◆ It Meaning in marathi |It- उपयोग | pronouns | English grammer in marathi
● It या सर्वनामाचा, -self / selves शेवटी असलेल्या सर्वनामांचा आणि संबंधी सर्वनामांचा अभ्यास करूया . It पासून सुरुवात करू या.
◆ It चा उपयोग : It meaning in marathi
● It चा उपयोग
१) वेळ, तारीख, वार, अंतर, आणि हवामान यांच्याबद्दल बोलताना वाक्यातील कर्ता म्हणून It चा उपयोग केला जातो.
उदा: 1) It is7.30now.
आता ७.३० वाजले आहेत.
2) Was it Wednesday yesterday? काल बुधवार होता का?
3) It is Sunday today
आज रविवार आहे.
4) It is the seventh of May today आज ७ मे आहे.
5) It is very hot outside.
बाहेर खूप गरम आहे.
6) It was very cold yesterday.
काल खूप थंडी होती.
7) It is 1000 miles to Mumbai from here.
इथून मुंबई १००० मैल आहे.
8) How far is it to Mumbai? मुंबई किती दूर आहे
9) What date / day is it today? आज तारीख/वार काय आहे?
10) It is my birthday tomorrow. उद्या माझा वाढदिवस आहे.
11) What time does it get dark in winter?
हिवाळ्यात अंधार किती वाजता होतो?
● It हे सर्वनाम निर्जीव वस्तू, प्राणी किंवा लहान मुलाच्या बाबतीत वापरले जाते.
उदा. •If you sit on this chair, it will break.• Her baby was born immature, but it was completely healthy.
• She has a cat, she loves it very much.
• टीप:- प्राणी आणि लहान बाळासाठी he किंवा she सुद्धा वापरता येईल. पण प्राणी किंवा
लहान बाळाबद्दल बोलताना ते स्त्रीलिंगी की पुरुषलिंगी हा दृष्टिकोन नसेल तर बऱ्याचदा itवापरतात.
● It चा उपयोग कधीकधी व्यक्तीच्या बाबतीत बोलताना सुद्धा केला जाऊ शकतो.
उदा. Is that Rahul standing there? ~ No, it is Ganpat.
● अव्यक्तिवाचक (impersonal) क्रियापदाचा कर्ता म्हणून it चा उपयोग केला जाऊ शकतो.
उदा. पाऊस पडत आहे.
It is raining.
बर्फ पडत आहे.
It is snowing.
गारा पडत आहेत.
It is hailing.
गडगडाट होत आहे.
It is thundering
अंधार होत आहे.
It is darkening
काल रात्री जोराचा पाऊस पडला. It rained heavily last night.
काल इकडे पाऊस पडला का? Did it rain here yesterday?
● seem, appear, look, sound, occur to आणि happen या क्रियापदांसोबत कर्ता म्हणून it चा उपयोग केला जाऊ शकतो.
उदा.It seems / looks / appears that the speaker has made no preparation.
असं दिसतंय की वक्त्याने काहीच तयारी केलेली नाही.
• It seems (to me) that he won’t come now.
(मला) असं वाटतंय की तो आता येणार नाही. • It had never happened before.
पूर्वी असं कधीच घडलं नव्हतं.
• It sounds a good idea.
चांगली कल्पना वाटते.
• It never occurred to me that you would come here.
असं मला कधी वाटलंच नाही की तू इथे येशील.
● आणखी काही क्रियापदांसोबत सुद्धा (कर्ता म्हणून) it चा उपयोग होतो.
उदा. It amazes/surprises me how you can do all this alone,
तू इतकं सगळं एकटा कसा करू शकतोस याचं मला आश्चर्य वाटतं.
• It angers me to remember the treatment he gave you.
त्याने
तुला दिलेल्या वागणुकीच्या आठवणीने मला राग येतो.
• It astonishes me that he left such a good job.
त्याने इतकी चांगली नोकरी सोडून दिली याचं मला आश्चर्य वाटतं.
• It pains me to say this, but I have no option.
हे म्हणताना मला दु:ख होतोय पण माझ्याजवळ पर्याय नाही.
• It doesn’t surprise me that he didn’t keep his promise. .
त्याने वचन पाळलं नाही याचं मला आश्चर्य वाटत नाही.
●’त्याला उशीर होत आहे’ हे वाक्य इंग्रजीमधे He पासून सुरू होईल आणि He is getting late असे होईल. ‘मला उशीर होत आहे’ हे वाक्य इंग्रजीमधे I am getting late असे होईल. आम्हाला उशीर होत आहे’ हे वाक्य We are getting late असे होईल,
पण फक्त उशीर होत आहे हे वाक्य इंग्रजीत बोलायचे असल्यास Is getting late असे होणार नाही. किंवा हेच शब्द मागेपुढे करूनही होणार नाही. वाक्य सुरू करण्यासाठी कर्त्याची गरज आहे. इथे कर्ता म्हणून It येईल. मग ‘उशीर होत आहे’ हे वाक्य इंग्रजीत It is getting late असे होईल.
● दुसरे उदाहरण पहा :आपल्याला जर कोणी विचारलं Did you see my pen anywhere? (तू माझ पेन पाहिला का कुठे?) आणि आपल्याला म्हणायचं असेल इथे आहे’ किंवा ‘टेबलावर आहे.
तेव्हा इंग्रजीत Here is किंवा on the table is असे म्हणता येणार नाही. किंवा थोडा फ्रेम बदलून is here किंवा is on the table असेही म्हणता येणार नाही. एक वेळ फक्त Here किंवा फक्त On the table म्हणणं शक्य आहे. पण पूर्ण वाक्याच्या रूपात बोलायचं असेल तर वाक्यात It येईल आणि वाक्य असे होईल:इथे आहे. = It is here. टेबलावर आहे. = It is on the table.
● It चा हा उपयोग खालील उदाहरणांवरून आणखी स्पष्ट होईल :
१) कोण आहे? Who is it २) मी आहे. it is me. ३) आता कोणाचा नंबर आहे?
Whose turn is it now?
४) इथे खूप अंधार आहे.
It is very dark here.
५) नागपूर ते दिल्ली १८ तासाचा रेल्वे प्रवास आहे It is an 18-hour train journey from Nagpur to Delhi.
६) दिवाळीला फक्त एक आठवडा आहे.
It is only a week to Diwali
७) तू तिथे गेलास तर बरं होईल.
If you go there, it will be better.
८) आता कार धुण्याचा तुझा नंबर आहे. It is your turn to wash the car now.
● It चा उपयोग ‘हा, ही, हे’ आणि ‘तो, ती, ते’ या अर्थाने सुद्धा होतो.
उदाहरणे पहा:१) हे खरं आहे.
It is true.
२) हे निश्चित आहे.
It is certain.
३) हे शक्य आहे.
It is possible.
४) हे शक्य आहे का?
Is it possible?
५) हे शक्य नाही.
It is not possible.
६) हे शक्य नाही का?
Isn’t it possible? ?
७) हे का शक्य नाही?
Why isn’t it possible?
८) तो माझा दोष नव्हता.
It was not my fault. ९) ही माझी जबाबदारी नाही.
It is not my responsibility. १०) ते रागाच्या भरात म्हटलं गेलं.
It was said in a fit of anger. ११) आपल्याला आपलं भविष्य माहीत
नसतं ही एक चांगली गोष्ट आहे.
It is a good thing that we don’t
know our future. १२) तो जीवन-मरणाचा प्रश्न नव्हता.
It was not a question of life and
death.
१३) तो कठीण प्रश्न होता. It was a difficult question. १४) ही हसण्याची गोष्ट नाही. It is not a laughing matters
१५) हा चमत्कार आहे.
It is a miracle. १६) कोणतं वर्ष होतं ते जेव्हा भारताने
विश्वचषक जिंकला?
Which year was it when India
won the world cup?
● टीप:- हा/ही/हे आणि तो/ती/तेसाठी This आणि That हे शब्द वापरूनही वरची वाक्ये करता येतील. This / That च्या उदाहरणांसाठी संमिश्र सर्वनामे, विशेषणे आणि क्रियाविशेषणे हे प्रकरण पहा.
● काही क्रियापदांसोबत It चा उपयोग ‘It + be + क्रियापदाचे तिसरे रूप… या रचनेतही होतो. जसे,
१) असं म्हणतात की स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त सहनशील असतात.
It is said that women are more tolerant than men.
२) संप किती दिवस सुरू राहील हे सांगता येणार नाही.
It can’t be said how long the strike will continue.
३) जेवताना आवाज करणे वाईट शिष्टाचार समजले जाते.
It is considered bad manners to make noise while eating.
४) त्याचा मृत्यू आत्महत्या नव्हती हे नंतर कळलं.
It was found later that his death was not suicide.
५) अशी आशा आहे की तो लवकरच बरा होईल.
It is hoped that he will get better soon.
६) अशी भीती आहे की स्फोटात ५०० पेक्षा जास्त लोक ठार झाले आहेत.
It is feared that more than 500 people have been killed in the blast.
● कधीकधी It खालीलप्रमाणे कर्म म्हणून वापरले जाऊ शकते. तेव्हा It चा अर्थ काहीच निघत नाही. जसे,
१) ‘नाही’ म्हणणं त्याने माझ्यासाठी अशक्य करून टाकलं.
He made it impossible for me to say ‘no’.
२) त्याला याबद्दल सांगणं मला आवश्यक वाटतं.
I think it necessary to tell him about this.
३) त्याचं समाधान करणं मी आवश्यक समजतो.
I consider it necessary to satisfy him.
४) त्याच्यासोबत राहणं मला फार कठीण दिसतं.
I find it very difficult to live with him.
५) स्वतः जाण्यापेक्षा मला पाठवणं त्याला जास्त सुरक्षित वाटतं…
He feels it safer to send me than go himself
◆ self / selves शेवटी असलेले शब्द
–self / selves शेवटी असलेले शब्द
● -self/selves शेवटी असलेले शब्द जेव्हा स्वत:ला या अर्थाने क्रियेला परत कर्त्याकडे वळवण्यासाठी म्हणजे कर्ता आणि कर्म एकच आहे असे दर्शवण्यासाठी वापरले जातात तेव्हा हे शब्द क्रियापदानंतर येतात. जसे,
१) सापाने स्वत:ला चावलं.
The snake bit itself.
२) त्याने स्वत:ला विचारलं.
He asked himself.
३) लोक स्वत:ला दोष देत नाहीत. People don’t blame themselves. .
४) मी स्वत:ला फसवलं आहे.
I have deceived myself.
● फरक पहा :The Chief Minister himself gave him the prize.
स्वत: मुख्यमंत्र्यांनी त्याला बक्षीस दिलं.
The Chief Minister gave himself the prize.
मुख्यमंत्र्यांनी स्वत:ला बक्षीस दिलं.
● आता पुढील वाक्यांचा अभ्यास करा :
१) मी हे स्वतः करायला पाहिजे. I should do this myself.
२) आपण हे स्वतः करायला पाहिजे. We should do this ourselves
३) तू हे स्वतः करायला पाहिजे. You should do this yourself