IB Recruitment 2023 : गृह मंत्रालयाअंतर्गत येणारी एक महत्त्वाची गुप्तहेर संघटना असलेल्या इंटेलिजेंस ब्युरोने (IB) सिक्युरिटी असिस्टन्ट/ मोटर ट्रान्सपोर्ट आणि मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 14 ऑक्टोबर 2023 ते 13 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
पदाचे नाव : सिक्युरिटी असिस्टन्ट/ मोटर ट्रान्सपोर्ट (SA/MT) ,मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल (MTS)
नोकरी ठिकाण : भारतात कोठेही
एकूण पदे : 677
पात्रता :
पद | शैक्षणिक पात्रता | रिक्त जागा | वयोमर्यादा |
सिक्युरिटी असिस्टन्ट/ मोटर ट्रान्सपोर्ट | मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाची शालान्त (10वी) परीक्षा उत्तीर्ण मोटार कारसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक. मोटार यंत्ररचनेचे ज्ञान आवश्यक वैध ड्रायव्हिंग लायसन्स प्राप्त झाल्यानंतर 1 वर्ष मोटार वाहन चालविण्याचा अनुभव | 362 | 27 वर्षापेक्षा जास्त नही |
मल्टी-टास्किंग स्टाफ/जनरल | मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाची शालान्त (10वी) परीक्षा उत्तीर्ण | 312 | 18-25 वर्षे |
निवड प्रक्रिया :
- Tier I: Online Exam
- Tier II: Skill Test
- Local Language Test (For SA Only)
- Interview
- Document Verification
- Medical Examination
अर्ज करण्याची कालावधी : 14 ऑक्टोबर 2023 ते 13 नोव्हेंबर 202
अर्ज कसा करावा :
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी गृह मंत्रालयाची अधिकृत संकेतस्तळं www.mha.gov.in किंवा www.ncs.gov.in ला भेट द्या.
IB जाहिरात डाउनलोड करा – येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक – येथे अर्ज करा