तर त्याला ‘रीती/ चालू पूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.
रीती भविष्यकाळ / चालू पूर्ण भविष्यकाळ वाक्य Examples of Purn Bhavishyakal in Marathi
- मी रोज व्यायाम करत जाईल.
- पूर्वी रोज अभ्यास करत जाईल.
- सुनील नियमित शाळेत जाईल.
दररोज नवीन उपडेट जॉईन करा टेलिग्राम चॅनेल : महासराव
वर्तमान काळ
वर्तमान काळ
लहानपणी शिकलेले मराठी आता पुन्हा आठवायला लागते. सगळं विसरल्यासारखं झालेले आहे.
नाही नीट अभ्यास केला तर कदाचित लहान पनी चा अभ्यास कमी येईल
👌👌👌👌🙏
एक नंबर
मला मोबाईल हवा आहे… या वाक्याचा कृपया काळ सांगा
अपूर्ण भूतकाल
eat cha past tense Kay ahe.
Khupach chhan😍😍😍